Kavita Angraj Karn in 2024

दानशूर | best Kavita Angraj Karn in 2024

श्री मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Kavita Angraj Karn in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Kavita Angraj Karn in 2024

काव्य बंध समूह आयोजित
काव्य लतिका रविवार काव्य स्पर्धा
दिनांक ३मार्च २०२४
विषय:-महारथी कर्ण

दानशूर | Kavita Angraj Karn in 2024

कुंतीचा मी पुत्र
सुर्याच घेऊन तेज
जन्म माझा जाहला
सुर्य वंश म्हणून क्षेत्रिय आला

पवित्र जरी जन्म झाला
तरी पांडव म्हणून स्वीकार
माझा नाही झाला.
पांडव असूनही पांडवांसारखा
मान नाही मिळाला.

व्यथा जिवनाची माझ्या कथा बनून राहिली.
सुर्याचे तेज घेऊन जन्माला जरी आलो तरी अंधारात राहिलो.

खरा मी होतो तरीही खोट्यात मी राहिलो.
अधिकार मला कसला मिळाला नाही परंतु कर्तव्य करीत जगत राहिलो.

मी दानशूर कर्ण
होता क्षेत्रियाचा वर्ण
शोधता शोधता स्वतःला
जीवन जगलो मी लाजिरवाण

नव्हतं कोणी काय दिले मला जन्मा व्यतिरिक्त
तरीही मी माझ्या जवळ
आहे ते देतच राहिलो.

दानशूर कर्ण म्हणून नाव माझे झाले .
पांडवांना वाचवण्यासाठी जे हवे ते माझ्याकडून घेत राहिले.

सत्य हारू नये म्हणून मीही देत गेलो.
खरयासाठी दिल्यामुळे दानशूर कर्ण म्हणून अमर मी राहिलो.

होती माझी पात्रता तरीही मला
काही नाही मिळालं.
शुरवीर असूनही जिंकता जिंकता
काळीज माझे जळालं

पाच पांडवांची एकी
त्यात सहाव्या नको
म्हणून कौरवांच्या सोबत
करून विरमरण हि नाही मिळालं

फसवणूक करून मला
घातपात घडवून आणून
मरण मिळालं.
आईचं अश्रूही माझ्यासाठी नाही
पाहिलं

श्री मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे
देहू माळवाडी पुणे

Kavita Angraj Karn in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *