कांदा चटणी रेसिपी, कांद्याची चटणी रेसिपी | kandyachi chatni recipe in marathi

कांदा चटणी रेसिपी | kandyachi chatni recipe in marathi

आजकाल बाजारात खूप प्रकारच्या चटण्या उपलब्द आहेत , पण महाराष्ट्रीयन चवीची चटणी शक्यतो विकत मिळत नाही. मराठी कांदा चटणीची फार अनोखी चव असते. हि नॉर्मली भाजी म्हणून चपाती किंवा भाकरी सोबत खाल्ली जाते किंवा पराठा, डोसा, वडापाव किंवा सामोसा इत्यादी सोबत सर्व्ह केली जाते. आज आपण अस्सल महाराष्ट्रीयन चवीची खमंग कांदा चटणी कशी बनवतात ते बघू या.
कांदा चटणी रेसिपी, कांद्याची चटणी रेसिपी | kandyachi chatni recipe in marathi

कांदा चटणी साहित्य :

३ मोठया आकाराचे कांदे ( बारीक चिरलेले )
२० ते २५ लसूण पाकळ्या ( बारीक ठेचलेल्या )
१/२ छोटा चमचा हळद
२ मोठे चमचे लाल मिरची पावडर
३ ते ४ चमचे तेल
चवीनुसार मीठ

कांदा चटणी रेसिपी, कांद्याची चटणी रेसिपी | kandyachi chatni recipe in marathi

कांदा चटणी रेसिपी, कांद्याची चटणी रेसिपी | kandyachi chatni recipe in marathi

कृती:

कांदा चटणी कृती भाग १

सर्वप्रथम एका भांड्यात तेल तापवून त्यात ठेचलेला लसूण घालणे व थोडा परतून घेणे.

त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून घेणे कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घेणे.

कांदा चटणी कृती भाग २

कांदा चटणी रेसिपी, कांद्याची चटणी रेसिपी | kandyachi chatni recipe in marathi

त्यानंतर हळद व नंतर मिरची पावडर घालून घेणे व परतून घेणे त्यानंतर मीठ घालणे.

आणि पुन्हा सगळे व्यवस्तीत परतून घेणे.

आता भांड्यावर झाकण ठेवणे व २ ते ३ मिनिटे कांदा शिजू देणे ..

अशी हि छान झणझणीत कांद्याची चटणी तयार. तांदुळाच्या अथवा कुठल्याही भाकरी सोबत किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावायला छानच लागते ..

कांदा चटणी रेसिपी FAQs
  1. कांदा चटणी कधी खावी?

जर मुख्य भाजी म्हणून जरी आपण कांदा चटणी वापरत नसलो तरी जेवणासोबत जर कांद्याची चटणी दिली तर जेवणाची चव वाढते. उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात हि चटणी खाण्यास काही प्रॉब्लेम नाही. आणि पावसाळ्यात तर हि चटणी वडापाव, भाजी इत्यादींसोबत सर्रास खाल्ली जाते. जर तुम्हाला हि चटणी महिनाभर टिकवायची असेल तर तुम्ही यात तेलाचे प्रमाण वाढवू शकता. ज्यामुळे एकदाच बनवून तुम्हाला चटणीचा आस्वाद घेता येईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *