व्यथा सैनिकाची | Best Jawanavar Kavita in 2024

सौ. सुवर्णा विश्वास पवार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Jawanavar Kavita in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Jawanavar Kavita in 2024

स्पर्धा करीता
काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका रविवारीय काव्य स्पर्धा
दि .२५ फेब्रु .२०२४

व्यथा सैनिकाची | Jawanavar Kavita in 2024

प्रिय आपला भारत देश
जगा मध्ये आहे तो महान,
क्रांतीकारी आणि सैनिकांचा
सर्वांनाच आहे अभिमान …..१

भारत मातेच्या रक्षणास
सैनिक तो निघाला लढण्या,
भारताच्या सीमेवर जाई
सीमेचे रक्षण तो करण्या ….. २

धरती मातेच्या रक्षणार्थ
येता हाक साऱ्या स्वकीयांची ,
एकजूट होऊनिया सारे
धुळदाण करण्या शत्रूंची…..३

होता हल्ला छुप्या शत्रूंचा
उपासी पोटी खडा पहारा,
रात्रंदिन ठेवण्या नजर
त्यांना कुठे मिळे ना सहारा….४

चालला तयार होऊन तो
घालूनी सैनिकी पेहराव ,
छाती ती पुढे ऐटीत चाले
जसा शोभे तो साहेबराव…….५

करी आरती सहचारीणी
टिळा लावीते सैनिका भाळी ,
स्वतःचे पुसुनी टाकीते ती
मळवट आपल्या कपाळी……६

बिलगे पोर ओढूनी पाय
जाऊ नका आम्हास सोडून,
सैनिकाचा पोरासाठी जीव
आतल्या आत जाई ओढून …..७

देई आशिर्वाद मातापिता
ये तू लवकर परतून ,
तुझ्याचसाठी माझ्या लेकरा
आमचा जीव जाई तुटून…….८

घरच्यांच्या डोळा येई पाणी
निघाला भारत रक्षणार्थ ,
उन पावसात उभा राही
सैनिकाचा अभिमान सार्थ…. ९

अन्नपाणी नसे वेळेवर
खडा पहारा देत राहतो ,
हाती बंदूक घेऊन सदा
दुश्मनांवर फैरी झाडतो ……१०

व्यथा सैनिकाची कोण जाणे
कधी कुणा कशी कळणार,
आम्हा नागरिका रक्षणार्थ
तोच जीवानिशी लढणार…..११

सारे भारताचे रहिवाशी
करू सैनिकांचा सन्मान,
सैनिकच आहेत आपल्या
भारत देशाचा अभिमान…..१२

सौ . सुवर्णा विश्वास पवार , इचलकरंजी
मो . नं . 9960301408

Jawanavar Kavita in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *