बाप | Best kavita for baba in marathi in 2023

रिंकू राजेश बागडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत kavita for baba in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

kavita for baba in marathi

काव्यबंध समूह आयोजित काव्यलतिका
दिनांक :15/10/2023

विषय – वडील / बाबा

बाप | kavita for baba in marathi

बोलला रागातही जरी
तरी करतो माझी भले
येता तुफान हे मोठे
तेव्हा पहाडही हले…1…

जीवनाच्या झऱ्यामध्ये
दुःखाचा भवर ज्याने साठवला
जेव्हा कोणी नाही सोबतीला
तेव्हा माझा बाप मला आठवला …2…..

आयुष्यातील निर्णय घेताना
कधी नाही चुकला
एक बाप मात्र लेकरांच्या
प्रत्येक जिद्दी पुढे झुकला …3…..

पायातली चप्पल लेकराला देऊन
स्वतः काट्यावर चालत असे
पोरांचं भल पाहून
बाप स्मित हसू हसे …4….

स्वतःचे जीवन विसरून
मुलांचे स्वप्न पूर्ण केले
खरं सांगू तर बापाने
पूर्ण आयुष्य लेकरासाठी दिले …5…

बापाचं मोल
कधी कोणाला कळत नाही
कारण बाप मायसारखा
दुःखातही रडत नाही ….6….

जीवनभर शिकवत होता
संस्काराचा धडा
आम्हाला शिक्षा देऊन
लढत होता तो स्वतःशीच लढा….7…

चुकिवर रागावून त्यांनी
मान-सन्मानाचा पाठही शिकवला
जीवनभराच्या घामाने त्यांच्या
मान खूप पिकवला….8…

काळोखाच्या अंधारात
बाप एकुलता एक दिवा असतो
ओळखू नाही शकत आपण त्याला कारण
दिवसाच्या उजेडात तो आपल्याला शत्रूच दिसतो ..9…

जीवनाच्या प्रत्येक वळणावर
एक नवीन मित्र भेटतो
पण शेवट पर्यंत साथ देणारा
देवमाणूस आपला बाप असतो …10…

स्वरचित कविता
रिंकू राजेश बागडे
नटाला (बोथली)

बाप | Best kavita for baba in marathi  in 2023

kavita for baba in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह