Karanji Recipe In Marathi | करंजी रेसिपी टिप्स

Karanji Recipe In Marathi करंजी रेसिपी मराठी
लक्ष्मी पूजनाला नैवेद्यासाठी केली जाणारी आणि सुख-समृद्धी , वैभवाचं प्रतीक असलेली करंजी बनवली जाते. गरीब असो किंवा श्रीमंत, लेक-जावयाचं कौतुक करण्यासाठी असेल किंवा घरात आनंदाचा क्षण असेल करंजीचा मान हा वेगळाच. महाराष्ट्रात करंजीला (Maharashtrian Karanji) म्हणतात . साहित्य,करंजीचा आकार वेगळा करत इतर राज्यांमध्ये इतरही नाव आहेत. गुजिया, चंद्रकला हे पदार्थ पाकात बुडवून करतात. आतल्या सारणानुसारही भरपूर प्रकार केले जातात. करंजीची पाती ही रवा किंवा मैद्याची बनवलेली असते .सध्या सारणात छान असं भाजलेलं बेसन घालून केलेली करंजी चवीने खाल्ली जातेय.आपण इथे खुसखुशीत आणि पारंपरिक पद्धतीची करंजी कशी करायची ते पाहुयात.

करंजी रेसिपी लागणारे साहित्य :

पारी बनवण्यासाठी – २ कप मैदा (पाव किलो), १ मोठा चमचा रवा, पाऊण कप (५० ग्रॅम ) तूप, २ मोठे चमचे दूध, आणि लागेल तसे पाणी.

सारण बनवण्यासाठी – अर्धा कप बारीक रवा , अर्धा कप खवा , अर्धा कप पिठी साखर, बारीक किसलेलं सुकं खोबरं पाव कप , १ चमचा कापलेले बदाम, १ चमचा चारोळे , १ चमचा काजू , १ चमचा मनुका, विलायची पावडर, आणि साजूक तूप किंवा डालडा .

Karanji Recipe In Marathi करंजी रेसिपी मराठी

कृती :

Karanji Recipe In Marathi करंजी रेसिपी मराठी

एका परातीमध्ये रवा आणि मैदा चालून घेऊन नीट मिक्स करून घ्या. रव्यामुळे करंजीचं बाहेरील आवरण खुसखुशीत होते. तूप हलकेच गरम करून घेऊन मोहन म्हणून म्हणून पिठात टाकावे. त्यानंतर दोन्ही हातांनी ते चांगलं मळून घ्यावं. अर्धा कप कोमट पाणी घेऊन पीठाचा घट्टसर गोळा बनवावा. अर्धा तास हा गोळा झाकून ठेऊन द्यावा.

करंजीचे सारण तयार करण्यासाठी एका कढईत २ मोठे चमचे तूप गरम करून त्यात बारीक रवा सोनेरी रंग येईपर्यंत भाजावा. त्यानंतर त्यामध्ये काजू, बदाम, चारोळी बारीक कापून टाकावे . २ ते ३ मिनिटे ते पण भाजून घ्यावे . सुकं खोबरं खिसून घेऊन रंग न बदलू देता हलकस भाजून घ्यावं.

खव्याचा गोळा हाताने कुस्करुन घेऊन नंतर ५ मि. मंद आचेवर भाजावा. तो कोरडा झाल्यावर गॅस बंद करावा. एका मोठ्या भांड्यामध्ये रवा , खवा आणि सुकं खोबरं घेऊन ते एकत्र करावं . त्यामध्ये सुका मेवा , विलायची पावडर , मनुका, पिठीसाखर हे सगळे जिन्नस मिसळून सारण तयार करावे.

Karanji Recipe In Marathi करंजी रेसिपी मराठी

अर्धा तास भिजत ठेवलेला पिठाचा गोळा घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे करून पोळपाटावर पुरीच्या आकाराची पारी लाटून घ्यावी. लाटलेल्या पुरीच्या कडांना दुधाचे किंवा पाण्याचे बोट लावून पारीच्या मध्यभागी चमचाभर सारण घालावे. सारण घालताना पुरीच्या कडापर्यंत पोहोचू देऊ नये. नंतर ही पारी अर्धचंद्राकृती आकारात दुमडावी .

कडा नीट दाबून बंद करून मुरड घालावी. कटरच्या सहाय्याने चंद्राकृती आकारात कापून घाव्यात. करंजी झाली की कापडाखाली झाकून ठेवावी. म्हणजे ती वातट होत नाही. कढईमध्ये तेल किंवा तूप टाकून चांगले गरम करून घ्यावे .मध्यम आचेवर तेल गरम असतानाच करंज्या सोनेरी रंगात तळून घ्याव्यात. चांगल्या प्रकारे तेल निथळून झाल्यावर हवा बंद डब्यात करंज्या ठेवाव्यात.

रागावलेल्या आपल्या माणसाला मानवाण्यासाठी कविता राग रुसवा

झाशीची राणी लक्ष्मी बाई कश्या होत्या ?

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

As you found this post useful...

Follow us on social media!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
33 ⁄ 11 =