रवींद्र आटे आणि बी.डी.घरत यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Jivan Gane Marathi Kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
🌻 माझ्या अंगणी 🌻 Jivan Gane Marathi Kavita

काव्याचा सडा पडला माझ्या अंगणी
दुरून मज खुणावते आकाशी चांदणी
ओंजळ भरून घ्यावी जीवन गाण्यांनी
दुःखाचेच गाणे गाऊ नये शहाण्यांनी
कष्ट आणि वेदना विसरून जाव्यात
गंध फुलांची करीत जावी पेरणी
व्यथांचे बुजगावणे टांगावे वेदनांच्या शेतात
त्याच्या सदरावर काढावी रांगोळी फुलांनी
जेव्हा चिमण्या गातील सुरील्या गजला
तुही छेडावी चेतनेची तार आसमानी
विरघळून जरी गेलीत कितीही गाणी
नव्या गाण्यांची करीत जावी आखणी
कधी कधी वादळाच्या दिशेने जाताना
मुठीत घट्ट पकडावा इंद्रधनुष्य श्रावणी
नदीच्या काठावर बसुनी दूरच्या क्षितिजाची
नजरेच्याही पल्याड करावी देखरेख निगराणी
सामसूम होता होता काजळ रात्रीची
सुगंधाने दरवळून उठे मग रातराणी
पंख फुटता प्रतिभेला घ्यावे कवेत
स्पर्शूनी हृदयास ठेवावे उरी धरुनी
तुझ्या शब्दांचं चांदणं पसरता चोहीकडे
अर्थांसवे शब्द आले माझ्याकडे धावूनी
काव्यबंधच्या मधुर बंधनात होऊनी बंदिवान
गातच राहावे वाऱ्यासोबत अशीच जीवनगाणी
💐💐💐💐💐💐
✍️रवींद्र आटे
माझ्या अंगणी आणि मानवी जीवन | Best Jivan Gane Marathi Kavita 2023
काव्यबंध साहित्यिक व्यासपीठ आयोजित…
🌷काव्यलतिकि स्पर्धा
😊😌 विषय..जीवनगाणे
मानवी जीवन | Jivan Gane Marathi Kavita

उत्पत्ती स्थिती नी लय निसर्गक्रम आहे
मानवी जीवन तर क्षणभंगुर भ्रम आहे
सुख दुःख सा-यां वाट्यास येतातच बरे
तो तर जीवनाचा एक घटणाक्रम आहे
प्रत्येक जन सुखाचाच शोध घेत आहे
जीवन सुख दुःखाचे वस्त्र तलम आहे
कुणीही पैसा साथ आनत नं नेत नाही
खरा सोबती श्वाश्वती एकची प्रेम आहे
हसतखेळत गात रहा सदा जीवनगाणे
कारण नश्वर जीवनाचा काय नेम आहे
जीवन जणू एक खेळाचीच स्पर्धा आहे
अनं सोबत अटीतटीचा डाव ;गेम आहे
मनसोक्त लाभ घेण्यासी त्या जीवनाचा
खरं गमक प्रयत्न नं अविरत श्रम आहे
😊🕺😌 बी.डी.घरत/खारकोपर/
पनवेल
माझ्या अंगणी आणि मानवी जीवन | Best Jivan Gane Marathi Kavita 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
माझ्या अंगणी आणि मानवी जीवन | Best Jivan Gane Marathi Kavita 2023