Jivan Poem in Marathi Language

गाऊया गीत आणि | Best Jivan Poem in Marathi Language 2023

वैशाली पडवळ ( एंजल वैशू ) आणि अनिता बर्गे भोसले यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Jivan Poem in Marathi Language विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

” गाऊया गीत ” | Jivan Poem in Marathi Language

Best Jivan Poem in Marathi Language 2023

हसूनचं गाऊया आपण जीवनगाणे
सोडूनी देऊ सारे ते दु:खाचे बहाणे

छेडूया पुन्हा एकदा सुखाचे तराणे
वय विसरून नाचू मस्त आनंदाने

बनूया वेडे असलो जरी शहाणे
मारूया फुंकर जखमेवर प्रेमाने

पळवूया वेदनांना परस्पर स्नेहाने
मनांतील अढी ही मिटवूया धैर्याने

मुहुर्तमेढ करुया नात्यांची नव्याने
राहूया सर्व मिळून पुन्हा एकोप्याने

लुटूया मजा सणवारांची हौसेने
चौकशी करू एकमेकांची मायेने

घडवूया सुंदर पिढी जरा धाकाने
घेऊया भेट जिवलगांची हक्काने

चिंता साऱ्या मिटवूया सहकार्याने
प्रश्न सोडवू एकमेकांच्या सहाय्याने

काळाशी बरोबरी करू अभिमानाने
नव्या गोष्टी आत्मसात करु प्रयत्नाने

रंग जीवनाचा पाहूया स्वाभिमानाने
जगूया जीवन सदैव आत्मविश्वासाने

गाऊया गीत रोज नवीन उत्साहाने

करु कौतुक सदा एकमेकांचे हर्षाने

स्वरचयिता ,
वैशाली पडवळ ( एंजल वैशू )
अ. होळकर नगर ( अहमदनगर )
संपर्क – ८४३३७६४२००

गाऊया गीत आणि | Best Jivan Poem in Marathi Language 2023


दुर्लभ वैवाहिक जीवन.. | Jivan Poem in Marathi Language

गाऊया गीत आणि | Best Jivan Poem in Marathi Language 2023

वैवाहिक जीवन असावे गोड
असावे निरागस भाबड
सामंजस्य विवेकपूर्ण तडजोड
असावे मोकळ तनावमुक्त हसत खेळत उघड

वैवाहिक जीवन रसाळ
गृह सौख्याचा हा खेळ
आहे बहुमुल्य दुर्मिळ
देव दुर्लभ वैवाहिक काळ

वैवाहिक गृहस्थ जीवन
भुक्ति मुक्तिचे मिलन
भुक्ति भौक्तृत्व कामविकार सेवन
मुक्ति विरक्ति मोक्ष गमन
वैवाहिक जीवन भुक्ति मुक्तीचे दालन

विवाह योग्य होता
समयानुकुल तत्वतः
तान तनाव नसता
विवाह करावा उरकता

असावी ती चतुर चपळ
देहकांति रेशमी डौल
काया रेखीव सुकोमल
पार्श्वभाग गोठिव मुखमंडल
पानीदार तजेल
ऊंची साजेसी अनुकूल

तो पन मिश्किल शांत
निरोगी काटक तंदुरुस्त
कष्टीक निर्व्यसनी मस्त
असू नये कुठलीही भ्रांत

सुंदर व्हावी वैवाहिक सुरवात
समसमान आवड दोघात
अथ पासून इथ पर्यंत
आनंदी व्हावी दिवस रात

याच आनंदासाठी वेडावला हरी
होऊन आला कृष्ण मुरारी
पोचला यशोदा नंदाघरी
चाखन्या भोगन्या भुक्तीच्या दारी

जीवन अप्रतिम वैवाहिक
प्रारंभातच करू नका चुक
प्रेम अन् विषय सेवन एक
दोहोत नाही बिलकुल फरक

हा जर साधला समन्वय
प्रेम-विषयात व्हाल तन्मय
विषय प्रेम आहे मनोमय.
भोगते मनसोक्त देह इन्द्रिय
अनुभती घेते क्षणात सर्वेन्द्रिय
आनंद समाधि सुखाचा नीरतिशय
म्हणून वैवाहिक जीवन दुर्लभ हा त्याचा आशय….

अनिता बर्गे भोसले
सातारा

गाऊया गीत आणि | Best Jivan Poem in Marathi Language 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
1 + 30 =