यश म्हंटल्याने मिळत नाही तर यश मिळवण्यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागते. असे ठामपणे सांगणारे Pandit Jawaharlal Nehru Marathi Mahiti आपण पाहणार आहोत.
Jawaharlal Nehru Marathi Mahiti

जीवनामध्ये यश मिळवायचं असेल तर अतोनात प्रयत्न आणि एकवटलेला ध्येय, स्वतःचे तयार केलेले तत्व असायला हवे. तेव्हाच आपण जीवनामध्ये यश मिळू शकतो. मात्र यशस्वी मनुष्य हा विचाराने वैचारिक असेलच असे नाही ,म्हणून जेवढे आपले मोठे यश असेल तेवढेच आपले विचार देखील मोठे असायला हवे असे पंडितजी ठामपणे सांगत असत. एवढंच नाही तर ,समाजामध्ये एक आदर्श व्यक्ती म्हणून कसं जगायचं आणि आपलं व्यक्तिमत्व कसं निर्माण करायचं. याबद्दल जवाहरलाल नेहरू नेहमीच सांगण्यासाठी तत्पर असायचे.
जवाहरलाल नेहरू हे राजकारणी होते, इतकच नाही तर विविध प्रकारच्या वाईट गोष्टींचा ते नेहमीच विरोध करत .समाजामध्ये शांती कशी प्रस्थापित होणार. आणि समाजातील लोकांचे दुःख कसे दूर करता येईल यासाठी नेहमी ते त्या प्रयत्नात असायचे. त्यांना धर्मनिरपेक्ष ,समाजवादी आणि प्रजासत्तकाचे महत्त्वाचे शिल्पकार देखील म्हटले जाते.
पंडित नेहरूंना आधुनिक भारताचे शिल्पकार देखील म्हटले जाते. त्यांना मुलांची खूप आवड होती, त्यामुळे मुले त्यांना चाचा नेहरू म्हणायची. त्यामुळे त्यांचा वाढदिवस ” बालदिन ” म्हणूनही साजरा केला जातो .
पंडित नेहरूंना लहान मुले खूप आवडायची. त्यांच्यासोबत खेळणे ,त्यांना दोन तत्त्वाच्या गोष्टी सांगणे आणि समाजामध्ये एक उत्तम नागरिक कसं बनता येईल आणि त्यासाठी काय करावे लागेल? याचे ते नेहमी शिक्षण द्यायचे. त्यांचा जन्मदिवस हा बाल दिवस किंवा बाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
जवाहरलाल नेहरू म्हणायचे की अभ्यासामध्ये हुशार नसलेला विद्यार्थी हा समाजामध्ये एक आदर्श नागरिक बनू शकतो. म्हणून कोणत्याच विद्यार्थ्याला कमी लेखू नका.
पंडित नेहरू यांचे प्रारंभिक जीवन | Early Life Of Pandit Jawaharlal Nehru
14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद या ठिकाणी काश्मिरी ब्राह्मण या छोट्याश्या कुटुंबामध्ये जवाहरलाल नेहरू म्हणजेच महान विचारवंत ,उत्तम लेखक, आणि राजकारणी असलेल्या या बालकाचा जन्म झाला. पंडित नेहरू यांचे वडील सुप्रसिद्ध बॅरिस्टर होते. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित मोतीलाल नेहरू होते. इतकच नाही तर ते समाजामध्ये एक कार्यकर्ता म्हणून त्यांची प्रसिद्धी होती. त्यांची आई श्रीमती स्वरूप राणी जी एक ब्राह्मण काश्मिरी कुटुंबातील होती.
जवाहरलाल नेहरू हे घरामध्ये सर्वात मोठे होते. त्यांना आणखी दोन भावंडे होती. नेहरूंना एक बहीण होती त्या बहिणीचे नाव विजयालक्ष्मी होते .त्या संयुक्त राष्ट्राच्या महिला अध्यक्ष होत्या . आणि त्यांच्या सर्वात लहान बहीण म्हणजेच कृष्णा हथिसिंग होते .त्या कवियत्री आणि झुंजार लेखिका होत्या.
त्यांच्या धाकट्या बहिणीने म्हणजेच कृष्ण हथिसिंग यांनी पंडित नेहरू यांच्या जीवनावरील अनेक पुस्तके लिहिले. आणि त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
पंडित जवाहरलाल नेहरूंचे प्रारंभिक शिक्षण | Early Education Of Pandit Jawaharlal Nehru
पंडित जवाहरलाल नेहरूंना 1905 मध्ये इंग्लंडमध्ये असलेली हॅरो स्कूलमध्ये शिकण्यासाठी पाठवण्यात आले. मात्र सुरुवातीचे शिक्षण आणि बेसिक नॉलेज हे त्यांना घरीच मिळाले होते.
कायद्याचा अभ्यास | Law Study Of Pandit Jawaharlal Nehru Information In Marathi

जवाहरलाल नेहरूंनी हॅरो मध्ये दोन वर्षे शिक्षण घेतले. त्यामध्ये त्यांनी लंडनच्या या कॉलेजमध्ये अनेक कायद्यांचा अभ्यास केला. पुढील शिक्षण त्यांनी केंब्रिज या विद्यापीठातून पूर्ण केले.
7 वर्षे इंग्लंडमध्ये राहून त्यांनी फॅबियन समाजवाद आणि आयरिश राष्ट्रवादाचीही माहिती मिळवली. आणि 1912 मध्ये ते भारतात परतले आणि वकिली करू लागले.
फेबियन समाजवाद आणि आयरिश या महत्त्वाच्या विषयाची माहिती मिळवली सोबतच त्यांनी राष्ट्रवादीची ही महत्त्वपूर्ण माहिती मिळवली त्यांनी इंग्लंडमध्ये सात वर्ष या विषयाचा अतोनात अभ्यास केला आणि स्वतःचे शिक्षण पूर्ण केले.
पंडित नेहरू यांना मिळालेला सर्वोच्च सन्मान | The Highest Honor Awarded To Jawaharlal Nehru
जवाहरलाल नेहरू यांचे मन निर्मळ होते ते गरिबांसाठी नेहमीच गरिबांच्या सुखासाठी नेहमीच झटत होते. गरिबांना कशाप्रकारे मदत करता येईल, आणि समाजामध्ये जनजागृती निर्माण करता येईल यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील होते. त्यांनी समाजामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकशाही मूल्यांबद्दल आदर निर्माण करण्याचा एक महत्त्वपूर्ण काम केलं.
विधवा महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले.
लेखक म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू
पंडित जवाहरलाल नेहरू हे केवळ एक चांगले राजकारणी आणि प्रभावी वक्ते नव्हते तर ते एक चांगले लेखकही होते. त्यांच्या लेखणीने लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचा समोरच्या व्यक्तीवर खोलवर परिणाम होत असे, सोबतच त्यांची पुस्तके वाचण्यासाठी लोक खूप उत्सुक होते. त्यांचे आत्मचरित्र 1936 मध्ये प्रकाशित झाले.
जवाहरलाल नेहरू अतिशय हुशार होते. इतकंच नाही तर ते प्रभावी वक्ते म्हणूनच ओळखल्या जात नव्हते तर एक उत्कृष्ट राजकारणी, चांगले लेखक, त्यांच्या लेखणीत समाजामध्ये बदल घडवून आणण्याचं सामर्थ्य होतं .त्यांना विविध प्रकारचे पुस्तक वाचण्याची आवड होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आत्मचरित्र हे १९३६ मध्ये प्रकाशित झाले.
पंडित जवाहरलाल नेहरूंची पुस्तके | Books By Pandit Jawaharlal Nehru
जवाहरलाल नेहरूंनी लिहिलेले काही पुस्तके त्यामध्ये जागतिक इतिहासाची एक झलक, भारताची एकता आणि स्वातंत्र्य ,भारत आणि जग, सोवियेत रशिया या महत्त्वपूर्ण पुस्तकांचा समावेश होतो.
Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

समाप्त