कर्ण कधी कुणाला कळलाच नाही | best karn poem in marathi in 2024

कु. पंढरीनाथ वर्पे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत karn poem in marathi in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

karn poem in marathi in 2024

काव्यबंध समूह आयोजित,
काव्यलतिका रविवारीय काव्यस्पर्धा.
दिनांक- 3- 3- 2024.
विषय- महारथी कर्ण

कर्ण कधी कुणाला कळलाच नाही | karn poem in marathi in 2024

कुरूक्षेत्राच्या त्या रणांगणावर
सूर्यदेवाचा प्रखर किरण पसरला ,
कवचकुंडला सोबत तेजस्वी चमकणारा
हस्तीनापूर ने मृत्युंजय कर्ण पाहिला..
घुमसत राहिला राधेय बनून
कौंतेय कधी बनलाच नाही,
सूतपुत्र म्हणून ओळखला जाणारा
कर्ण कधी कुणाला कळलाच नाही……!❤️

किती काय सोसले , भोगले कोण किती आणि कसे टोचले ,
किती विरोधी कोण आपले किती गिधाडे किती सापळे .
किती त्या टिका , किती लांच्छने,
किती तो दोष , किती ती गाऱ्हाणे .
सगळे समक्ष पाहून देखील तो कधी खचला नाही,
अपमानाच्या अग्नीत होरपळत राहणारा
कर्ण कधी कुणाला कळलाच नाही……!

नाकारलेल्या शस्त्र अस्त्र च्या स्पर्धेत
खांद्यावरती अंगराज रुपी मैत्रीचा हात आला,
तुटून पडलेल्या या कर्नाच्या धनुष्याला
प्रपंच्यासाहित ब्रह्मास्त्र मिळाला.
पांडव आहे माहिती असूनही
दुर्योधनाची साथ कधी सोडली नाही,
धर्म अधर्माच्या या काळाच्या घेऱ्यात
फक्त मैत्री या दोरीनं मोळ्या बांधणारा
कर्ण कधी कुणाला कळलाच नाही……!

karn poem in marathi in 2024

अपमान वचन आणी श्रापाच्या काळोख्यात
तो चालत होता वाट ऐकला,
अभेद अंग चमकणाऱ्या कवच कुंडलासाठी
स्वतः इंद्रदेव ही भिक्षुक बनला .
कधी कुणाला दिलेल्या शब्दावर
तो माघारी कधी वळलाचं नाही,
वचन आणी शापाच्या जाळ्यात अडकलेला
कर्ण कधी कुणाला कळलाच नाही……!

रणांगनातील युद्ध तो अंतरमनातं खेळत होता,
जात पात च्या आगळ्या खेळात
स्वतः शीच स्पर्धा करत होता .
अडकलेले रथाचे चाक विस्मरणारे मित्र
तरीही मावळत्या मृत्युला तो घाबरलां नाही ,
पाण्यात नाही तर बंद डोळ्याने मस्त्यभेद करणारा
धनुर्धर कर्ण कधी कुणाला कळलाच नाही……!
कर्ण कधी कुणाला कळलाच नाही……!

     कू. पंढरीनाथ वर्पे
कोल्हापुर
      8698361992

karn poem in marathi in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *