jivanavar poem in marathi

भगवंत स्वागता यावे आणि आनंद | 2 best jivanavar poem in marathi

सौ. जयश्री सं धोका आणि विद्या प्रधान यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत jivanavar poem in marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

jivanavar poem in marathi

काव्यबंद समूह आयोजित
काव्यलतिका साप्ताहिक स्पर्धा.
रविवार दि. १/१०/२०२३
विषय – आयुष्य

भगवंत स्वागता यावे | jivanavar poem in marathi

भगवंत स्वागता यावे आणि आनंद | 2 best jivanavar poem in marathi

जन्मा व्हावा कुठे,
ते आपल्या न हाती
आयुष्य असे जगावे,
जगात व्हावी कीर्ती…१

काट्या मधुनी सुखांचे
ताटवे जसे फुलती
आयुष्याचे पेले तसे,
अनुभवांनेच भरती…२

हाता दिले हे देवाने,
सत्पात्री दान कराया
सत्कर्म करोनी जावे,
सहजची पार व्हाया…३

माजं नसावा कसला,
इथेच राहील सारे
लोभाने फाटेल झोळी,
मिळेल तितके पुरे…४

मार्ग चालता चुकीचा ,
नशिबाला दोष न द्यावा
भलेपणाने वागावे,
कुणाचा रोषं न घ्यावा …५

नको स्वतःला गुंतवू,
नको वाढवू रे पसारा
दिशाहीन आयुष्याचे,
वाजती मग तीन तेरा…६

क्षण क्षण आनंदाचे,
वेचून घ्यावेत सारे
माहित ना आयुष्याची,
मिटतील केंव्हा दारे…७

वास्तव्याचा काळ इथला,
कोणासही ठाऊक नाही
नोंद चांगल्या वाईटाची,
‘ तो ‘ वरतीच घेत राही…८

माणूस म्हणुन जगताना,
आयुष्याचे सोने व्हावे
श्वास थांबता शेवटचा,
भगवंत स्वागता यावे…९

सौ. जयश्री सं. धोका
पुणे

jivanavar poem in marathi

काव्यबंध समुह आयोजित
काव्यलतिका साप्ताहिक स्पर्धा
१/१०/२०२३
विषय:- आयुष्य.

आनंद | jivanavar poem in marathi

आनंद | 2 best jivanavar poem in marathi

आयुष्य मजेत जगावे
वाटा कितीही खडतर
मार्गात काटेरी कुंपण
शांतपणे कराव्या सर. १

स्वत:चा शोधावा आनंद
दुस-याच्या आनंदातून
माणुसकीचा दृष्टीकोन
स्वार्थीपणा द्यावा सोडून. २

अहंकाराचा माज गर्व
उतरे पश्चात्तापातून
उद्धटपणाचा बुरखा
काढून टाका देहातून. ३

मन:स्वास्थ्याची होते हानी
कटू शब्द नसावा मुखी
आयुष्यभर चिंता क्लेश
वेदनेने हृदय दु:खी. ४

कर्तव्याची जबाबदारी
आयुष्यात पाडावी पार
सुंदर हिरवळ दिसे
आळसास द्यावा नकार. ५

बालपण दूजे यौवन
टप्पा महत्वाचा तिसरा
थकलेली असते काया
शोधते सुखाचा सदरा. ६

आयुष्य असे नौकेसम
दगडात ठेचकाळते
जळी जरी शांत लहरी
आतील भागी अडकते. ७

संत गुरूजनांना वंदा
गरजूंना मदत करा
आपुलकी विचारपूस
सत्कर्म पुण्य!कास धरा. ८

आयुष्यात सुख मिळण्या
ऋणानुबंध जोडा छान
देवाण घेवाण विचार
कर्तृत्वाचा मिळेल मान. ९

आरोग्यासाठी संजीवनी
फिरा वनराई हिरवी
सुख शांती समाधानात
नवचैतन्य टवटवी. १०

विद्या प्रधान
ठाणे

best jivanavar poem in marathi

jivanavar poem in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *