रमेश चव्हाण आणि अंकुश कुपले यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Jivan Gane Marathi Poem विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
आशेने मी जगतो | Jivanavar Aadharit Marathi Kavita

जीवनाच्या वाटेवर
भेटेल का कोणी मला …
थकलो मी आता ,
कोणी सांगेल का
जीवन जगण्याची नवीन कला ||1||
रोज नवी मी
बघतो एक पहाट
बघत बसतो मी
एखाद्या संधीची वाट ||२||
जमेल मला सगळं म्हणून मी
पुन्हा प्रयत्न करतो
स्वतःच स्वतःशी मी आता एकटाच लढतो ||३||
जीवनातील कोडे सोडवताना
मी सूत्र लावत होतो
संकटांना वजा करताना मी आयुष्यातील बाकी माणसं मोजत होतो ||४||
होत्याचे नव्हते झाले
तरी मी एकटाच उभा होतो आपली माणसं देतील साथ म्हणून त्यांना मी
हाक मारत होतो ||५||
थकलो मी आता
पण हरलो नाही
विश्वास आहे मला माझा
या जीवनात मी
करेल काही ना काही ||६||
हे कठीण वाटणारे जीवन आता एकट्यानेच जगायचे
ठरवलं मी आता का कुणाला उगाच दोष द्यायचे ||७||
मावळलेली पाऊले मी आता पुन्हा वाटेवर घेतो उगवेल
कधीतरी सोन्याची पहाट या आशेने मी आता परत
एकटाच जगतो ||८||
@ K. D. MESHRAM
जीवनाच्या वाटेवर | Best Jivanavar Aadharit Marathi Kavita 2023
मन करा रे प्रसन्न Jivanavar Aadharit Marathi Kavita

1.असते मन चंचल असे,
जसे वादळाचे जन जसे.
2.मनाच्या दरुणात असतो भावनांचा खेळ,
असतो किंचित राग,तर कधी किंचित सुवास.
3.मनाच्या लहरी कधी कोणाला कळले का,
उत्तुंग भरारी घेऊन कधी प्रयत्न केले का.
4.काही मन तुटली जातात,
काही मन दुखावली जातात,
तरी निःशब्द संवाद साधत राहतो.
5 अंत्क्रणाच्या मेळाव्यात अश्रूंची फुले होत जातात,
तरी का कोणास ठाऊक मनाची मोती घडवले जातात.
6 प्रेमाच्या भावना साठवून ठेवतो मनी,
किती खोड,किती राग,सगळी या मनावरची मेळ.
7.तरीही मनाला किती ही वाईट वाटले तरी,
ओंजळ भरुन वाहत जाईन,
मनाच्या तळाशी दुःख साठवून माग मात्र काढत जाईन.
8 दुखी मनाच्या समस्येवर उपाय मात्र एकच असतो,
आनंद जगाच्या मानवतेवर मन उदार थपकत राहते.
9.मनाच्या थारोळ्यात उंच उंच भरकत राहतो,
उदास चिंतन करून स्वतः ला मन प्रसन्न होऊन राहतो.
10.उगाच आठवण करून स्वतः ला मन उदास होऊन जाते,
किती तरीही वाटते मनाला मन प्रसन्न होऊन जाते.
सौरभ. संजय. दुबे
जीवनाच्या वाटेवर | Best Jivanavar Aadharit Marathi Kavita 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह