Kavita : ती अनोळखी रात्र
प्रस्तावना
सहवास. हा सहवास फक्त दोन माणसांन मधेच होतो का? नाही ना?
की मी एकटीच अशी वेडी आहे, जिला वाटते कि तो निर्जीव वस्तूं सोबत अथवा निसर्गा सोबत पण होऊ शकतो? मला वाटते नुसते एकमेकान सोबत बोलण्यापेक्षा, काही न बोलता देखील समोरच्याला समजून घेणे म्हणजे खरा सहवास. नाही का?
आयुष्याचा हा धडा मला त्या रात्री मिळाला जेव्हा पहिल्यांदा खऱ्या अर्थाने तिची आणि माझी ओळख झाली. ती म्हणजे रात्र. हो, ह्या रात्री मध्ये खूप रहस्य दडली आहेत. काहींसाठी ती फक्त झोपायची वेळ असेल, पण काहींसाठी ती त्यांच्या एकांतात त्यांना देणारी सोबत बनते. माझ्यासाठी तर ती माझ्या कलेला चालना देणारे कारण ठरली. माझ्या कविते द्वारा मी तिच्या शब्दांचा आवाज बनले. हो, कविता लिहण्याचा तो माझा सर्वात पहिला प्रयत्न होता. आता तो प्रयत्न यशस्वी ठरला कि नाही, हे माझी कविता वाचून तुम्हीच मला सांगा.
Kavita : ती अनोळखी रात्र

“मी आणि माझा एकांत, सोबतीला मात्र ती अनोळखी रात्र,
सोबत तिच्या तो घनदाट काळोख, अशी होती आमची ती सर्वात पहिली ओळख.
सहवास झाला, गप्पा रंगल्या, विचार जुळले,
शब्ध तिचे कवितेत उतरवायला हाथ माझे आपोआप वळले.
म्हणते कशी, प्रेमात पडलेल्या सूर्याची सतत वाट पाहत राहते
आणि सायंकाळी त्याची भेट घेयला समुद्र किनारी जाते.
भेट होण्या पूर्वीच सूर्य मात्र मावळून जातो,
बघणा ग, रोज हा आमचा लपंडाव चालूच राहतो. Kavita : ती अनोळखी रात्र
वाटते कि आता काळोख आणि एकांत हेच आहेत माझे सवंगडी,
इंग्लिश मध्ये म्हणतात ना ते काय ‘बेस्ट बडी’.
हो आणि आता तुझी देखील साथ आहे लाभली,
माझ्या आयुष्यावर तू तर डायरेक्ट कविताच लिहिली.
हळू हळू रात्र सरली, मी देखील निजले
आणि दुसऱ्या दिवशी मात्र दिवसभर तिचीच वाट पाहत बसले.
मन माझे व्याकुळ झाले. कधी रात्र येते, कधी दिवस सरतो
आणि कधी माझ्या लेखणीला तिच्या शब्दांचा स्पर्श होतो “
Kavita : ती अनोळखी रात्र
तर हाच होता तो सहवास ज्या मध्ये न बोलता देखील ती रात्र खूप काही बोलून गेली. ती मला खूप आपलीशी वाटली. एकांत हे माझ्या आणि तिच्या मधले साम्य होते, कदाचित म्हणूनच मी तिला समजू शकले आणि तिच्यावर लिहू शकले. हे होते माझे रात्रीचे रहस्य. मला खात्री आहे कि तुमच्या कडे देखील असे काही वेडसर रात्री सोबतचे रहस्य, अनुभव असतीलच, तर ते नक्की मला आपल्या कंमेंट्स द्वारे कळवा आणि हो, माझी कविता आवडली कि नाही ते देखील सांगा. आपण लौकरच भेटू पुन्हा एकदा एका नव्या अनुभवा सोबत, एका नव्या कविते सोबत. तोपर्यंत ‘स्टे सेफ स्टे होम’.
Kavita : ती अनोळखी रात्र
Author : Ms. Shroti
