Internet love poem marathi in 2024

प्रेम म्हणजे प्रेम असतं | best Internet love poem marathi in 2024

सुवर्णा बाबर यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Internet love poem marathi in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Internet love poem marathi in 2024

काव्यबंध समूह आयोजित उपक्रम
विषय -ऑनलाइन प्रेम
दिनांक- 10 मार्च 2024

प्रेम म्हणजे प्रेम असतं | Internet love poem marathi in 2024


प्रत्यक्षात कधी भेट झालीच नाही
दोघांच्या नजरा कधी भिडल्याच नाही
भेटले ते फक्त शब्द शब्दांना
अन् सुरु झाली ऑनलाईन प्रेम कहाणी …१

हाय, हॅलो पासून ते जेवलास का?
देवाण घेवान आवडी निवडींची होतसे
वेळ झाला किती जेवलीस का?
रुप नवं प्रेम ऑनलाईन घेतसे …२

गप्पा गोष्टीत कितीसा जाई वेळ
बिघडला कामाचा थोडा ताळमेळ
एक शब्द तू, एक मी लिहू
ऑनलाईन प्रेमाची सुरू करू नवी ओळ …३

आता थोडं मन आतुर होई
तुला पाहण्यासाठी
ओढ कशी ही वाढत जाई
ऑनलाईन प्रेम झुरते मग भेटण्यासाठी …४

विश्वास ठेवायचा कसा ऑनलाइन प्रेमावर
इथे ना भेटण्, ना नजरेच नजरेशी मिलन
दाखवू दुनियेला तरीही
प्रेम खरं ऑनलाईन निभावून …५

प्रीतीच्या उच्च शिखरावर
झेंडा प्रेमाचा आपल्या फडकवू
ऑनलाईन प्रेमाचे तू
कृष्ण – मी राधा होवू …६

आहेचं वेगळं थोडं ऑनलाईन प्रेम
आहे जरा जगा निराळचं
सोशल मिडियाचा जरा जास्तच बाजार
बंधन नाही इथं कशाचचं …७

तरीही मनाला का भावत प्रेम हे
कारण इथं फक्त वजन शब्दांच
शेवटी काय हो प्रेम म्हणजे प्रेम असतं
ऑनलाईन, तरीही आहेचं झुरणं मनाचं …८


सुवर्णा बाबर, पुणे

Internet love poem marathi in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *