inspirational marathi kavita

आयुष्य जगत असतांना आणि जगण्यासाठी न्याय | 2 Best inspirational marathi kavita

अब्दुल करीम शमशुद्दीन सय्यद आणि छाया नाळे भुजबळ यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत inspirational marathi kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

inspirational marathi kavita

काव्यबंद समूह आयोजित
काव्यलतिका साप्ताहिक स्पर्धा.
रविवार दि. १/१०/२०२३
विषय – आयुष्य

आयुष्य जगत असताना | inspirational marathi kavita

आयुष्य जगत असतांना आणि जगण्यासाठी न्याय | 2 Best inspirational marathi kavita

आयुष्य जगत असताना
मन माझं जळत गेलं
जगता येत नाही मर्जीने
हे मात्र कळत गेलं…. १

कोणी तरी म्हटलं होतं
आयुष्य खूप सुंदर आहे
अथांग सागर सृष्टी मध्ये
आयुष्य एक बंदर आहे.. २

आयुष्याचे चढ उतार
तेव्हा मला माहीत झाले
मौज वाटणारे आयुष्य माझे
जेव्हा संकट घेऊन आले… ३

पाऊलवाटा आयुष्याच्या जाती
सुख दु:खाच्या वळणात
जन्म मृत्यूचे गणित
सुटे सरणाच्या जळणात.. ४

कोणीतरी साथ द्यावी
आयुष्य हे जगताना
सारं काही विसरून जातं
कुणीतरी प्रेमानं बघताना ५

मैत्रीचा एक कोपरा
आयुष्यात भरून ठेवा
बारा भानगडी होऊ द्या
मित्र गोळा करुन ठेवा… ६

जवा एवढ्या सुखासाठी
खप खप खपावं लागतं
आनंदाच्या क्षणांना मात्र
हृदयाच्या कप्यात जपाव लागतं ७

आयुष्य जगताना मित्रांनो
ठेचा लागतात रे फार
आपल्या पाठीत आपलेच
खंजीराने करतात वार … ८

जीवन मरणाच्या मधलं
आयुष्य खूप खडतर हाय
हसून खेळून जगा आज
उद्याचा काय भरोसा नाय.. ९

आयुष्याने मला मित्रांनो
खूप काही शिकवलं
कच्चा लिंबू म्हणून जगलो
मरताना अनुभवाने पिकवलं.. १०

अब्दुल करीम शमशुद्दीन सय्यद
पंढरपूर
७०३८३१३२३५
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

inspirational marathi kavita

काव्यबंध समुह आयोजित कविता स्पर्धा
कवितेचा विषय:-आयुष्य


जगण्यासाठी न्याय | inspirational marathi kavita

जगण्यासाठी न्याय | 2 Best inspirational marathi kavita

आम्हां बालकांना हवं ते काय
जगण्यासाठी तो न्याय
भविष्य तुमच्या हाती देतो
पोरके आम्ही साद घालतो

थोडेसे दुःख हलके होईल
सुख आमच्या दारी येईल
जीवनाची ती दोरी
मदतीने धीर देईल

उपकार जन्मदात्यांपासून
सांभाळकर्त्यांपर्यंत राहतील
आमच्या कटू इतिहासात
एक नवी आशा देतील

इथे आमच्या जीवास एक
आशेचा किरण मिळतोय
माते सवे पित्याचा खरा
अर्थ तो कळतोय

सुरु आता आमची एक
आयुष्याची खरी कहाणी
लढताना कठोर युद्ध
नयनी ते पाणी

स्वीकारले आता आम्ही
अस्तित्व ते सत्य स्वरूपाचे
खऱ्या विजयाचे प्रतीक आहे
आमच्या या जीवनाचे

भिती ,दुःख ,वेदना ,व्यथा
आधाराने या खरंच कमी झाल्या
नवकिरणांसवे आमच्यासाठी
त्या दिशा धावत आल्या

आता फक्त महत्त्वाचा वर्तमान
विसरूनी भूतकाळ भविष्याची आस
श्वासा श्वासाबरोबर आला
फक्त एकच ध्यास

जगण्यासाठी न्याय मिळाला
असाच मिळत राहो
आम्हा सारख्या पोरक्या जीवांचे
जीवन उजळत राहो
जीवन उजळत राहो

छाया नाळे (भुजबळ) सातारा

 Best inspirational marathi kavita

inspirational marathi kavita

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *