राधेय | Best karn Marathi poem in 2024

अरविंद कुळकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत karn Marathi poem in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

karn Marathi poem in 2024

काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका रविवारीय काव्यस्पर्धा दि.०३/०३/२०२४

विषय – महारथी कर्ण

राधेय | karn Marathi poem in 2024

राधेय म्हणून वाढला
कुंतीपुत्र महारथी कर्ण
सूतपुत्र अशी निर्भत्सना
जीवनात आड येई वर्ण..(१)

सुर्यपुत्र तेजस्वी पुरुष
युद्धकलेत होता निपुण
कष्टप्रद आयुष्य नशिबी
होते पुरेपूर नैसर्गिक गुण..(२)

दुर्योधन कर्ण घट्ट मैत्रीने
राजा बनला अंग देशाचा
जन्मतः ती कवचं कुंडले
पण अर्जुन वैरी जन्माचा..(३)

आजही दानशूर ही कीर्ती
होता अस्त्र विद्येत पारंगत
दूरदर्शी, गुणग्राहकता होती
कौरव संगतीने केली ही गत..(४)

अती सहनशीलता ठरला
कर्णासाठी जणू एक शाप
गोहत्येचेही पातक घडले
पुढे युद्धात त्याचाच ताप..(५)

दुर्योधनावर मित्रप्रेम ही
दुर्जनाची संगत भोवली
अधर्माची साथ दिल्याने
सारी प्रतिष्ठाही गमावली..(६)

बुद्धीवान,सुंदर,शक्तिशाली
असामान्य शौर्य,दानशूरता
पण अहंकारी,आत्मकेंद्री
अवगुणांनी आली क्रूरता..(७)

अरविंद कुळकर्णी
मलकापूर

karn Marathi poem in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *