karn poem lyrics in 2024

महारथी कर्ण | Best karn poem lyrics in 2024

अनिता मधुकर भोई यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत karn poem lyrics in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

karn poem lyrics in 2024

काव्यबंध समूह आयोजित
विषय – महारथी कर्ण

महारथी कर्ण | karn poem lyrics in 2024

मिळे वरदान कुंतीला
माता होशील कुमारिका
कसे शक्य होईल असे
चिंता करी माता कुंतिका

सूर्यकांत पावन झाला
कुंती पोटी पुत्र जन्मला
संगे ती कवच कुंडले
कर्ण बाळ घेऊन आला

सूर्य पूत्र म्हणून त्याला
दिले नदीपात्रा सोडून
कशी वेळ आली वाईट
तान्ह्या बाळाला ढकलून

कर्ण झाला खूपच थोर
घेई नाना विद्या शिकून
मोह बंध पाश प्रेमाचे
सारे दिले त्याने सोडून

असे कित्येक ती भावंडे
परी कर्ण वाढे एकटा
त्याच्या जन्माचे सारे गूढ
फुटतील अनेक वाटा

झाला धनुर्धारी चांगला
केली अनेक युद्धकला
दान हे खरे श्रेष्ठ दान
असे मानत दानी झाला

याचा फायदा अनेकदा
घेत होते मित्र आप्तेष्ट
कधी याचक येता दारी
होत असे नित्य संतुष्ट

घेता इंद्रदेव परीक्षा
देई काढून तो कुंडले
केला नाही कधी विचार
आयुष्यच कसे लाभले

असे सूर्यपूत्र तो जरी
झेले अपमानाचे बोल
काय हवे ते करण्याची
संधी शोधण्याकडे कल

करी मनाई द्रोणाचार्य
देण्या शिक्षण ते कर्णाला
परि हार न मानताच
केला आरंभ शिक्षणाला

असे ज्ञानी परशुराम
तरी देई शाप कर्णाला
होई विस्मरण मोक्याला
नसे मोल तुझ्या कलेला

असे जीवन त्या कर्णाचे
सारे असूनही ठरले
व्यर्थ अशा रणांगणात
काय खरचं उमगले?

अनिता मधुकर भोई कुरूंदवाड (कोल्हापूर)

karn poem lyrics in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *