Kavita For Maitri In Marathi

मैत्री कशी असावी By सौ.Rupali Mathapati | Best Kavita For Maitri In Marathi 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ.Rupali Mathapati यांची -मैत्री कशी असावी- हि कविता -Kavita For Maitri In Marathi- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे

मैत्री कशी असावी By सौ.Rupali Mathapati | Best Kavita For Maitri In Marathi 2023

मैत्री कशी असावी . . . Kavita For Maitri In Marathi

Best Kavita For Maitri In Marathi 2023

मैत्री कशी असावी . .
विचारले कुणीतरी . . . .
असावी अशी भरकटलेल्या जहाजाला
किनारा दाखवणारी . . .
रानात हरवलेल्या पाखराला
घरटं दाखवणारी . . .

मैत्री असावी
ढगाळ आभाळा सारखी
धो धो बरसणारी . . .
एका छत्रीतून जाताना
मित्र भिजू नये . . .
म्हणून स्वतः भिजणारी

मैत्री अशी . . .
जिवलग असावी . ‘
जीव लावून जपणारी
जीवाला जीव देणारी ‘
जवळीक साधून जीवापार प्रेम करणारी

मैत्री अशी . . . .
हक्काची असावी
हाक मारण्याआधी धावून येणारी
हक्काने खांद्यावर अश्रू सांडणारी
एका हाकेला ओ देणारी
मित्रावर हक्क गाजवणारी . . .

मैत्री असावी . . . .
भेटीसाठी आतुर असणारी
वाट पाहत वाटेवर थांबणारी
पाठी फिरून परत भेटूया
या आशेवर निरोप देणारी
नजरेआड होईपर्यंत थांबणारी

मैत्री असावी . . . . .
आठवणीत ठेवणारी
विसरण्याचा प्रयत्न न करणारी
गेलेले दिवस नव्याने आठवणारी
विसरून गेलो तरी आठवण करून देणारी
आठवणीने शेवटपर्यंत साथ देणारी. .

मैत्री असावी . . . . .
मन मोकळे करून बोलणारी
न सांगताच डोळ्यातील भाव ओळखणारी
सर्व काही शब्दाविना समजून घेणारी
डोळ्यातलं पाणी नकळत पुसणारी
तहान भूक विसरून गप्पा मारणारी’ .

मैत्री असावी . . . . .
दुःखात हक्काने भागीदारी मिळवणारी
सुखदुःखात हात घट्ट धरून ठेवणारी
संकटात सुद्धा खळखळून हसणारी
काळजी करून काळजात घर करणारी
अपयशाच्या दरीत तोल सांभाळणारी

मैत्री असावी . . . . .
विजयाच्या उत्सवात सामील होणारी
पराभवाच्या वेदनेवर फुंकर मारणारी
जखमांच्या वेदना सहन करणारी
दुःखाच्या वाळवंटात पाझर आणणारी
स्वतः दुखी राहून सुखी रहा म्हणारी

मैत्री असावी . . . . . .
अर्पण करून मोबदला न मागणारी
अडचण लक्षात घेऊन समस्या सोडवणारी
आपली समजूत न काढता समजून घेणारी
अनोख्या या नात्याला नाव नसणारी
आपली चूक सुधारायला लावणारी

मैत्री असावी . . . . . .
सोबत जेवण्यासाठी उपाशी राहणारी
एकटेपणात सहवासाचा दिलासा देणारी
वळणा .वळणाच्या वाटेवर साथ देणारी
सुखाची किल्ली दुःखाला कुलूप लावणारी
मित्रासाठी साऱ्या जगाशी लढणारी . .

मैत्री असावी . . . . .
विरहाणे कासावीस होताना सावरणारी
मनातलं प्रत्येक गोष्ट एकांतात सांगणारी
भासांच्या मागून धावणाऱ्याला सावरणारी
तोल जाताना मित्राला सांभाळणारी . .

मैत्री असावी . . . . .
आभाळा एवढी प्रेम करणारी
पावसा सारखी कोसळणारी
आणि गुलाबी थंडी सारखी
हवी हवीशी वाटणारी . . . .

रुपाली मठपती . . .
9590008420

मैत्री कशी असावी By सौ.Rupali Mathapati | Best Kavita For Maitri In Marathi 2023

मैत्री कशी असावी By सौ.Rupali Mathapati | Best Kavita For Maitri In Marathi 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

1 thought on “मैत्री कशी असावी By सौ.Rupali Mathapati | Best Kavita For Maitri In Marathi 2023”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
27 × 13 =