महारथी कर्ण | Best Karn Marathi kavita in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Karn Marathi kavita in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Karn Marathi kavita in 2024

काव्यबंध समूह आयोजित काव्यलतिका रविवारीय काव्यस्पर्धा.
दि-३/३/२०२४.
विषय-महारथी कर्ण

महारथी कर्ण | Karn Marathi kavita in 2024

कर्ण जेव्हा मी वाचते,
आपसूकच भरतात नयन माझे
कर्णाची व्यथा खोल हृदयात,
अश्रू उतरते मनावरील ओझे…१

आपल्याच दुःखानेआपण व्यतित,
कर्ण, ज्ञानेश्वर यांचे चरित्र,
वाचून कळतो जीवनाचाअर्थबोध,
जनकल्याणा अर्पावे स्वतःस पवित्र…२

सर्व श्रेष्ठ योद्धा असूनही,
सूतपुत्र हिणविण्याचा अपमान.
आयुष्याचे काटेरी पावलागणिक चटके,
तरीही दातृत्वाची थोर जाण…३

एकाकी उपेक्षित कर्ण,
खर्‍या मातृत्वाला पारखा.
नात्यांचा ओलावा जपणारा,
लढवय्या सूर्य तेजा सारखा…४

कर्णाच्या अंगी कर्तृत्व,
भरगच्च राही ठायी ठायी.
महापराक्रमी, दिग्विजय राजा,
मैत्रीवरील निष्ठा पदोपदी राही…५

कवच कुंडलाचे महत्व,
जाणूनही इंद्राला देई दान.
श्रेष्ठ तो महारथी कर्ण
एकमेव षुरूष दातृत्वात महान…६

पांडवापैकी जेष्ठ कौंतेय,
राधेय म्हणून जगणारा.
संवेदनशील मनाचा खरा,
स्वाभिमानही जपणारा…७

कर्णाचा जीवन प्रवास,
खडतर होते वेदनामयी.
एकाकी, उपेक्षित अवमानित,
श्रेष्ठ चारित्र्याचा सुखमयी…८

पराभवाची निश्चित जाणीव,
कर्तव्यात नसे थोडीही कसूर,
शौर्याने नि धैर्याने लढणारा,
कर्ण होत गेला धुसर…९

महाभारतातील कर्ण,
भावतो मना मनाला.
कर्णाच्या दुखाची जाणीव,
साद घालते हृदयाला…१०

दानशूर म्हणून आजही
उदाहरण देतो कर्णाचे,
त्याच्यासारखा दानवीर,
दुर्मिळ व्यक्ती मोल कर्माचे…११

महारथी कर्णाची कथा,
शोकांतिकाचे अपार,
स्वतः तील कर्ण शोधताना
जीवनातील कळतो सार…१२

मंगल राजाराम यादव
शिराळा.

Karn Marathi kavita in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *