Karlyachi Bhaji Recipe In Marathi | कुरकुरीत कारली

सदा नावडती भाजी म्हणून चिल्लेपिल्ल्यांपासून थोरामोठ्यापर्यंत प्रसिद्ध असलेली भाजी म्हणजे कारल्याची भाजी. पण चांगल्या तब्येतीसाठी आवश्यक असलेली कित्येक पोषक तत्वे या भाजीत पाहावयास मिळतात. म्हणून आपल्याला तर हि भाजी करावीच लागते. मग मी एक असा पर्याय शोधून काढला ज्याने हि भाजी अतिशय चवदार तसेच कुरकुरीत होईल. त्यामुळे पोषण तत्वे तर आपल्या कुटुंबातील प्रत्येकाच्या पोटात जातीलच आणि तेही कारल्याचा नावडती चव जाणवू न देता. चला तर मग पाहू थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली कारल्याची भाजी.
Karlyachi Bhaji Fry Recipe in Marathi कारल्याची भाजी कशी करावी

Mazablog Recipe साहित्य:

5 कारली
सुकं खोबरं एक वाटी
तीळ एक मोठा चमचा
जिरं एक मोठा चमचा भाजलेलं
पाव चमचा काळे मीठ
चाट मसाला एक मोठा चमचा किंवा जलजीरा
मिरची पावडर 1 मोठा चमचा… Maza blog

Karlyachi Bhaji Recipe in Marathi कृती:
• कारल्याची फक्त देठं काढून एकसारखे काप (बारीक गोलाकार चकत्या) करावेत .
• उकळत्या पाण्यात एक चिमुट हळद व एक चिमुट मीठ घालून कारल्याचे काप टाकावेत .
• झाकण ठेवून पाच मिनिटं सळसळ उकळून घ्यावेत . नंतर चाळणीत किंवा रोवळीत ओतून पाणी काढून टाकावं . त्यावर लगेच गार पाणी ओतावं . पाणी पूर्णपणे निथळल्यावर तुकडे मुठीत दाबून पाणी काढून टाकावं . Mazablog Recipe
• हे करताना तुकडे मोडू देऊ नयेत. ते सर्व तुकडे कागदावर दहा मिनिटं पसरावेत .

• एक ते दीड डाव तेल गरम करून कारल्याचे तुकडे चुरचुरीत-कुरकुरीत तळून काढावेत .
• तिखट , मीठ , हळद , हिंग, आमचूर , जिरेपूड , कोथिंबीर, चाट मसाला, खोबरा किस टाकून चांगले एकजीव करावे…

Author : Snehal, Ahmednagar

Karlyachi Bhaji Fry Recipe in Marathi कारल्याची भाजी कशी करावी

Recipe

Karlyachi Bhaji Fry Recipe in Marathi कारल्याची भाजी कशी करावी

मिसेस स्नेहल ह्यांची केक रेसिपि वाचा

तुम्ही देखील ब्लॉग लिहू शकता. जर तुमच्या कडे तुमच्या स्वतःचे काही लेखन असेल व तुम्ही ते इंटरनेट वर टाकू इच्छित तर आम्हाला मेल करा. आम्ही कोणतेही मूल्य न घेता तुमचे लेखन आमच्या वेबसाईट वर प्रकाशित करू. – माझा ब्लॉग

Review of Made in India Smartphone POCO

Mazablog Recipe

1 thought on “Karlyachi Bhaji Recipe In Marathi | कुरकुरीत कारली”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *