सुर्यपुत्र | Best Karn poem in 2024

सौ. रंजीता अमोल गोवेकर यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Karn poem in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Karn poem in 2024

काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका रविवारीय काव्यस्पर्धा दि.०३/०३/२०२४

सूर्यपुत्र | Karn poem in 2024

रेशमी वस्त्र जरी लक्तरे त्याची
वेशी वरती टांगली होती….
सूर्यपुत्र मी राजपुत्र जरी
नशिबी दुःख ती बांधली होती….

जन्म तो माझा नकोसा तिजला
मजला तिनेच ते त्यागले होते…
दोष तो माझा नव्हता तरीही
दोषी मजलाच मानले होते…

जन्म जाहला भूक लागली
आर्तता माझी ऐकली नाही…
पेटीमध्ये ठेविले मजला
मायेने जवळ ते घेतले नाही….

पाण्यामधूनी वाहत जाता
कवच कुंडले सोबत होती….
नशिबाने जरी साथ सोडली
तरी शरीराला ती बिलगून होती…..

अधिरथ-राधा भेटली नसती
तर या देहाचे जगणे नसते…
जरी जन्म उदरातून नसले त्यांच्या
तरी त्यांचे प्रेम ते कमीच नव्हते….

सुतपुत्र ना…. तरीही तोच मी
अस्तित्व माझे संपले होते…
काय म्हणावे असे कसे ते
नशिबी माझ्या लिहिले होते…

मी जागलो होतो मैत्रीला अन
नात्यांनाही जागलो होतो…
देता देता दुसऱ्यांना मग
मी स्वतःस पूरता त्यागलो होतो…

मान अपमान साहत राहिलो
का जगणे माझे असेच होते…?
काय ते माझे चुकले होते
की माझे अस्तित्वच पुसले होते…

इतिहासाच्या पानोपानी
मला प्रेम ते मिळते आता…
माझ्यासाठी तुमच्या डोळा
मजला पाणी दिसते आता……

सौ. रंजिता अमोल गोवेकर
(अलिबाग )

Karn poem in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *