रमेश चव्हाण आणि अंकुश कुपले यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Jivan Gane Marathi Poem विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
खरे जीवन : Jivanavar Kavita Marathi

जागा सर्वांना दाखवी
असो रंक,कुणी राव
ना कळला खेळ कुणाला
यासी जीवन ऐसे नाव
कधी उन्हाचा तडाखा
कधी शीतल छाया
उलगडानार नाही कोडे
वेगळीच जीवन माया
जीवनाच्या वाटेवरती
कधी सुटणे,कधी फसणे
हसता हसता रडणे
कधी रडता रडता हसणे
झोपले जरी शरीर
जीवन डोळे जागते
क्षणोक्षणी घेती परीक्षा
पास व्हावेच लागते
खंबीर उभे राहावे
संकटे लाख येतील
घालुनी वेडा दुःखाचा
जगण्या शाप देतील
जगणे झाले कठीण
मरणं किती स्वस्त
शरीराच्या दारावरी
मृत्यू घाली गस्त
जीवनाचे हे गाणे
गातांना दम लागतो
म्हणूनच माणूस बघा
बेसूरा सारखा वागतो
काही झाले तरी मित्रा
एक सदैव लक्षात ठेवू
सुख दुःखातही दोस्ता
जीवनगाणे आनंदी गावू
समाधानाचे सूत्र जया
अंगावळणी वळले
तोचि खरा मानव
त्यासी जीवन खरे कळले
मनोहर गंगाराम राठोड पुसद जि यवतमाळ
8208861758
खरे जीवन | Best Jivanavar Kavita Marathi 2023
सप्त स्वरांचीच साथ | Jivanavar Kavita Marathi

काव्यप्रकार- अष्टाक्षरी
जीवनाच्या व्यासपीठी
रंगे मैफल सुरांची
सप्त स्वरांचीच साथ
मिळो त्याला आयुष्याची १
सांगे वरचा सा सदा
राहू तत्पर जीवनी
नको ताणतणाव तो
प्रफुल्लता सदा मनी २
त्यानंतर रे ही सांगे
अरे जीवन जगावे
सुख सर्वांना ते द्यावे
दुःख मनी ते गिळावे ३
येई स्वर ग चा कानी
नको गर्व अभिमान
स्वाभिमान सांभाळून
राख जगाचा सन्मान ४
देई आवाज म स्वर
मीतूपण नको धरू
वाग सर्वांशी आनंदे
उणेदुणे नको करू ५
देतो प ही साद सदा
प्रयत्नाला नको चुकू
यश अपयश चिंता
करूनच नको झुकू ६
कान कर मजकडे
सागे ध ही कानात
नको धरसोडवृत्ती
सदा ठेव तू ध्यानात ७
स्वर तो नि चाही मग
नको भाषा निर्वाणीची
सुखदुःख वाट सर्वां
मजा चाख आयुष्याची ८
आला खालचा सा स्वर
रहा तयार गायना
घेई तानावर ताना
नको चुकूस प्रयत्ना ९
हेच जीवन गाणे ते
मनी नेहमी जपावे
स्वररंग सदा गाऊ
असे संगीत जाणावे १०
✍️पद्माकर दत्तात्रेय वाघरूळकर (दत्तिंदुसुत) छत्रपती संभाजीनगर मो.क्र.९७३०७९८२७९🤝
खरे जीवन | Best Jivanavar Kavita Marathi 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह