Jivanavar Marathi Poem

जीवनगाणे आणि का कोणास ठाऊक? | Best Jivanavar Marathi Poem 2023

डॉ मानसी पाटील आणि सौ सुनीता जयदीप पाटील यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Jivanavar Marathi Poem विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

जीवनगाणे | Jivanavar Marathi Poem

Best Jivanavar Marathi Poem 2023

अशाच एका निवांत क्षणी
डोकावत होते मनात
सप्तसुरांचे सुरेल तराणे
चालू होते मंद सुरात…..१

पहिलाच सूर सुरेल झकास
गात होता आईबाबा
त्यांच्या सोबत घालवलेल्या
प्रत्येक क्षणाने घेतला ताबा…..२

दुसऱ्या सूर ऋषभ कोमल
भावंडे अन्‌ मैत्रिणींचा मेळा
त्यांच्या समवेतचा वेळ
नंतर रंगला नाही सोहळा…..३

कॉलेज आणि स्वप्नाळूपणा
गंधार वाजे तारुण्याचा
बघताबघता शिक्षण संपून
सौभाग्यकांक्षिणी होण्याचा…..४

मध्मम तीव्र आळवत सांगे
सांभाळ संसाराचा डोलारा
नकळत जबाबदारी घेऊन
फुलवायचा तो फुलोरा……५

चित्रपट जणू आयुष्याचा
सरकत होता पंचम लागता
अनुभवाच्या शिदोरीसह
नकळत परिपक्व होत होता….६

पुढे हळूच कानोसा घेताना
कोमल धैवत नाराज दिसला
त्याच्याकडे वळून‌‌ बघताना
थोडा जरा मलूल हासला…..७

जगलीस सगळ्यांसाठी
म्हणाला येऊ दे आत्मभान
निषाद म्हणाला गाता गाता
दे थोडं स्वतःला स्थान……८

ठाऊक नाही आता म्हणे
आयुष्याची किती वर्ष उरली
जीवनगाणे गाता गाता
वेळ झरझर उडून चालली…..९

जीवन‌गाणे ऐकता वाटे
जणू ईश्वरी कृपेचे देणे
सुरावटीची सुरेल‌ सरगम
गवसले चैतन्याचे लेणे….१०

©️®️ डॉ मानसी पाटील
मुंबई


जीवनगाणे आणि का कोणास ठाऊक? | Best Jivanavar Marathi Poem 2023

का कोणास ठाऊक?

जीवनगाणे आणि का कोणास ठाऊक? | Best Jivanavar Marathi Poem 2023

आयुष्य किती जगले यापेक्षा
आयुष्य कसं जगले
रोज रोज हेच आठवतंय
का कोणास ठाऊक
आज मागे वळून पाहावस वाटतय !!1!!

किती माणसं कमावली
आणि किती माणसं गमावली
या विचारांनी मनात काहूर उठतय
का कोणास ठाऊक
आज मागे वळून पहावसं वाटतंय!!2!!

बरंच आयुष्य जगले तरीपण
अजून खूप जगायचंय
अजून खूप काही बघायचंय
हे मनातून ओसंडून वाहतय
का कोणास ठाऊक
आज मागे वळून पाहावस वाटतंय!!3!!

आई वडिलांनी दिलेल्या संस्कारातून
सगळ्या जगाचे दर्शन घडतंय
नात्यांच्या नाजूक बंधनात
मन आपोआपच गुंतून राहतय
का कोणास ठाऊक
आज मागे वळून पहावसं वाटतंय!!4!!

आयुष्य हे आईस्क्रीम सारखं भासतय
टेस्ट केलं तरी पण विरघळतय
वेस्ट केलं तरी पण विरघळतय
का कोणास ठाऊक
आज मागे वळून पहावसं वाटतंय!!5!!
✍️ सौ सुनीता जयदीप पाटील कल्याण मुंबई
Cell :- 99204 50871

जीवनगाणे आणि का कोणास ठाऊक? | Best Jivanavar Marathi Poem 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

जीवनगाणे आणि का कोणास ठाऊक? | Best Jivanavar Marathi Poem 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
20 + 25 =