Jivan Kavita Marathi

जीवन मराठी कविता | Best Jivan Kavita Marathi 2023

सौ. अचला धनंजय धारप यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

सौ.स्मिता कुलकर्णी :- जीवन Jivan Kavita Marathi

माझे जीवन गाणे
सुख दुःखात गाणारे
कधी आनंदाने तर
कधी दुःखाचे असणारे(१)

जीवन गीत गाता
मन रंगून जाते
जीवनातील सप्त सूर गवसता
गीत मधुर झंकारते(२)

करी तरी असे अचानक तार दुःखाची छेडली जाते
अन् अचानक सूर बेसूर होतसे(३)

जीवन गाणे गात जाता
मन तव चरणी लागते
जीवनाच्या उतारावर
ध्यान तुझे ‌होतसे(४)

हे ईश्वरा तव पदी
मन माझे लागले
जीवनाच्या अखेरीस
गीत तुझे मज गाऊ दे.(५)

सौ स्मिता कुलकर्णी
हरिपूर ता मिरज जिल्हा सांगली

जीवन मराठी कविता | Best Jivan Kavita Marathi 2023

सौ. तेजस्वी सावंत-शिंदे :- जीवन

सुखाच्या हिंदोळ्यावर झुलते
कधी दुःखाच्या लाटांनी तुटते
कधी कधी खट्याळ हसते
कधी अनुभवांनी तुडुंब भरते

कधी प्रवाहासोबत वाहत जाते
कधी उनाड वाऱ्यासारखे फिरते
कधी आनंदानी घिरट्या घालते.
कधी उगाच उदास होते…..

कधी आपलेच होतात परके
आपल्याला देण्या त्रास
कधी परके होऊनी आपले
देतात साथ……

कधी संकटे घालतात घिरट्या
कधी येतो अश्रूंचा पूर…..
कधी चालताना वाटेवर
गवसतो जगण्यातला सुर………….


जीवन मराठी कविता | Best Jivan Kavita Marathi

संगीता देवकर :- आयुष्य

आयुष्य खरच सोपे नसते,इथे प्रत्येक” का” ला उत्तर नसते.
मागच्याच पाना वरुन पुढे जायचे असते,आपले भविष्य आपणच घडवायचे असते.
सुखाच्या मागे धावायचे नसते,दुखात ही आनंदाला शोधायचे असते.
मना सारखे इथे काही घडत नसते,आपणच आपल्या मनाला समजवायचे असते.
मागून कधी इथे प्रेम मिळत नसते,जितके मिळेल तितके पुरेसे असते.
तडजोडी मध्ये ही समाधान असते,कोणा आपल्या साठीच ती केलेली असते.
स्वप्नभंग तर इथे होत असतात,तरी पुन्हा पुन्हा स्वप्न पहायची असतात.
कठीण ही जीवनाची वाट असते,कधी सोबतीने तर कधी एकट्याने चालायचे असते.
क्षणभंगुर हे जीवन असते,तुझे माझे काही नसते.
असे असले तरी या,आयुष्यावर प्रेम करायचे असते.
कारण अनमोल हे जीवन पुन्हा पुन्हा मिळत नसते.

संगीता देवकर .


THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *