Katha Lekhan Marathi Ek Dhudvala

एक दुधवाला मराठी कथा | Best Katha Lekhan Marathi Ek Dhudvala 2023

असं काय होतं ज्यामुळे गणपतरावाला त्याचीच गाय हुंदाडी मारते? संपूर्ण गोष्ट जाणून घेण्यासाठी Katha Lekhan Marathi Ek Dhudvala 2023 नक्की वाचा.

Katha Lekhan Marathi Ek Dhudvala 2023 | एक दुधवाला | मराठी कथा

एक गाव होतं त्या गावांमध्ये बंडू नावाचा एक दूधवाला राहत होता .त्याच्याकडे असंख्य शेती होती .गाय ,बैल, बकऱ्या या सर्व त्याच्याकडे होत्या तो निर्मळ मनाचा आणि नेहमी सत्याचा साथ देणारा होता. त्याच्याकडे असलेल्या गाई यांचे दूध तो गावामध्ये विकायचा .त्या दुधामध्ये कुठल्याही प्रकारचा भेसळ करायचं नाही. म्हणून तो त्याच्या गावांमध्ये शुद्ध दुधासाठी प्रसिद्ध होता. त्याचे बोलणे जनू काळजाला त्याला भिडायचे. तो प्रत्येकासोबत प्रेमाने बोलायचा म्हणून त्याचे कस्टमर देखील खूप जास्त प्रमाणात होते . ज्यांच्याकडे दुधाचे पैसे नसायचे तो त्याला फुकट मध्येही दूध देऊन द्यायचा. म्हणून तो सर्वांचा आवडता होता. कष्टाचं आणि मेहनत करून मिळालेले पैसे तो नेहमी जपून ठेवायचा आणि त्या पैशावर तो स्वतःच्या गरजा भागवायचा. बंडूची आवडती गाय होती लक्ष्मी.

बंडूचं लक्ष्मी वर खूप प्रेम होतं आणि लक्ष्मीचा देखील बंडूवर प्रेम होत. बंडू त्याच्याजवळ असलेल्या प्रत्येकच प्राण्यांना जीव लावायचा. गाय बकरी, बैल यांच्यावर निस्वार्थीपणे प्रेम करायचा. त्यांना कुठलाही प्रकारचा नुकसान पोहोचवायचा नाही. त्यांना मनसोक्त फिरायला चरायला न्यायचा .त्यामुळे त्याच्या शेतीमधले कामही बैल ,आनंदाने करत होते .गाय चांगलं दूध देत होती. त्यामुळे त्याच्याकडे बळकट आली होती. पैशाची त्याला कधीच कमी भासली नाही. त्याच्याच गावांमध्ये गणपत नावाचा एक व्यापारी होता. चोरीने मिळवलेल्या प्राण्यांची तो विक्री करायचा .हे गावामध्ये सर्वांना माहिती होतं पण त्याच्याकडे असलेली सत्ता नेहमीच गरिबांचे तोंड बंद ठेवत होती. इतकच नाही तर तो फेराफेरी करून गरिबांना एक प्रकारे लुटण्याचा काम करत होता.

एक दुधवाला मराठी कथा | Katha Lekhan Marathi Ek Dhudvala 2023

एक दुधवाला मराठी कथा | Katha Lekhan Marathi Ek Dhudvala 2023

चोरी केलेल्या प्राण्यांना तो अगदी कमी किमतीत विकायचा. त्याला कुठलाच व्यक्ती एकही शब्दाने बोलायचं नाही. कारण त्याच्याकडे असलेली सत्ता आणि त्या सत्तेच्या जोरावर तो नेहमी खोट्याला खरं करण्यामध्ये पटाईत होता. बंडूचा वाढता व्यवसाय पाहून त्याच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला .सर्व लोक हे बंडूची वाह ! वाह !करतात त्याला कुठल्याच गोष्टीला नाही म्हणत नाही .आणि तो एक नंतर एक गाई विकत घेत आहे हे पाहून त्याला वाटलं की आता माझ्याकडे कोणीच येणार नाही. आणि त्याचा व्यापार हा बंद पडेल. मनामध्ये बंडू विषयी असलेला राग आणि निर्माण झालेल्या द्वेष हा त्याला रात्रभर झोपू देत नव्हता. म्हणून त्याने एक योजना आखली .आणि बंडूला गावामध्ये सर्वांच्या नजरेत उतरण्यासाठी भाग पाडायचे असे ठरवलं.

बंडूला त्याच्या डोक्यामध्ये असलेल्या कल्पनेची थोडीही कल्पना नव्हती. बंडू हा विचारा ने साधा ,मनाने निर्मळ होता. म्हणून तो कुठल्याच व्यक्तीचा द्वेष करत नव्हता आणि नाही कुठल्याच व्यक्तीचा राग करत होता. म्हणून त्याच्याविषयी कोणी वाईट विचार करेल असा विचारही त्याच्या डोक्यात नव्हता. एक दिवस बंडूची गाय लक्ष्मी ही जंगलात चरायला जाते. बंडू काही कारणास्तव गाय जवळून दूर जातो. गणपतराव ह्या गोष्टीचा फायदा उचलतो.हा त्याच्या गाईला चोरून घेतो आणि तिला त्याच्या घरी नेतो. गाईला काळा रंग देतो. बंडूला ती काय ओळखून न येण्यासाठी तिच्या अंगावर असलेले केस तो कापून टाकतो. गळ्यामध्ये बंडूंनी बांधलेली घंटी तो काढून टाकतो. त्याच्यामुळे ती गाय बंडूच्या गाई पेक्षा थोडी वेगळी दिसायला लागते. आणि तो तिला ओळखू शकत नाही अशा प्रकारे तिचा वेश बनवतो.

——————————-

वाचा अनाथ मुलगी झाली IPS अधिकारी | Best Katha Lekhan Ek Anath Mulgi 2023

वाचा अति तिथे माती बोधकथा 2023 Ati tithe mati bodhkatha

——————————–

बंडू काही वेळानंतर जंगलात जातो. आणि लक्ष्मीला आवाज द्यायला लागतो .बंडूने दिलेल्या आवाजामुळे ही लक्ष्मी तिथे येत नाही त्याला तिची काळजी वाटायला लागते .तो तिला रात्रभर तिथे शोधतो, पण ती काही दिसत नाही. बंडूच्या डोळ्यामध्ये पाणी येतं ,त्याला वाईट, वाईट विचार यायला लागतात की. कुठल्या वाघाने तर तिला खाल्लं नसेल. बंडू रडत रडत घरी जातो आणि तिला जिथे बांधायचा त्या जाग्यावर स्वतःचे गुडघे टेकून ढसाढसा रडायला लागतो. लक्ष्मी ही फक्त गायच नसते तर बंडूचा जीव असते. आणि तिचे अचानक गायब होणार बंडूला सहन होत नाही. इकडे लक्ष्मी ही खूप आरडा ओरडा करते. पण तिला बदलून दिलेला वेश हे कोणाच्या लक्षात येत नाही .आणि ती गाय बंडूचीच आहे असेही कुणालाच वाटत नाही.

Katha Lekhan Marathi Ek Dhudvala

एक दुधवाला मराठी कथा | Katha Lekhan Marathi Ek Dhudvala 2023

बंडूचा खान पिन बंद होतं मीही गणपतरावाने दिलेला चारा खात नाही लक्ष्मी आजारी पडते लक्ष्मी आजारी पडल्यामुळे आणि ती वेळेत दूध न दिल्यामुळे गणपतरावाला काळजी वाटते. गणपतराव तिला वैद्याकडे घेऊन जातात ,घेऊन जात असताना रस्त्यावर बंडूची नजर त्या गाईकडे पडते. लक्ष्मीच्या डोळ्यात बंडूला पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी येते. ती गणपतरावाचा हात झटकण्याचा प्रयत्न करते. रस्त्यावर बंडू आणि तिची गाय हे दोघे एकमेकांच्या समोर असतात. बंडू त्या घाई कडे जातो, तिच्या पाठीवर हात फिरवतो, हात फिरवत असताना गणपतराव त्याला म्हणतो .ये बंडू तु माझ्या गाईला हात का लावतोस. तो म्हणतो ही माझी लक्ष्मी आहे मी तिला ओळखले तू माझी लक्ष्मी चोरून घेतली आहे. आणि तिला तू एक वेगळाच वेश दिला आहे.

पण बंडू कडे कुठलाही प्रकारचा साक्ष नसते. गणपतराव हा त्याला म्हणतो ही गाय माझी आहे .मी तुझी गाय घेऊन काय करणार? माझ्याकडे तर असंख्य गाई आहे आणि तुझ्या एका गाई ने माझं काय अडल? गणपतराव असं बोलून बंडूला चूप करून देतो. बंडू कडे कुठल्याही प्रकारच साक्ष नसते ,त्यामुळे तो काही बोलू शकत नाही. पण बंडूने त्याच्या गायी ला ओळखलं असते. ते दोघेही खरं आणि खोटं करण्यासाठी सरपंच्या जवळ जातात. सरपंच हा अगदी खरा आणि सत्याला न्याय देणारा व्यक्ती असतो. म्हणून सरपंच ठरवतो की ,तुम्ही दोघे एका रांगेत उभे राहा .या गाई ला मी माझ्याकडून सोडणार आणि ती ज्याच्याकडे जाणार ती गाय त्याची असणार. असं म्हटल्यानंतर सरपंच हा गाईला स्वतःजवळ ठेवतो. आणि दोघांना रांगेत उभा राहिला सांगतो,

गाईला सोडल्यानंतर गाय हे गणपतराव कडे जाते .आणि त्याला तिच्या शिंगाने एक जोरात हुंदाडी मारते .त्या हुंदाडीमुळे गणपतराव खाली पडतो. आणि त्याला मारल्यानंतर गाय ही बंडू कडे जाते. त्याच्या पायाला चाटायला लागते. यामुळे सरपंचाला माहिती पडते कि ती गाय बंडूची आहे. आणि ती गाय बंडूला परत देण्यात येते.

तात्पर्य – दुसऱ्याचा वाईट विचार करणाऱ्या व्यक्ती हा कधीच यशस्वी होऊ शकत नाही ,यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःच्या कष्टाने आणि घामाने पुढे जायला शिका.

एक दुधवाला मराठी कथा | Katha Lekhan Marathi Ek Dhudvala 2023

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Pratiksha

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *