ice cream recipe In Marathi homemade आईस्क्रीम रेसिपी

Ice Cream Recipe In Marathi | घरीच बनेल विकतसारखी आईस्क्रीम

उन्हाळा सुरु झाला की सगळ्यांना आठवते ती म्हणजे आईस्क्रिम. अगदी सकाळ, दुपार, संध्याकाळ अश्या तिन्ही ही वेळेला ते मिळालं तरी आपण ते खायला कंटाळत नाही . लहान मुलांची पण आईस्क्रिमसाठी विशेष डिमांड असते. म्हणूनच तर प्रत्येक वेळेला बाहेर जाऊन आईस्क्रिम खाण्यापेक्षा आपल्या घरीच ही खास रेसिपी करून बघुयात .
ice cream recipe In Marathi homemade आईस्क्रीम रेसिपी chocolate

बाकीच्या इतर रेसिपी प्रमाणे आपण जेव्हाआईस्क्रिम बनवतो, तेव्हा त्यामध्ये खूप वेगवेगळ्या पावडरचा वापर करावा लागतो . आणि विशेष म्हणजे त्यांच प्रमाण पण परफेक्ट जमलं तरच आपण बनवलेले आईस्क्रिम छान सेट होतं. या पद्धतीने एकदाच आईस्क्रिम करून बघा. विकतचं आणलेले आईस्क्रिम तुम्ही खायचं विसरून जाल. अगदी बाजारातील दुकानांमध्ये मिळतात अगदी तसेच ब्रॅण्डेड आईस्क्रिम घरच्याघरी तयार होईल .

प्रमाणामध्ये जर चूक झाली तर आईस्क्रिमचीही पुर्ण वाट लागते. शिवाय अगोदर दूध आटवून घ्या आणि नंतर वेगवेगळ्या पावडर टाकून ती ४ तासासाठी सेट करा. त्यानंतर परत फ्रिजरमधून बाहेर काढून त्यामध्ये ब्लेंडर फिरवा आणि त्यानंतर परत सेट करायला ठेवा . असे कुटाणेही करावे लागतात. एवढं सगळं करून देखील आईस्क्रिम छान सेट होईल कि नाही .

त्यामध्ये बर्फ जमणार नाही, याची काहीही गॅरेंटी नसते. त्यामुळेच या पद्धतीने आईस्क्रिम करण्याचा खरोखरं खूपच कंटाळा येतो . म्हणूनच आईस्क्रिम तयार करण्याची ही अगदी सोपी अशी रेसिपी एकदा बघा आणि लगेच ट्राय करून बघा .

१ ग्लास दूध , एक ग्लास व्हिप्ड क्रिम , आणि अर्धी वाटी मिल्क पावडर .

ice cream recipe In Marathi homemade आईस्क्रीम रेसिपी chocolate

ice cream recipe In Marathi homemade आईस्क्रीम रेसिपी chocolate

आईस्क्रिम असे बनवा :

दूध आधी उकळून थंड करून घ्या.

एक ग्लास दूध असेल तर त्यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर टाका.

मिल्क पावडर एकदाच सगळी ओतू नका. हळू हळू टाकून त्यात गोळे होणार नाहीत याची काळजी घ्या .

त्यानंतर एका भांड्यात एक ग्लास व्हिप्ड क्रिम घ्या आणि ब्लेंडरने फेटून सेट करून घ्या.

व्हिप्ड क्रिम छान फुलून आले की त्यात थोडा स्टिफनेस आला की तयार झाले असे समजावे.

ice cream recipe In Marathi homemade आईस्क्रीम रेसिपी chocolate

नंतर त्यामध्ये मिल्कपावडरचं दूध घाला. परत एकदा सगळं मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या.

हे तयार झालं आपलं प्लेन व्हॅनिला आईस्क्रिम तयार.

ice cream recipe In Marathi homemade आईस्क्रीम रेसिपी chocolate

व्हिप्ड क्रिममध्ये जेव्हा आपण मिल्क पावडर घातलेलं दूध टाकतो . तेव्हा आपल्याला पाहिजे तो फ्लेवर टाकून सगळं मिश्रण एकत्र फेटावे . एअर टाईट डब्यामध्ये घालून ७ ते ८ तासांसाठी आईस्क्रिम सेट करायला ठेवून द्या. आपले उत्कृष्ट आईस्क्रिम तयार.

फ्लेवर आईस्क्रिम रेसिपी :

मँगो फ्लेव्हर- आंब्याचे तुकडे , आंब्याचा रस, आणि खाण्याचा पिवळा रंग .
गुलकंद फ्लेव्हर- खाण्याचा गुलाबी रंग आणि गुलकंद .
फ्रुट ओव्हरलोड- फळं , वेगवेगळे ड्रायफ्रुट्स.
चॉकलेट फ्लेव्हर- चोको चिप्स आणि कोको पावडर .
कोकोनट फ्लेव्हर- नारळाचे काप आणि नारळाचं दूध.

ice cream recipe In Marathi homemade आईस्क्रीम रेसिपी chocolate

स्वादिष्ट बासुंदी घरी बनवायची आहे ? रेसिपी वाचण्यासाठी क्लिक करा.

पुरणपोळीचा बेत अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपी शिवाय पूर्ण होणारच नाही. क्लिक करा.

बाळगुटी म्हणजे काय ? आणि त्याचा वापर कसा करावा ?

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

As you found this post useful...

Follow us on social media!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
20 − 6 =