Full Information About Buttercup In Marathi हा Article वाचून तुम्हाला Buttercup बद्दल कुठल्याही शंका – कुशंका राहणार नाही याची आम्ही शास्वती देतो.
Information About Buttercup In Marathi

बटरकपचं शास्त्रीय नाव Ranunculus असे आहे. या Ranunculus वंशामध्ये 400 पेक्षा अधिक प्रकारच्या जाती आढळतात त्यामधून बटरकप हे प्रसिद्ध आहे. हि एक प्रकारची फुल धारण करणारी वनस्पती आहे. ज्याला पांढरे किव्वा पिवळे फुलं येतात. आणि त्या फुलांचा आकार हा एखाद्या कपासारखा असतो त्यामुळेच याला बटरकप या नावाने ओळखले जाते. या फुलांची झाडे मुख्यतः उन्हाळ्यात होतात. पूर्वी या फुलांची झाडे गडकिल्ल्यांच्या तटावर सर्रास बघायला मिळत होते. ह्याची फुले जंगलात किंवा निसर्गाच्या सानिध्यात लागत असले तरी देखील यांची लागवड घरात किंवा एखाद्या बागेत लागवड करू शकतात.
बटरकप या फुलांची झाडे विविध प्रकारची असतात आणि ते जगातील विविध भागात आढळून येतात. त्यांच्या रंग आणि त्यांचा आकार हा त्यांच्या प्रकारावर अवलंबून असते. या वनस्पती चे फुलं हे खूप आकर्षित असतात आणि ते उत्सवातील वातावरणाला चमकदार बनवतात. यासोबत च त्यांची फुले हे अनेक आजारांवर उपचार म्हणून वापर करता येतात मात्र हे फुल विषयुक्त असतात त्यामुळे यांचा सेवन करता येत नाही.
बटरकपची उत्पत्ती कशी झाली?
तुमच्या मनात एक प्रश्न पडला असेल की या फुलांना बटरकप हे नाव का पडले तर पुराणात याबद्दल एक आख्यायिका आहे त्यानुसार आम्ही तुम्हाला सांगतोय.
यां फुलांना Ranunculus असे देखील संबोधले जाते. तर एका आख्यायिका नुसार Ranunculus नावाचा एक मुलगा होता तो खूप सुंदर गाणं गात होता. एकदा त्याने विचार केला की आपल्या सुंदर आवाजाने आपण लाकडाच्या पक्षांना प्रभावित करू मात्र लाकडी पक्ष्यांना प्रभावित करता करता तो स्वतःच आपल्या सुंदर आवाजाने प्रभावित झाला आणि तिथेच तो कोसळून मरण पावला.
काही दिवसाने त्या ठिकाणी काही सुंदर फुलांची झाडे आलीत आणि त्यांना सुंदर सुंदर फुले लागलीत त्यामुळे त्या फुलांना Ranunculus हे नाव पडलं. दुसऱ्या एका आख्यायिका नुसार एकदा काही गायींनी त्या झाडाची पाने आणि फुले खाल्ली त्यामुळे त्यांनी दूध भरपूर प्रमाणात दिले त्यामुळे देखील यांचं नाव बटरकप असं पडलं.
बटरकप म्हणण्याचा अर्थ काय आहे?
कित्येकदा आपल्या ऐकण्यात किंवा बघण्यात गेलं असेल की एखादा व्यक्ती आपल्या प्रिय व्यक्तीला बटरकप म्हणून हाक मारतो. तर त्याचा नेमका अर्थ काय? याबद्दल तुम्हा नक्कीच कधीतरी प्रश्न पडला असेल तर अजिबात काळजी करू नका कारण आम्ही तुम्हाला असे म्हणण्याचा अर्थ काय आहे? याबद्दल तुम्हाला सांगतो.
बटरकप हा शब्द स्नेह म्हणजेच प्रेमाचा शब्द म्हणून वापरला जातो. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला बटरकप असं म्हटलं तर ती व्यक्ती तुमच्या अपरंपार प्रेम करते करते आणि हे सांगण्यासाठी तुम्हाला असे म्हणत आहे. कारण त्या व्यक्तीसाठी तुम्ही असे व्यक्ती आहात जी व्यक्ती नेहमी इतरांची काळजी घेते आणि यासोबतच अशा व्यक्तींची देखील काळजी घेते ज्या व्यक्तीने तुमच्यावर खूप अन्याय केले आहेत.
बटरकप ने नुसतं एक नाव नसून ते टोपण नाव पेक्षा देखील मोठ्ठं आहे. हे नाव एकमेकांप्रती प्रेम आणि आपुलकी आहे हे सांगण्यासाठी वापरला जातो.
Uses Of Buttercup Flowers । बटरकपचे उपयोग

या फुलांचे अनेक उपयोग आहेत जसे की वर सांगितलेल्या प्रमाणे एखाद्या आजाराचा उपचार करण्यासाठी वापर केला जातो यासोबतच वाढदिवसाचे फुल म्हणून सुद्धा वापर केला जातो तसेच एखाद्या कार्यक्रमात भेटवस्तू म्हणून देता येते आणि या फुलांचा वापर एखाद्या उत्सवातील सजावट करण्यासाठी सुद्धा या फुलांचा वापर केला जातो. ते आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात…..
१. आजारांचा उपचार:-
संधिवात, मज्जातंतूचे दुखणे, त्वचा विकार आणि ब्राँकायटिसची सूज, जळजळ अशा अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी बटरकपच्या फुलांचा वापर केला जातो यासोबतच मानसिकरित्या आजारी असलेल्यांना देखील बरं करण्यासाठी या फुलांचा वापर केला जातो. त्यामुळेच या फुलांना शेक्सपियर यांनी “कोकिळाकळ्या” हे टोपणनाव दिलं. या फुलांना खाता येत नाही कारण यांची ताजी फुले फार विषारी असतात.
२. वाढदिवसाचे फुल:-
या फुलांना जानेवारी मध्ये म्हणजेच नवीन वर्षात बहर येतो त्यामुळे ही फुले यश आणि कल्पकतेचे प्रतीक आहे आणि ही फुले एखाद्याच्या वाढदिवशी त्यांना भेट दिली तर नक्कीच ही भेट त्यांच्यासाठी एक आदर्श ठरेल.
३. भेटवस्तू
कुणाचा स्वागत समारंभ असेल किंवा कुणाच्या घरी काही कार्यक्रम असेल तर त्यांना ही फुले भेट म्हणून देतात येऊ शकता. यांची फुले जंगलात किंवा निसर्गात लागत असली तरी देखील यांची लागवड घरात किंवा बागेत सहज करता येऊ शकते.
४. सजावटीसाठी उपयोग:-
कुठं एखादं छोटं असो की मोठ्ठं असो उत्सव असेल तर तो उत्सव अधिक आकर्षित वाटावा यासाठी त्याला सजावट करावी लागते. आणि त्यासाठी हि फुले उत्तम आहेत. कारण ही फुले फार आकर्षक असतात आणि त्यामुळे त्या उत्सवाला अधिक आकर्षित आणि चमकदार बनवितात. त्यामुळे यांचा वापर सजावटीसाठी देखील केला जातो.
Conclusion:-
तर मित्रांनो आम्ही तुम्हाला प्रस्तुत Article च्या माध्यमातून Buttercup बद्दल संपूर्ण माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलो आहोत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला Comment Box मधून नक्कीच कळवा तसेच प्रस्तुत Article तुम्हाला आवडला असेल तर share करायला विसरू नका. जर तुमच्या मनात Buttercup बद्दल आणखी काही शंका – कुशंका असतील तर आम्हाला Comment व्दारे नक्कीच कळवा. आम्ही तुमच्या मनातील सर्व शंका – कुशंका पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
Author:- आशु छाया प्रमोद (रावण)

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह