अंगराज कर्ण | Best karn var poem in 2024

सौ. अनिता डोंगरावर यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत karn var poem in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

karn var poem in 2024

काव्यबंद समूह ,काव्य लतिका आयोजित
रविवारी स्पर्धा
दि.3/3/24
विषय – दानशूर कर्ण

अंगराज कर्ण | karn var poem in 2024

कुंती विवाहपूर्वीच बनली माता
कलंक नको माथी कुमातेचा
केला धावा दुर्वासमुनीच्या
सिद्ध मंत्र उच्चाराने सूर्यदेवाचा
कुंती सूर्यदेवाचा पुत्र कर्ण
ओळख दिले कवच कुंडल
नमन करून गंगेस रक्षा करावी
टोपलीत ठेवून वाहिले नदीच्या प्रवाहात
अधिरथची नजर देई जीवनदान
सूर्यासम तेजस्वी अंगकांती
क्षत्रियांची छबी झलके कृतीत
महान धनुर्धारी पराक्रमाची
पसरे चहू लोकात किर्ती
अंगराज म्हणूनी ओळख
सुतपुत्र म्हणुनी कमी लेखीत
अपमान तयाचा होई क्षणोक्षणी
सहन करी अंगराज सर्वकाही

क्षत्रियाचे गुण अंगी तरी
नशीबी नाही संधी कधी
सिध्दतेवर होई सदा
आक्षेप सर्वापरी कर्णावर
दुर्योधनाचा परम सखा
कुंतीचा ज्येष्ठ पुत्र कर्ण
पांडवांचा बनला विरोधक
असह्य कुंतीने कथन केले कर्णास
जन्म कहाणीचा सारांश
शूरवीर उत्तम धनुर्धारी
ख्याती जगभर दानशूर
होता पक्का दिलेले वचन
सदैव अंगीकारी शिरोधर
उदारता कर्णाची बघुनी
इंद्राने भिक्षुक बनून घेतले
कवचकुंडले त्यासी मागुन
गुरू परशुरामाने दिला शाप
शंकराला केला परत आयुध
आज्ञाकारी परशुरामाचा शिष्य
जीवापाड मैत्रीस जपणारा मित्र
दिलेल्या वचनास पुरणारा दानशूर
मातेच्या शब्दास जपणारा पुत्र
अशी ख्याती कर्णाची जगभर

सौ. अनिता डोंगरवार
मु. जि. गोंदिया

karn var poem in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *