सौ संध्या परदेशी आणि अर्चना कुलकर्णी यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Jivangane Marathi Kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
प्रीत तुझी माझी | Jivangane Marathi Kavita

जन्मभर आहे तुझी साथ
तुझी माझी प्रेम कहाणी
कर्णी गोड वाटे तुझी वाणी
गाऊ आपण दोघेजीवन गाणी
प्रीत तुझी नी माझी
सदोदीत अशीच राहो
आयुष्यात आधार देत
दिवसागणिक बहरत जावो
तुझ्यात सामावले मी
सर्वस्व मानले तुला
संकटात सदैव पाठीशी
साथ दिली रे तु मला
बांधली रेशीम गाठी
साता जन्माचे सोबती
घेतल्या आणाभाका
तुझा हात माझ्या हाती
माझ्या मनाचे गुपित
न सांगता तुला कळते
तुझा निस्वार्थ प्रेमभाव पाहून
माझे मन गहिवरते
प्रीत तुझी माझी
आहे रे जगावेगळी
असाच आदर्श देऊ
सर्व लोकांना वेळोवेळी
आयुष्याच्या सायंकाळी
जगावे आनंदाने
घेवूनी हातात हात
सुख दुःख वाटू प्रेमाने
वय झालं म्हणून
आपण रडत बसणार नाही
सारखं दुःखी होवून
आजारी पडणार नाही
मित्रांच्या मैफलीत
छान गप्पा मारू या
राग ,द्वेष दूर सारुन
सख्यांची गळा भेट घेवून या
सौ संध्या परदेशी औरंगाबाद
प्रीत तुझी माझी आणि आयुष्याच्या सायंकाळी | Best Jivangane Marathi Kavita 2023
आयुष्याच्या सायंकाळी | Jivangane Marathi Kavita

आयुष्याच्या सायंकाळी,
मागे वळून पाहताना
दूरवरून येणारी वाट,
अनेक वळणांवर धावताना
खाचखळग्यातून, फुलातून,
काट्यातून पुढे सरकते
अनुभवांची शिदोरी आता
ओसंडतांना दिसते….१
आयुष्याच्या सायंकाळी मागे
वळून पाहताना..
अनेक चेहरे,कित्येक नजरा,
कित्येक भाव जाणतांना
राग नी तिरस्काराचे आगीत,
मन जेव्हा होरपळलते
प्रियजनांचे प्रेमाचे कारंजे
तेव्हा मनमोराला भिजवते..२
आयुष्याच्या सायंकाळी मागे
वळून पाहताना..
कष्टाचे उपासे, पराभवाचे शल्य,
मन:चक्षुना दिसतात
तिथे यशाचे मोहोर
अन् समाधानाची फुले
आठवांचे हिंदोळे,
मन माझे झुलले…३
आयुष्याच्या सायंकाळी मागे
वळून पाहताना..
पाखरू दिसले वर,
उंच भरारी घेताना
चिमुकली त्याची सावली,
बालपण पुन:आले घरी
शिशिरातही वसंताचा
बहर होऊनी दारी..४
आज आयुष्याच्या सायंकाळी
निवृत्त मी, निवांत मी, तृप्त मी
वेध लागले पैलतीरी
वैकुंठी माझा श्रीहरी
अर्चना कुलकर्णी,ठाणे
प्रीत तुझी माझी आणि आयुष्याच्या सायंकाळी | Best Jivangane Marathi Kavita 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह