Jahirat Lekhan In Marathi जाहिरात लेखन कसे करावे

Jahirat Lekhan In Marathi जाहिरात लेखन कसे करावे

आजच्या स्पर्धात्मक युगात मराठीमध्ये जाहिरात लेखनाला खूप महत्त्व आहे. जाहिरात म्हणजे आपल्या उत्पादनाकडे सर्वांचे लक्ष वेधून घेणे. आकर्षक जाहिरात ही एक सर्जनशील कला आहे. आणि त्यामध्ये प्रभुत्व मिळवणे हे एक कौशल्य आहे. एखाद्या उत्पादनाची लोकांच्या मनात रुची निर्माण करणे . तसेच त्याकडे लोकांचे लक्ष वेधून घेणे हा जाहिरातींचा मुख्य उद्देश असतो. तुमचे उत्पादन हे चांगले विकले जात आहे हे सांगण्याचा उत्तम मार्ग म्हणजे जाहिरात हा होय . आजच्या संगणक तसेच माहिती तंत्रज्ञानाच्या युगात, इंटरनेट तसेच मोबाईल फोनमधील क्रांतीमुळे जाहिरातींचा आवाका व्यापक झाला आहे. जाहिरात लेखन मराठी 10वी jahirat lekhan marathi jahirat lekhan

जाहिरात प्रस्तावना

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण अनेक वेगवेगळ्या वस्तू वापरतो. त्या वस्तू आपण तयार करीत नाही. म्हणून आपल्या गरजेच्या वस्तूसंबंधात आपल्याला काही माहिती हवी असते.
१) आपल्याला लागणारी वस्तू कोण निर्माण करते?
२) ती वस्तू कितपत आपल्या गरजा भागवते?
३) तीच वस्तू कुठे मिळते?आणि त्याची किंमत काय?
४) वरील सगळी माहिती पुरवणारा मजकूर म्हणजे ‘जाहिरात’ होय. आपल्याला हव्या असलेल्या वस्तूची माहिती या जाहिरातींमार्फत मिळते. म्हणजेच,
जाहिरात आपले लक्ष वेधून घेते. लोकांना हव्या असलेल्या वस्तू निर्माण करणारा आणि तिथे पोहचवणारा तो निर्माता होय.
निर्मात्याने एखादी वस्तू निर्माण केल्यावर ती वस्तू लोकांनी खरेदी करणे आवश्यक असते. म्हणून वरील सगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी लागते.

वरील सगळी माहिती पुरवणाऱ्या मजकुरालाच जाहिरात म्हणतात. वस्तूचा निर्माता व ग्राहक यांना जोडून देण्याचे काम जाहिरात करते.

आपण निर्माण केलेली वस्तू ही जास्तीत जास्त ग्राहकांनी खरेदी करावी, असे प्रत्येक निर्मात्याला वाटत असते. म्हणूनच जाहिरात आकर्षक करावी लागते.
एकाच प्रकारची वस्तू निर्माण करणारे खूप निर्माते असतात. अशा वेळी आपली वस्तू जास्तीत जास्त ग्राहकांनी घ्यावी, असे निर्मात्याला वाटत असते. म्हणूनही आपली जाहिरात आकर्षक करावी लागते. जाहिरात लेखन मराठी 10वी jahirat lekhan marathi jahirat lekhan

विविध मार्ग आहेत जाहिरात करण्याचे . मार्ग कोणताही असला, तरीसुद्धा प्रथम ती जाहिरात लिहूनच काढावीच लागते.

जाहिरात माध्यम

इंटरनेट,चित्रपट,वृत्तपत्रे ,मासिके ,आकाशवाणी ,चौकांमधील फलक ,गर्दीच्या ठिकाणी वाटली जाणारी पत्रके किंवा विझिटिंग कार्ड , दूरदर्शन इत्यादी

Jahirat Lekhan In Marathi जाहिरात लेखन कसे करावे

जाहिरात बनवताना घ्यायची काळजी १

१. जाहिरात तयार करताना अगोदर मथळा, उपमथळा तयार करावा.
२. जाहिरात ही नेहमी कमीत कमी शब्दांमध्ये असावी.
३. जाहिरातीची भाषा ही साधी, सोपी, पण वेधक असावी.
४. जाहिरातीमध्ये व्यवहारातील भाषा वापरली तरी चालते .
५. जाहिरातीमधील भाषा क्लिष्ट, किचकट, किंवा बुद्धीला ताण दयायला लावणारी नसावी.
६. जाहिरातीमधल्या तपशिलामध्ये सुभाषिते , सुवचने , प्रसिद्ध गाण्याच्या ओळी, कवितेतल्या ओळी, काव्यमयतेचा आभास निर्माण करणाऱ्या ओळी,
लोकांमध्ये लोकप्रिय असलेले शब्दप्रयोग इ. चा उपयोग करावा.
७. समाजामधील प्रचलित संकेत, लोकभावना यांना धक्का देणारी भाषा नसावी. जाहिरात लेखन मराठी 10वी jahirat lekhan marathi jahirat lekhan

८. जाहिरात अर्थपूर्ण , वेचक आणि प्रसन्नता निर्माण करणारी असावी.
९. जाहिरात परिणामकारक आणि सुसंवाद साधणारी असावी.
१०. त्यामध्ये विनोदाची पखरण करता आल्यास उत्तम.
११. जाहिरातीला चित्राची जोड देता आली तर जाहिरात अधिक प्रभावी होते. मात्र जाहिरातलेखनामध्ये चित्रे काढणे किंवा चित्रकलात्मक सजावट करणे हे
परीक्षेत अनिवार्य नाही.
१२. जाहिरातीचे भाषिक रूप हे महत्त्वाचे आहे. साध्या चौकटीमध्ये योग्य ओळीत केलेली मांडणी पुरेशी असते.
१३. जाहिरातीमध्ये शक्य असल्यास कंपनीची मुद्रा तयार करावी.
१४. तसेच जाहिरातीमध्ये कंपनीचे नाव व पत्ता ठळकपणे लिहावा. जाहिरात लेखन मराठी 10वी jahirat lekhan marathi jahirat lekhan

Post Office Vima फक्त ₹ 399 ची विमा योजना

लहान मुलांच्या आरोग्य विषयक ब्लॉग्स वाचण्यासाठी क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *