Kavil Meaning In English & It's Symptoms In Marathi

Kavil Meaning In English & It’s Symptoms In Marathi

साधारणपणे पावसाची सुरुवात झाली की,कावीळ डोकं वर काढायला सुरुवात होते. पावसाळ्यामध्ये आणि पावसाळ्यानंतर काविळीचे रुग्ण वाढण्यास सुरुवात होते. कावीळला संस्कृत भाषेमध्ये ‘कामीण’ असे म्हणतात. त्याचा अपभ्रंश करत त्याला कावीळ असे नाव पडले गेले . कामला या शब्दाचा अर्थ होतो सर्व इच्छा नाहीसा करणारा आजार . कावीळ याला ‘हिपेटायटस बी’ असेही म्हणतात.आम्ही तुम्हाला विळीची लक्षणे , त्याची कारणे, त्यावरचे घरगुती उपाय आणि आयुर्वेदीक उपाय यांच्याबाबत माहिती देत आहोत . kavil symptoms in marathi kavil disease in english

काविळची लक्षणे

कावीळ झाली की नाही हे ओळखायचे असेल तर त्याची लक्षणे देखील माहित असणे गरजेचे आहे . जाणून घेऊया काविळीच्या लक्षणाविषयी.

थकवा जाणवणे

ताप आल्यानंतर थकवा हा येतोच हे अगदी स्वाभाविक आहे . पण अगदी सौम्य ताप आहे पण तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल ,तर कावीळ असण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे योग्यवेळी याची चाचणी करणे गरजेचे आहे.

बद्धकोष्ठतेचा त्रास होणे

कावीळ झाल्यानंतर बद्धकोष्ठतेचा वारंवार त्रास देखील होऊ लागतो. पोटात खडे होऊ लागणे . पोट साफ न होणे .या दिवसात पोटाची चयापचय क्रिया बिघडलेली असते. याचा परिणाम पोटावर होऊन बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ लागतो. kavil symptoms in marathi kavil disease in english

पिवळी लघवी होणे

कावीळ झाल्यावर रक्तातील लाल पेशींचे रुपांतर हे बिलीरुबीनमध्ये होते. त्यानंतर त्याचे रुपांतर बाईलमध्ये होते. लघवीच्या मार्गे ते शरीराबाहेर टाकले जाते.
बिलीरुबीनचे प्रमाण वाढते त्यामुले लघवी पिवळी होते. तसेच हे प्रमाण अधिक वाढले तर लघवी पण गडद पिवळी होऊ लागते.

सतत उलट्या

ताप साधा आहे असा विचार करून घरगुती इलाज करत राहिलात तर काही दिवसांनी उलट्या होण्याचा त्रास पण होऊ शकतो. कावीळमध्ये उलट्या होणे हे अजिबात चांगले नाही. जर या काळात उलट्या झाल्या तर लवकरात लवकर त्यावर इलाज करुन घेणे आवश्यक आहे.

पोटावरील भागात दुखणे

पोटामध्ये पित्ताशयाचे खडे झाल्यामुळे पोटदुखीचा त्रास कावीळमध्ये होते. कावीळ झाल्यावर अधून मधून पोट दुखत राहते.

सौम्य ताप येणे

कावीळ झाल्यावर वरचेवर सौम्य असा ताप येत राहतो. काहींना तर ताप आला आहे असे म्हणतात पण लगेच अंग थंड पडते. परत पुन्हा ताप येतो. त्यामुळे वरचेवर सौम्य असा ताप येऊ लागतो.

वजन झपाट्याने कमी होणे

कावीळमध्ये खाण्याची इच्छा मरुन जाते. याचा परिणाम मग आरोग्यावर होतो. वजनही झपाट्याने कमी होते. त्यामुळे अधिकच अस्वस्थ वाटते.वजन वाढवण्यासाठी उत्कृष्ट आहेत बाबा रामदेव यांचे काही घरगुती उपाय. याचादेखील वापर करून घेऊ शकतो . kavil symptoms in marathi kavil disease in english

त्वचा आणि नखं पिवळी पडणे

कावीळ पूर्ण शरीरात भिनल्यानंतर त्याची लक्षणे दिसू लागतात. नख एरव्ही गुलाबी दिसतात. पण कावीळ झाल्यानंतर त्वचा आणि नखं पिवळी दिसू लागतात.

डोळे पिवळे होणे

ज्या प्रमाणे नखं आणि त्वचा पिवळी पडते. अगदी त्याप्रमाणे डोळेही काविळीमध्ये पिवळे दिसू लागतात. कावीळ आहे कि नाही हे तपासण्यासाठी डोळे आणि नखचं तपासली जातात. त्यामुळेच कावीळ झाली हे लक्षात येते.

डॉक्टरांना लगेच भेटा

सौम्य ताप असेल आणि वर सांगितलेली सगळी लक्षणे दिसत असतील तर लवकर त्यावर इलाज करणे आवश्यक आहे.झालेला आजार कावीळच आहे याची खात्री करुन घेण्यासाठी लवकर डॉक्टरांकडे जाऊन चाचण्या करुन घ्याव्या लागतात . तरच त्याचे निदान करता येईल. कावीळवर लस उपलब्ध असून आजाराचे निदान झाल्यावर औषधोपचार सुरु करता येतात.

कावीळची कारणे

कावीळ हा आजार पावसाळ्यात डोकं वर काढतो. . हे सगळ्यांना माहीत आहे . पण या काळात नेमके कोणते बदल होतात जे कावीळ होण्यासाठी कारणीभूत असतात.तसेच कावीळ होण्यामागे नेमकी कोणती कारणे असतात ते ही जाणून घेऊया.

अस्वच्छ पाणी पिणे

हा आजार पावसाळ्यात डोकं वर काढतो. या दिवसाच काविळीच्या रुग्णांमध्ये भरपूर वाढ झालेली दिसते. कावीळ हा संसर्गजन्य आजार आहे . अस्वच्छ पाण्याचे सेवन केल्याने हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.पावसाळ्यात अनेक ठिकाणी दूषित पाण्याची समस्या निर्माण झालेली असते. प्रतिकारशक्ती कमी असेल आणि कुठेही पाणी पिले तर याचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते.

Kavil Meaning In English & It's Symptoms In Marathi

बाहेरचे अन्न अति खाणे

बाहेरचे अन्न खायची सवय असेल तर कावीळ बळावण्यासाठी ते एक कारण बनू शकते. पावसाळ्यात बाहेरच्या पदार्थांमध्ये वापरण्यात आलेले पाणी त्रासदायक ठरु शकते. सतत बाहेरचे पदार्थ या दिवसात खात असाल तर अधिक काळजी घेणे गरजेचे असते.

मद्यपान करण्याची सवय

मद्यपानाच्या अति सेवनामुळे यकृताला सूज येऊ शकते. त्यामुळे देखील कावीळ होऊ शकते. जर मद्याचे अधिक सेवन हे देखील कावीळचे कारण ठरु शकते. त्यामुळे कावीळ झाल्यानंतर मद्यपान करु नका असे सांगितले जाते.मलेरिया आणि टायफाईड झाल्यानंतर पेशी कमी होतात. अशावेळी देखील कावीळ होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे खूप काळजी घेणे आवश्यक असते.

घरगुती उपचार

काविळ आहे हे निदान झाल्यानंतर काही घरगुती उपायही कावीळ कमी करण्यासाठी केले जातात. हे घरगुती उपाय फारच सोपे आहेत आणि सहज उपलब्ध होणारे आहे. त्यामुळे हे उपाय करुन शकतो .याचा कोणताही विपरीत परिणाम आरोग्यावर होत नाही. kavil symptoms in marathi kavil disease in english

ऊसाचा रस

ऊसाचा रस बऱ्याच जणांना आवडतो. इतर वेळी सुद्धा हा रस आवर्जून प्यायला जातो. कावीळ झाल्यानंतर ऊसाचा रस प्यायला सांगतात . काविळीसाठी हा खूप गुणकारी आहे. ऊस चावून देखील खाऊ शकतो .उसाच्या रसामुळे शरीरात उष्णता निर्माण होते . रक्त तयार होण्याची प्रक्रिया सुरु होते. शिवाय रोग प्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे कावीळमध्ये ३ ते ४ ग्लास ऊसाचा रस नक्की प्यावा.

टोमॅटो रस

टोमॅटोचा रस हा काविळीवर गुणकारी असतो. रोज सकाळी उठून एक पेलाभर टोमॅटोचा रस प्यावा. टोमॅटोचा रस नुसता पिणे शक्य नाही . तर त्यामध्ये मीठ आणि मिरपूड घालावी . त्यामुळे तोंडालाही चव येते .

मुळ्याचा रस

काविळमध्ये काहीही खाण्याची आणि पिण्याची इच्छा होत नाही . पण या दिवसात शरीराला उर्जा मिळण्यासाठी चांगला आहार घेण्याची गरज असते. पण या दिवसामध्ये भूक लागत नाही.म्हणूनच मुळ्याचा रस आहारात घेणे आवश्यक असते. मुळ्याची पाने खुडून त्याचा रस प्यायलाने पोट साफ होते तसेच भूकही लागते. त्यामुळे किमान १ ग्लास भरून मुळ्याचा रस प्यावा.

पपई पानांचा रस

पपईच्या पानांचा रस हा अनेक आजारांवर गुणकारी असतो . पपईची कोवळी पाने वाटून त्याचा रस केला जातो. या पानांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची क्षमता असते . म्हणूनच पपईच्या पानांचा रस या दिवसात घ्यावा .
यासाठी पपईची कोवळी पाने निवडायची आहे.

लिंबू रस

काविळीमध्ये यकृताला त्रास होतो. यकृताचे कार्य पूर्ववत आणि चांगले करण्यासाठी लिंबाचा रस मदत करते . म्हणून दिवसातून २ ते ३ वेळा लिंबाच्या रसाचे सेवन करावे. त्याने आराम पडेल.

भिजवलेले मनुके

शरीरातील उर्जा वाढवण्याचे काम ड्रायफ्रुट करते. त्यातल्या त्यात मनुके कावीळीसाठी चांगले असतात. काळे मनुके रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते खावे . काविळनंतर साधारण १५ ते २० दिवस मनुक्यांचे सेवन करा. kavil symptoms in marathi kavil disease in english

तुळशीची पाने

तुळशीच्या पानामधले औषधी तत्व कावीळ बरी करण्यासाठी चांगले असतात. त्यामुळे शक्य असल्यास या दिवसात पाने चावून खावीत . एकावेळी ७ ते ८ पाने चावून खाऊ शकता. त्यामुळे बरे वाटेल. शिवाय कावीळ कमी होण्यासही मदत होईल.

आवळा रस

आवळ्याचा रस काविळीवर गुणकारी असतो. कावीळ झाल्यानंतर आवळ्याच्या रसाचे एकदा तरी सेवन करावे.

याचा समावेश आपण आहारात केल्याने कावीळ बरी होण्यास मदत होते .

Post Office Vima फक्त ₹ 399 ची विमा योजना

लहान मुलांच्या आरोग्य विषयक ब्लॉग्स वाचण्यासाठी क्लिक करा

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 5 / 5. Vote count: 1

No votes so far! Be the first to rate this post.

As you found this post useful...

Follow us on social media!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
54 ⁄ 27 =