How to create blog in Marathi

How to create blog in Marathi | Free मध्ये Blogger.com वर ब्लॉग बनवा

ब्लॉग म्हणजे तुमचे विचार, तुमचे मत, तुमचे ज्ञान हे जगासमोर लिखाणाच्या माध्यमातून व्यक्त करण्याचे एक साधन आहे. How to create blog in Marathi मध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत जेणे करून अगदी शून्यापासून यशस्वी ब्लोगर होण्यासाठी तुम्हाला मदत होईल.

बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे, तरुणांसमोर करियर कुठं करावं? हाच सर्वात मोठा प्रश्न उभा आहे. तर तुमच्यामध्ये एखादी कला असेल किव्वा तुमच्याकडे एखाद्या विशिष्ट विषयाचं सखोल ज्ञान असेल तर तुम्ही ब्लॉगिंग याला एक करियर चा पर्याय म्हणून देखील करू शकता. ब्लॉगिंग करणे फार काही कठीण नाही त्याच्या पायऱ्या आम्ही खाली दिलेल्याच आहेत. ब्लॉग मराठी टिप्स त्यांना तुम्ही follow केलात तर तुम्ही सुद्धा ब्लॉगिंग मध्ये खूप चांगल्या पद्धतीने करियर करू शकता. परंतु त्याआधी तुम्हाला काही महत्वाच्या बाबी माहिती असणं गरजेचं आहे.

ब्लॉग तयार करण्यापूर्वी महत्वाच्या बाबी जाणून घ्या in Marathi

1. सर्वात आधी तुम्ही तुमच्या ब्लॉग साठी एक असा विषय निवडा ज्यात तुम्हाला आवड असेल की त्या विषयाबद्दल तुमच्याकडे सखोल ज्ञान असेल.
2. विषय निवडून झाल्यानंतर त्या विषयाशी निगडित अशा एक युनिक नाव शोधा ज्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या ब्लॉग ला एक वेगळी ओळख निर्माण होईल.
3. आता तुम्हाला तुमच्या ब्लॉग साठी अड्रेस म्हणजे एक डोमेन नेम शोधावा लागेल किव्वा जर तो डोमेन उपलब्ध नसेल तर तुम्हाला त्या विकत सुद्धा घ्यावं लागेल त्यासाठी आम्ही तुम्हाला GoDaddy.com ही वेबसाईट suggest करतो.
4. डोमेन नेम निवडल्यानंतर आता तुम्हाला तुमच्या ब्लॉग साठी एक प्लॅटफॉर्म निवडावा लागेल. त्यासाठीच अनेक प्लॅटफॉर्म आहेत जसे की, Myspace.com, WordPress.com, LiveJournal.com, Blogger.com, इत्यादी. परंतु तुम्ही ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये नवीन असल्यामुळे आम्ही तुम्हाला Blogger.com हे प्लॅटफॉर्म suggest करतो. कारण, हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे मोफत आहे आणि यासोबतच वापरायला सोप्पं आहे.
तुम्ही एक प्रोफेशनल ब्लॉगर झाल्यानंतर तुम्ही तुमचा ब्लॉग wordpress.com या प्रोफेशनल ब्लॉगिंग वेबसाइट मध्ये Transfer करू शकता. जर तुम्हाला Transfer करायची प्रक्रिया जाणून घ्यायची असेल तर आम्हाला comment box मध्ये नक्की कळवा. आम्ही तुमच्या विनंती ला मान देऊन यावर सुद्धा एक ब्लॉग नक्कीच तयार करून तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू.

How to create blog in Marathi ब्लॉग मराठी टिप्स

How to create blog on Blogger.com in Marathi | ब्लॉग मराठी टिप्स

1. सर्व प्रथम तुम्हाला Blogger.Com या वेबसाईट वर जावं लागेल आणि तुमच्या Email I’d ने Sign Up करा.
2. Sign Up केल्यानंतर तुमच्यासमोर एक home page ओपन होईल. त्यावरील Create a Blog या वर क्लिक करा.
3. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन page ओपन होईल त्यात तुम्हाला तुमच्या ब्लॉग चं नाव विचारलं जाईल त्यात तुम्ही तुमच्या ब्लॉग च्या विषयाशी निगडित ठरवलेलं नाव लिहा. नंतर तुम्ही त्यात बदल करू शकता.
4. आता तुमच्यासमोर आणखी एक नवीन page ओपन होईल त्यात तुम्हाला तुमचा वेबसाईट address टाकावं लागेल त्यात तुम्हाला मोफत एक subdomain मिळेल blogspot.com. नंतर तुम्ही GoDaddy.com च्या माध्यमातून स्वतःचा .in, .com, .online इत्यादी अनेक डोमेन नेम मधून एखादा नेम घेऊ शकता आणि तो कस्टम डोमेन मध्ये add करून घेऊ शकता.
5. आता तुम्हाला पुढच्या step ला तुमचा नाव लिहा आणि जर तुम्हाला तुमची ओळख लपवून ठेवायची असल्यास
तुम्ही त्यात तुमच्या ब्लॉग चाच नाव लिहून घेऊ शकता.

     आता तुमचा ब्लॉग पूर्णपणे बनून तयार झालेला आहे. आता तुम्हाला तुमच्या ब्लॉग ला आकर्षक दिसण्यासाठी योग्य पद्धतीने डिझाईन करण्यासाठी theme आणि layout adjust करावं लागेल. तेव्हाच तुमचा ब्लॉग आकर्षक आणि प्रोफेशनल वाटेल.

Blog Design Information in Marathi | ब्लॉग मराठी टिप्स

1. आपली ब्लॉग वेबसाईट अधिक आकर्षक दिसण्यासाठी एक आकर्षक थीम वापरा त्यासाठी खाली Dashboard वरील Theme या पर्यायावर क्लिक करा आणि त्यातली आवडलेली एखादी थीम निवडून ते add करा किव्वा Google वर “Free Blogger Theme” असं search केल्यास अनेक थीम मिळतील त्यातली एखादी Add करा.
2. Theme लावल्यानंतर तिला Adjust करा आणि नंतर “Layout” या पर्यायावर क्लिक करून हवी ती Widgets लावा आणि अधिकच्या Widgets हटवून द्या त्यामुळे तुमची वेबसाइट ही प्रोफेशनल आणि आकर्षक तर वाटेल परंतु त्यासोबतच तुमच्या वेबसाईट चा स्पीड सुद्धा वाढेल.

  Blog Disign झाल्यानंतर तुम्हाला ब्लॉग ला सेटअप करावं लागेल आणि हे पहिल्यांदा करावं च लागतं याशिवाय दुसरा उपाय नाही...आणि हे एकदाच करावं लागतं परत परत करायची आवश्यकता मुळीच नाही.

Blog Setup and Setting In Marathi

1. Setup मध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या ब्लॉग ला “Google Search Console” ला जोडावे लागते. त्यासाठी तुम्ही Google वर “google search console” open करा आणि तिथे तुमची चालू केलेल्या ब्लॉग च्या email ID ने sign up करा. नंतर तुमचे ब्लॉग “google search console” ला जोडले जाईल. हे एक Google चेच साधन आहे ज्याच्या आधारे आपल्याला google वरून किती क्लिक येत आहेत आणि किती impression आले हे समजते.
2. “google search console” ला ब्लॉग जोडल्यानंतर तुम्हाला तुमचा ब्लॉग ला “Google Analytics” ला जोडावं लागेल. इथेही जोडण्यासाठी Google search console चीच प्रक्रिया वापरा फक्त Google search console च्या एवजी Google Analytics ही website open करून sign up करा. हे देखील एक Google चे साधन आहे ज्याच्या आधारे तुमच्या ब्लॉग वर ट्रॅफिक कुठून आले, किती वेळ राहिले याचं सर्व विश्लेषण करून देत असते.
3. ब्लॉग setup करण्यासाठी आणखी एक प्रक्रिया म्हणजे ब्लॉग ला seo फ्रेंडली बनविणे. त्यासाठी blogger च्या dashboard वर जाऊन Setting मध्ये Robot Tags, Sitemap, Meta Description असे सेटींग आहेत. हे पुर्ण करणे गरजेचं आहे.

First Blog Post | ब्लॉग मराठी टिप्स

तुमचा ब्लॉग बनवून तयार झाला, blog Disign पण झालेली आहे तर आता तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे ब्लॉग पोस्ट लिहायला सुरवात करू शकता. ब्लॉग पोस्ट लिहितांना तुम्हाला असा content लिहायचा आहे जेणे करून एकदा वाचलं की त्यांना पुन्हा पुन्हा तुमच्या ब्लॉग वर येण्यासाठी भाग पाडलं पाहिजे. त्याच मुळे तुम्ही तुमच्या ब्लॉग वर लोकांना जोडून राहू शकता. मात्र कित्येक New Blogger इथेच अडकतात. त्यांना कळतच नाही की आपण नेमकं लिहायचं काय? त्यासाठीच आम्ही तुम्हाला या आधी ब्लॉग तयार करण्यापूर्वी महत्वाच्या बाबी जाणून घ्या in Marathi हे सांगितलं होतं.
ब्लॉग पोस्ट लिहताना त्यात Keyword Placement, Keyword Research, हे SEO चे घटक येतात. पोस्ट लिहल्यावर पोस्ट ला एक Permalink द्यावी लागते, Labels जोडावे लागतात व Meta डिस्क्रिपशन टाकावे लागते. यामुळे तुमच्या ब्लॉग Organic Traffic यायला सुरवात होईल आणि यासोबतच तुम्हाला सोशल मीडिया वर तसेच Quora, Medium, Uttar, ई फोरम वर सुद्धा तुमची तुमच्या ब्लॉग पोस्ट ची लिंक शेअर करा ज्यातून तुम्हाला backlink मिळतील आणि त्यामुळे तुमच्या ब्लॉग वर ट्रॅफिक येईल. आणि एकदा ट्रॅफिक यायला सुरवात झाली की तुम्ही यातून Earning सुद्धा करू शकता.

Ways to Earn Money फ्रोम Blog in Marathi

आपल्या मधून कित्येकांचा ब्लॉगिंग करण्यामागचा हेतू पैसे कमविणे असते परंतु हे वाटते तेवढं सोप्पं नाही. परंतु तुम्ही याचिया विचार करू नका कारण तुम्ही आम्ही सांगितलेल्या गोष्टी पूर्णपणे फॉलो केलात तर हे सोप्पं नसणारे काम सुद्धा सोप्पं होऊन जाईल आणि तुम्ही यातून देखील चांगली Earning करू शकता.
ब्लॉग च्या माध्यमातून पैसे कमविण्याचे Google AdSense, Affiliate Marketing, Sponsored Content असे अनेक मार्ग आहेत. मात्र Google Adsense हे सर्वात लोकप्रिय आणि विश्वसनीय मार्ग आहे. आणि तुमच्या ब्लॉग वर बऱ्यापैकी ट्रॅफिक येत असेल. आणि तुमचा ब्लॉग Google Adsense पॉलिसी मध्ये बसत असेल तर तुम्हाला लगेच approval मिळेल आणि तुम्ही देखील पैसे कमवू शकता.
तुम्ही प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला Google Adsense approval मिळत नसेल तर काळजी करू नका त्यासाठी आम्ही https://mazablog.online/web-stories/blog-google-adsense-information-in-marathi/ या मध्ये दिलेल्या स्टेप्स फॉलो करा. तुम्हाला नक्कीच Google Adsense approval मिळेल.

Conclusion :- How to create Blog in Marathi

How to Create a Blog in Marathi हे आपल्याला आता समजले असेल अशी की आशा करतो. तरीपण जर तुम्हाला याबद्दल काही समजलं नसेल किव्वा ब्लॉगिंग विषयी तुमच्या काही समस्या असतील तर आम्हाला comment द्वारे नक्कीच कळवा. आम्ही तुमच्या समस्या सोडविण्याचा पुरेपूर प्रयत्न करू.
तसेच तुम्हाला wordpress.com यावर जर ब्लॉग सुरु करायचा असेल तर Comment द्वारे नक्कीच कळवा आम्ही तुम्हाला WordPress.com वर How to Create a Blog in Marathi यावर माहिती देऊ.
धन्यवाद.

श्रीमंत होण्याचे नियम वाचा :- Shrimant Kase Vhave

पैसे कमवण्याच्या ट्रिक्स वाचा :- How To Make Money Online

7 thoughts on “How to create blog in Marathi | Free मध्ये Blogger.com वर ब्लॉग बनवा”

  1. Pingback: ब्लॉग मधून पैसे कमवण्याचे वेगवेगळे पर्याय जाणून घ्या | How to Make Money by Blogging?

  2. Pingback: होस्टिंग म्हणजे काय ? ब्लॉगसाठी संपूर्ण माहिती | Hosting Meaning in Marathi

  3. Pingback: ब्लॉग वर 1000+ डेली ट्रैफिक कसे आणायचे | How to Increase Traffic on Blog in Marathi - Maza Blog

  4. Pingback: गुगल ट्रेंड्स ब्लॉगरसाठी वरदान | How To Use Google Trends In 2023 Free Tool

  5. Pingback: 6 महिन्यांपासून शून्य ट्राफिक आहे मी माझ्या ब्लॉग वर 5000 डेली ट्राफिक आणू शकतो का ? Best Marathi Guidelines For Blog - Maza Blog

  6. Pingback: 10 हजारात सुरु करा तुमचा केक व्यवसाय | Cake Business Information In Marathi 2023

  7. Pingback: Types Of Hosting In Marathi | होस्टिंग चे विविध 4 प्रकार | Free Blog Information

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
1 + 15 =