Katha Lekhan Don Mitra Best 2023

मैत्रीची परीक्षा पैश्याने ? | Katha Lekhan Don Mitra Best 2023

मैत्री मध्ये पैश्याचा विषय कधीही आणू नये आणि जर आलाच तर अतिशय काळजीपूर्वक निर्णय घ्यावा हे शिकवणारी Katha Lekhan Don Mitra आम्ही इथे दिली आहे.

Katha Lekhan Don Mitra | दोन जिवलग मित्र

Katha Lekhan Don Mitra

एका गावामध्ये दोन चांगले मित्र असतात. रमेश आणि लखन. रमेश हा खूप श्रीमंत असतो. त्याच्या घरी पंधरा एकर शेती असते. दोन “मजली बिल्डिंग “आणि अतिशय सुंदर सजावट केलेलं त्याचं “घर”. त्याच्याकडे कुठल्याच गोष्टीची कमी नसते.तो आरामात स्वतःच जीवन जगत असतो. त्याचाचं मित्र “लखन” हा पैशाने श्रीमंत नसतो. त्याच्याकडे छोटसं घर असते. एक एकर शेती असते. आणि त्याची आवडती लक्ष्मी असते. लक्ष्मी म्हणजेच त्याची त्याच्या घरी असलेली पाळलेली बकरी. पण त्याला कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नसते.

Katha Lekhan Don Mitra Best

माझा मित्र एवढा श्रीमंत आहे ,आणि माझ्याकडे काहीच नाही. या गोष्टीचा त्याला लोभ ही नसतो. लखन हा मनाने खूप श्रीमंत असतो, रमेश हा त्याच्या घरी जाऊन जेवण करतो, ते सोबत राहतात, फिरतात कारण ते लहानपणापासूनचे मित्र असतात. रमेश देखील मनाने श्रीमंत असतो. तो त्याला कुठल्याच गोष्टीची कमी करत नाही. आणि बदल्यांमध्ये त्याला काही मागतही नाही. रमेश ची बायको असते “सुरेखा” सुरेखा मनामध्ये लखनला जळणारी कारण लखन ची बायको ही रमेश च्या बायको पेक्षा दिसायला खूप “सुंदर” असते.

Katha Lekhan Don Mitra Best

रमेश लखन च्या बायकोला ताई म्हणतो. त्यामुळे तिला लागणाऱ्या सर्वच गोष्टी तो रक्षाबंधनाला तिला घेऊन देतो. हे रमेश च्या बायकोला अजिबात आवडत नाही. लखन रमेशच्या घरी आल्यानंतर ती त्याला एक वेगळ्याच नजरेने पाहते. त्याला गरीब, भिकारी बोलते. पण लखन कधीच तिच्या बोलण्याला मनाला लावून घेत नाही. कारण त्याला माहिती असते की, आपला मित्र हा आपलाच आहे. आणि तो कधीच आपल्याला असं बोलणार नाही . लखन हा डोक्याने अतिशय बुद्धिमान असतो. म्हणून तो नेहमी रमेश ला लोकांच्या फसवे गिरी होण्यापासून वाचवतो.

Katha Lekhan Don Mitra Best


वाचा गर्वाचे घर खाली कथा Best Katha Lekhan Garvache Ghar Khali 2023

वाचा गोष्ट :- Short Katha Lekhan in Marathi

वाचा गोष्ट :- आईची आत्मा गोष्ट | Aatma Story in Marathi 2023


रमेश आणि लखन या दोघांची मैत्री गावामध्ये प्रसिद्ध असते. कारण ते एकमेकांसाठी आणि एकमेकांच्या भल्यासाठी काहीही करायला तयार असतात. आणि त्यांचं अंतर्मन देखील एकमेकांसाठी शुद्ध असते. पण रमेश ची मैत्री लखन सोबत असलेली रमेश च्या बायकोला अजिबात आवडत नाही. ती नेहमी लखन बद्दल रमेशच्या मनात द्वेष पेरण्याचा प्रयत्न करते. पण रमेश तिला कधीच ऐकत नाही.

Katha Lekhan Don Mitra Best

एक दिवस रमेश आणि लखन ठरवतात की, त्यांना बाहेर फिरायला जायचं आहे. आणि ते त्यांच्या पत्नीला घेऊन जाणार. लखन सुरुवातीला नाही म्हणतो, कारण त्याला माहिती असते की रमेश च्या बायकोला त्याचं आणि त्याच्या बायकोचे येणे अजिबात आवडणार नाही. पण रमेशच्या केलेल्या विनवणीने तो त्याच्यापुढे झुकतो. आणि त्याच्या बायकोला घेऊन ते सोबत फिरायला जातात. ते प्रवासात असताना रमेश ला एक इमर्जन्सी कॉल येतो. ज्यामुळे त्याला कॉन्ट्रॅक्ट बेस वरचे पैसे दुसऱ्या दिवशीच द्यायचे आहे असं कळतं .रमेश विचारात पडतो आणि म्हणतो ,आता तर जाणे शक्य नाही. पण गेल्याशिवाय कुठलाच मार्ग नाही. रमेशला थोडं निवांत व्हायचं होतं. म्हणून तो त्याच्या मित्रमंडळी सोबत आणि स्वतःच्या पत्नी सोबत फिरायला जातो.

Katha Lekhan Don Mitra Best

दोन मित्र कथा लेखन

रमेश ला वापस जाण्याची अजिबात इच्छा होत नाही. म्हणून तो त्याच्या अगदी मनापासून हृदयाजवळ असलेल्या मित्राला म्हणतो तो म्हणजे लखन . “लखन” तू जातोस का कॉन्ट्रॅक्ट बेस चे पैसे घेऊन? लखन म्हणतो अरे बाबा !एवढे मोठे पैसे मी कसा घेऊन जाणार? आणि रस्त्यात काही झालं तर ?त्याला रमेश म्हणतो, अरे मित्रा मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे .तुझ्यासाठी तर मी असे कितीतरी पैसे सोडायला तयार आहे .ऐक ना! मला थोडं निवांत राहायचं आहे. तू माझ्या कॉन्ट्रॅक्ट बेस चे पैसे पोहोचवून येतोस का? ते खूप दूरवर पोहोचलेले नसतात .म्हणून लखन त्याला होकार देतो. रमेश त्याच्या घराची किल्ली लखन कडे देतो ती किल्ली घेऊन लखन त्याच्या बायको सोबत परत येतो. घरामध्ये ठेवलेले कॉन्ट्रॅक्ट बेसचे पैसे तो त्या मालकाकडे अगदी सुरक्षित पोहोचवतो. रमेश आणि त्याची बायको काही दिवसांनी घरी येतात .ज्या कपाट मधून लखन पैसे काढतो आणि कॉन्ट्रॅक्ट बेस च्या मालकाला नेऊन देतो, त्या कपाट मध्ये असलेले काही पैसे रमेश ची बायको चोरून स्वतःकडे ठेवते. आणि भावाला देते.

Katha Lekhan Don Mitra Best

कपाट मध्ये असलेले पैसे हे तुमच्या मित्राने गायब केले आहे .असा आरोप लखनवर करते ,कपाट मध्ये असलेले पैसे गायब झाल्याने रमेश देखील चिडतो .आणि आपण आपल्या घराची किल्ली विश्वासाने आपल्याच तर मित्राला दिली आहे! आणि हे गायब त्याच्या मित्रानेच केले असेल असा गैरसमज त्याला होतो .गैरसमज झाल्याने दोघांमध्ये फूट पडते. आणि ते एकमेकांसोबत बोलत नाही .लखन त्याला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न करतो .पण आपण आपल्या घराची किल्ली फक्त आणि फक्त लखनच्या हाती दिली होती .आणि लखन नेच ते कपाट खोलले होते. आणि लखनने ते पैसे गायब केले आहे .असा गैरसमज रमेशची बायको रमेशच्या डोक्यामध्ये भरून देते .त्यामुळे तो तिच्यावर विश्वास करतो आणि लखन ला त्याच्या आयुष्यातून जायला सांगतो.

काही दिवसांनी रमेश ची संपूर्ण शेती ही पूल कन्स्ट्रक्शन मध्ये येते. त्यामुळे त्यांची शेती ही उध्वस्त होते रमेश कडे आता फक्त आणि फक्त घरच उरलेल असते. शेती हे त्याचं जगण्याचं संसाधन असल्यामुळे तो विचारात पडतो. आता त्याच्याजवळ फक्त आणि फक्त एक घरच उरलेलं असतं. रमेशचे सर्व कामकाज लखन पाहत असल्यामुळे रमेश ला त्याबद्दल काही कल्पना नसते. आणि कालांतराने त्याचे घरही त्याच राहत नाही. रमेश काही दिवसाने बेघर होतो. बेघर झाल्यामुळे तो काम शोधायला बाहेर निघतो. आणि एक दिवस काम शोधायला बाहेर निघताना, त्याला त्याचा मित्र लखन दिसतो. मित्राची ही अवस्था पाहून लखनच्या डोळ्यात पाणी येते. आणि लखन त्याला म्हणते चल ना मित्रा, आपल्या घरी. ते घर तुझंच आहे तुला कुठेच भटकण्याची आवश्यकता नाही. मी असल्यानंतर. त्याचे ते बोलणं ऐकून रमेशच्या डोळ्यात पाणी येते. आणि रमेश त्याला म्हणते, काही दिवसापूर्वी तुझ्यावर जो मी आरोप केला होता तो मित्रा खरा नाही का?

Katha Lekhan Don Mitra Best

लखन त्याला समजावून सांगतो मी एकही रुपया तुझा घेतलेला नव्हता. मालकाकडे तुझ्या कॉन्ट्रॅक्ट बेसचे पैसे मी सुरक्षित नेऊन दिले होते. आणि तशीच चाबी वहिनीकडे दिली होती .नंतर मला माहिती नाही की तुझ्या कपाट मधले पैसे कुठे गेले. रमेश तेव्हा एकही शब्द बोलत नाही. आणि तो परत जातो. परत गेल्यानंतर तो त्याच्या बायकोला म्हणतो आज मला लखन भेटला होता. आणि लखन आपल्याला त्याच्या घरी बोलावत आहे .त्याची बायको म्हणते मग तुम्ही काय निर्णय घेतलाय ?कुठे जायचं आपण ?कुठे राहायचं? काय खायचं? रमेश म्हणतो चल काही दिवस आपण लखन कडे जाऊ. आणि मग आपलं घरदार आणि खाण्यापिण्याची सोय झाली की, आपण परत येऊ. रमेश ची बायको हो म्हणते. आणि यायला तयार होते. आता रमेश आणि त्याची बायको लखनच्या घरी जातात.

लखन ची बायको आणि लखन त्या दोघांचे स्वागत करतात. लखनच घर खूप मोठा नसतं. पण त्या घरामध्ये माणूस हा माणसासाठी जगत असतो .म्हणून तिथे आपुलकी, प्रेम आणि वासल्य, असते. लखन ची बायको जेवायला बनवते लखन हा रमेश ला घास भरवतो लखनची बायको रमेशच्या बायकोला आदराने बोलते. आणि तिचा मान सन्मान करते. तिला पोटभर जेवायला देते. आणि तिला हिम्मत देते की ,ताई सर्व ठीक होईल. रमेश च्या बायकोला तिची लाज वाटते तिला त्या सर्व गोष्टी आठवतात. ज्या गोष्टी तिने लखन सोबत केलेल्या असतात ,घरी आल्यानंतर त्याला भिकारी म्हणून अपमानित केलेलं. कपाट मधले पैसे चोरून लखन वर आरोप करणे, तिला तीच ती गोष्ट तीच ती गोष्ट त्रास द्यायला लागते. आणि ती रमेशला सांगते, तुमच्या मित्राने चोरी केलेली नव्हती.

Katha Lekhan Don Mitra Best

मी ते पैसे गायब केले होते. आणि माझ्या भावाला दिले होते .यासाठी की तुम्ही लखन पासून दूर राहावं, पण त्याच गरीब मित्राने आज तुमची मदत केली .”खरंच माणूस हा कधीच पैशाने श्रीमंत नसतो” माणूस हा मनाने श्रीमंत असला पाहिजे .हे आज मला कळलं. मला माफ करा! लखन हसतो ,आणि म्हणतो ताई, त्याच्या मनात कधीच माझ्याबद्दल वाईट विचार येऊच शकत. नाही पण ती वेळच अशी होती की त्याने मला त्याच्या दूर केलं. पण मी नेहमीच त्याच्या हृदयात असतो. रमेश त्याच्याजवळ ढसाढसा रडतो. ते एकमेकांजवळ येतात. आणि घट्ट मिठी मारतात. त्यांच्यामध्ये असलेला गैरसमज मिटून जातो आणि ते नंतर सुखाने राहतात.

१)तात्पर्य – कोणत्याच व्यक्तीच्या सांगण्यावरून कुठल्याच व्यक्तीवर कुठल्याच प्रकारचा आरोप करू नये.

२)तात्पर्य- माणूस हा पैशाने श्रीमंत नाही तर मनाने श्रीमंत असला पाहिजे.

३)तात्पर्य- तोच खरा मित्र जो संकट काळी मदतीला येतो.

Katha Lekhan Don Mitra Best

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Pratiksha

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *