Jyotirlinga In India Details In Marathi

Jyotirlinga In India Details In Marathi

१२ ज्योतिर्लिंग माहिती :

अनेक धर्म , देवदेवता असणार्‍या आपल्या भारत देशात या देवदेवतांची तीर्थक्षेत्रे व तेथील यात्रा प्रसिद्ध आहेत. महादेवाच्या भारतामधील प्रमुख १२ मंदिरांना १२ ज्योतिर्लिंगे असे म्हणतात.
या १२ ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रामध्ये ५ ज्योतिर्लिंगे आहेत. Jyotirlinga In maharashtra India Details In Marathi jyotirlinga name in madhya pradesh gujarat india

१. सोमनाथ (गुजराथ – वेरावळ) :

गुजरात या ठिकाणी सौराष्ट्रात वसलेले सोरटी सोमनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. भारत देशातील प्राचीन तीर्थस्थळांत सोमनाथ मंदिराचा समावेश होतो. हे मंदिर सभामंडप , नृत्यमंडप आणि गर्भगृह या तीन प्रमुख भागांमध्ये विभागले आहे.या मंदिराच्या शिखरावरील कलशाचे वजन दहा टन एवढे आहे.ध्वजाची उंची २७ फूट आहे.पुराणामध्ये या मंदिराच्या अनुषंगाने एक कथा आहे. चंद्राचे नाव सोम असे होते. तो दक्ष राजाचा जावई होता. एकदा सोमने दक्षाची अवहेलना केली.

त्यामुळे राग येऊन दक्षाने चंद्राचा प्रकाश हा दिवसा-दिवसाने कमी होत जाईल,असा शाप दिला. अन्य देवतांनी दक्षाला या शापासाठी उःशाप देण्यास सांगितले.तेव्हा त्यांनी सरस्वती ही नदी समुद्राला जिथे मिळते, तेथे स्नान केले तर या शापाचा परिणाम रहाणार नाही, असे सांगितले. त्यानंतर सोमने सौराष्ट्रामधील या ठिकाणी येऊन स्नान केले आणि भगवान शिव यांची आराधना केली. भगवान शंकर येथे प्रकट झाले आणि त्यांनी त्याचा उद्धार केला. क्षय नाहींसा होण्याकरितां सोमानें लिंग स्थापून पूजा केली म्हणून हे ठिकाण सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले .

२. मल्लिकार्जुन(आंध्रप्रदेश – श्रीशैल्य) :

गुंटकल बेसवाडा या छोट्याशा लाइनवर नंद्याळ हे स्टेशन आहे. तेथून २८ मैलांवर असलेल्या आत्माकुर या गावी मोटारीने जावें लागतें.आत्माकुरहून मल्लिकार्जुन ४३ मलै श्रीशैल्यपर्वतावर आहे. रागाने निघून गेलेल्या कुमार कार्तिकेयला भेटण्याक‍रीतां (मल्लिका) पार्वती व अर्जुन (शंकर) येथें आले म्हणून मल्लिकार्जुन या नावाने हे ठिकाण प्रसिद्ध झाले. मल्लिकार्जुनाच्या पलीकडे ५ मैलांवर (पाताळगंगा) कृष्णा आहे. Jyotirlinga In maharashtra India Details In Marathi jyotirlinga name in madhya pradesh gujarat india

Jyotirlinga In India Details In Marathi

३. महांकालेश्वर (मध्यप्रदेश – उज्जैन) :

हे मंदिर मध्य प्रदेशमधील उज्जैन या जिल्ह्यामध्ये आहे. हे ज्योतिर्लिंग स्वयंभू असून रुद्रसागर तलावाच्या काठावरील उज्जैन शहरात आहे.हे शहर क्षिप्रा नदीच्या किनारी वसलेले आहे. या शहराला ऐतिहासिक वारसा देखील आहे . पूर्वी विक्रमादित्य या राज्याची राजधानी येथे होती.दर १२(बारा) वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभ मेळ्यात जगभरातून अनेक भाविक येथे जमा होतात.श्री महांकालेश्वर ज्योतिर्लिंगची प्रतिमा ही दक्षिणमुखी आहे. बारा ज्योतिर्लिंगामध्ये दक्षिणमुखी पूजेच्या महत्वामुळे वर्षातुन एकदा महाशिवरात्रिच्या दुसऱ्या दिवशी भगवान महांकालेश्वर येथेच भस्म आरती होते.

४.ओंकारेश्वर (मध्यप्रदेश – ओंकारेश्वर) :

ओंकारेश्वर हे मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यात आहे. नर्मदा नदीमध्ये शिवपुरी नावाच्या बेटावर वसलेले असून मोरटक्का गावापासून जवळपास २० कि.मी.अंतरावर आहे. हे बेट हिन्दू पवित्र चिन्ह ॐ या आकारामध्ये बनलेले आहे. ॐकारेश्वर आणि अमरेश्वर ही दोन मंदिरे येथे आहेत.ॐकारेश्वर या मंदिराची निर्मिती नर्मदा नदी पासून झाली आहे. ही नदी भारतातील अत्यंत पवित्र अशी नदी आहे. राजा मान्धाता यांनी नर्मदा किनारी घोर तपस्या करून भगवान शिव यांना प्रसन्न केले.त्यांच्याकडून या ठिकाणी निवास करण्याचे वरदान मागून घेतले. या ठिकाणी एकूण ६८ तीर्थ असून ३३ कोटी देवता येथे राहतात अशी कल्पना आहे.याव्यतिरिक्त येथे २ ज्योतिस्वरूप लिंगासहित १०८ प्रभावशाली शिवलिंग आहेत. शास्त्रामध्ये अशी मान्यता आहे की कोणताही तीर्थयात्री देशामधील सगळी तीर्थ करून येऊ देत .परंतु जोपर्यंत तो ओंकारेश्वर या ठिकाणी येऊन केलेल्या तीर्थों चे जल नाही चढवत तोपर्यंत त्याचे सारे तीर्थ अधूरे मानले जातात.

५. परळी वैजनाथ (महाराष्ट्र – परळी) :

भारतामधील १२ ज्योतिर्लिंगापैकी परळीच्या वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान हे जागृत आहे. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला.हे मंदिर चिरेबंदी असून भव्य अशा स्वरूपाचे आहे. मंदिराच्या लांबलचक असलेल्या पायर्‍या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेतात. मंदिराचा गाभारा आणि सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून आपण ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकतो . इतरत्र कोठेही नाही पण फक्त वैजनाथ या ठिकाणी देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते.मंदिराच्या परिसरात ३(तीन) मोठी कुंडे आहेत.मंदिरापासून जवळ ३ कि. मी. अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे.तसेच जवळच अंबाजोगाईचे योगेश्वरी देवीचे मंदिर आहे. परळी वैजनाथ हे परभणीपासून ६१ कि. मी. अंतरावर आहे . Jyotirlinga In maharashtra India Details In Marathi jyotirlinga name in madhya pradesh gujarat india

६. भीमाशंकर (महाराष्ट्र – भीमाशंकर) :

भीमा या नदीच्या उगमस्थानी असलेले बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर हे आहे. असे म्हणतात की,१८ व्या शतकात नाना फडणीस यांनी मंदिर बांधले आहे.
हे मंदिर हेमाडपंती आहे. मंदिरावर उत्कृष्ट अशा कलाकुसरीचे नमुने पाहवयास मिळतात. भीमा' या नदीचा उगम आणि श्री शंकराचे स्थान, म्हणून यालाभीमा-शंकर’ असे म्हणतात.
भीमाशंकर हे एक थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. मंदिराच्या आजुबाजुचा परिसर हा डोंगरदर्‍यांनी व्यापलेला , दाट जंगल असलेला – निसर्गरम्य आहे.अभयारण्य म्हणून या जंगलाला घोषित करण्यात आले आहे. जवळच नागफणी व कोकणकडा हे दोन महत्त्वाचे कडे आहेत. या कड्यावरून कोकणामधील निसर्गसौंदर्य पाहावयास मिळते.भीमाशंकर पुण्यापासून मंचर मार्गे १२८ कि.मी. एवढ्या अंतरावर आहे. राजगुरूनगर तालुक्यात भीमा नदीचा उगम झाला आहे.तर मंदिराच्या पायर्‍यांवरील गावाचा भाग हा आंबेगाव या तालुक्यात आहे. श्रावण महिन्यात जास्त संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.

७. रामेश्वर (तामिळनाडु – रामेश्वर) :

भारताच्या तामिळनाडु राज्यामधील रामेश्वरम बेटावरील एक शिवमंदिर आहे. प्रभू रामचंद्रांनी रावणाविरुद्ध लढलेल्या युद्धातील पापांचे क्षालन करण्यासाठी या ठिकाणी वाळूचे शिवलिंग बनवून भगवान श्री शंकराची आराधना केली. त्यांच्यावर प्रसन्न होऊन भगवान श्री शंकरांनी त्या ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या रूपात निवास करण्याचे वचन भगवान रामचंद्रांना दिले.हे तीर्थक्षेत्र बारा ज्योतिर्लिंग व चार धामांपैकी एक मानले जाते. विशाल नंदी तसेच १००० फुट लांब व ६५० फुट रुंद आणि १२५ फुट उंच असे हे रामेश्वरचे मंदिर आहे. वार्षिक उत्सवाच्या वेळी भगवान शंकर व देवी पार्वती यांची सोन्या चांदीच्या रथातून भव्य मिरवणूक काढली जाते. Jyotirlinga In maharashtra India Details In Marathi jyotirlinga name in madhya pradesh gujarat india

८.नागेश्वर (महाराष्ट्र – औंढा नागनाथ) :

पांडव यांच्या १४ वर्षाच्या अज्ञातवासात धर्मराज युधिष्ठीर यांनी औंढा नागनाथाचे मंदिर बांधल्याचे, आणि महादेवाची स्थापना केल्याचे म्हटले जाते. नागनाथाचे मंदिर हे हेमाडपंती शैलीचे असून याचा विस्तार ६०,००० चौ. फूट एवढा प्रचंड आहे. महादेवाच्या पिंडीसमोर नंदीची मूर्ती नसून , नंदिकेश्वराचे स्वतंत्र असे मंदिर बाजूला आहे . हे येथील खास वैशिष्ट्य आहे. मंदिराच्या परिसरात १२ ज्योतिर्लिंगाची छोटी-छोटी मंदिरे आहेत . तसेच १०८ महादेवाची मंदिरे आणि आजून ६८ महादेवाच्या पिंडी आहेत. याशिवाय वेदव्यासलिंग , नीलकंठेश्वर, गणपती, दत्तात्रय, मुरलीमनोहर, दशावतार ,भंडारेश्वर यांची देखील मंदिरे आहेत. मंदिरावर उत्कृष्ट असे शिल्पकलेचे काम केलेले आहे.

परिसरामध्ये मोठे मैदान असून आठ खांबांचे मोठे दालन आहे. संत विठोबा खेचर हे इथलेच होते .तर संत नामदेव हे जवळच असलेल्या नरसी गावचे होते.संत नामदेव हे जेव्हा कीर्तन करीत होते, त्या वेळी नागनाथ मंदिराने आपले तोंड त्या दिशेला फिरवले, असे मानले जाते . औंढा नागनाथ याच्या शेजारील गाव राजापूर या ठिकाणी उत्खननात प्राचीन काळच्या सुंदर व रेखीव अशा मूर्ती सापडल्या आहेत. येलदरी व सिद्धेश्र्वर ही प्रसिद्ध धरणे व पर्यटनाची ठिकाणे येथून जवळच आहेत.औंढा-नागनाथ या ठिकाणी जाण्यासाठी परभणीहून ४०-४५ मिनिटे लागतात. तसेच नांदेड या शहरापासून ६४ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे. सध्याच्या हिंगोली या जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ हे स्थान आहे.

९. विश्वेश्वर (उत्तर प्रदेश – वाराणसी) :

विश्वेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक . शंकराचे हे रूप काशीमध्ये पूजले जाते.पूर्वी वाराणसीमध्ये काशी विश्वनाथ मंदिर होते.वाराणसी हे भारताची सांस्कृतिक राजधानी आहे. भारताच्या पवित्र गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. शहराच्या मध्यवरती ठिकाणी विश्वनाथ मंदिर असून तेथे भगवान शिव, विश्वेतश्वगर किंवा विश्वेनाथ ज्योतिर्लिंग स्थापलेले आहे. श्री विश्वेश्वर ज्योतिर्लिंग हे कोणाच्या तपस्येने तयार झालेले नाही . तर येथे साक्षात भगवान शिव हेच विश्वनाथ च्या रूपात प्रकट झाले.असे म्हणतात कि मृत्यू येणाऱ्या प्रत्येकास येथे मोक्ष प्राप्ती होते.
Jyotirlinga In maharashtra India Details In Marathi jyotirlinga name in madhya pradesh gujarat india

१०. त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र – त्र्यंबकेश्वर) :

नाशिक जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य असे कि , मंदिरातील शिवलिंगास ब्रम्हा, विष्णू, आणि महेश या तिघांच्या प्रतिमा आहेत.त्र्यंबकेश्वर हे ब्रह्मगिरी या पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे.या पर्वताला शिवाचे रूप मानले जाते.याच पर्वतावर पवित्र गोदावरी नदीचा उगम झाला आहे. पेशवे बाळाजी बाजीराव यांनी या मंदिराचे बांधकाम इ. स. १७५५ साली केल्याचा उल्लेख आढळतो.दर १२ वर्षांनी नाशिक बरोबर त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा भरतो. याचबरोबर संत निवृत्तीनाथांची यात्रा, त्र्यंबकेश्वराची रथयात्रा इ. महत्त्वाच्या यात्रा या ठिकाणी भरतात. नारायण नागबळी ,त्रिपिंडी याचा विधी भारतात फक्त याच ठिकाणी होतो. गंगाद्वार व मुक्ताई मंदिर,कुशावर्त तीर्थ, संत ज्ञानेश्वरांचे ज्येष्ठ बंधू संत निवृत्तीनाथ यांचे समाधी मंदिर इ. महत्त्वाची स्थाने त्र्यंबकेश्वरपासून जवळच्या अंतरावर आहेत. नाशिकपासून २८ कि. मी. अंतरावर त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे.

११.केदारनाथ (उत्तरांचल – केदारनाथ) :

केदारनाथ हे हिमालयातील उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग या जिल्ह्यामध्ये मंदाकिनी नदीच्या किनारी आहे. पुराणामध्ये सांगितले जाते कि , भगवान श्री विष्णू जगाच्या कल्याणाकरिता पृथ्वीवर
निवास करण्यासाठी आले.त्यांनी बद्रीनाथ या ठिकाणी आपले पहिले पाउल ठेवले. बद्रीनाथ हे अगोदर भगवान शिवाचे स्थान होते.परंतु भगवान विष्णू यांच्यासाठी त्यांनी या स्थानाचा त्याग केला आणि केदारनाथ मध्ये वास्तव्य केले. शंकराचार्यांनी वयाच्या ३२ व्या वर्षी येथे समाधी घेतली.केदारनाथ हे देखील ज्योतिर्लिंगा बरोबरच चार धामा पैकी एक धाम आहे. हे मंदिर एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीतच दर्शनासाठी खुले असते. Jyotirlinga In maharashtra India Details In Marathi jyotirlinga name in madhya pradesh gujarat india

१२. घृष्णेश्वर (महाराष्ट्र -संभाजीनगर) :

बारा ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्र्वर हे एक महत्त्वपूर्ण ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये आहे. भगवान श्री शंकराच्या उपासकांसाठी पवित्र स्थान असलेल्या घृष्णेश्र्वर मंदिरात शिवभक्तांची खूप मोठी गर्दी होत असते. पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांनी इ.स. १७६५ ते १७९५ या कालावधी मध्ये घृष्णेश्र्वर मंदिर बांधून त्यावर संपुर्ण नक्षीकाम करून घेतले.घृष्णेश्र्वराचे मंदिर औरंगाबाद जिल्ह्यात असून वेरूळपासून अगदी जवळ आहे. या मंदिरापासून अगदी जवळच श्रीगणेशाचे २१ आद्यपीठापैकी एक लक्षविनायक मंदिर आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे यांच्या घराचे अवशेष (जुना वाडा) देखील मंदिराजवळ आहे.

रक्षाबंधन Wallpaper Download करण्यासाठी या Link वर क्लीक करा. 

आषाढी वारीची आकर्षक चित्रे पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *