काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ.अर्चना अशोक कुलकर्णी यांची -आम्ही पाच बालपणीच्या मैत्रीणी – हि कविता -Kavita In Maitri- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
आम्ही पाच बालपणीच्या मैत्रीणी By सौ.अर्चना अशोक कुलकर्णी | Best Kavita In Maitri 2023
आम्ही पाच बालपणीच्या मैत्रीणी | Kavita In Maitri 2023

आज आठवतोय तो खास
शाळेमधला पहिला दिवस
कुतुहलाचाही पहिला श्वास
भिती नामे पहिला आभास
रजनीने धरलेला घ..ट्ट हात
धीट बिलूचा वावर बिनधास्त
माझा अवतार केवढा धांदरट
रेखाचे मुख भावनांचे मिश्रण
नवीन चेहरे नजर परकेपणाची
जीव घाबरे,कसरत सोसण्याची
कळले नाही परके शेजारी झाले
सारे मग एकतेत सामिल झाले
भारी एन्ट्री शाळेत प्रत्येकाची
गुणगुणत असायची अनिलची
खाड खाड आवाजात सदाची
मिश्किल हासत गप्पिष्ट मधुची
गंभीर चेहरा भाऊ काळकरची
प्रश्नचिन्हासह असे बाविस्करची
मीनाची सदा स्वतःच्या विश्वात
बटांना सावरतच नलूची ठुमकत
गोखलेची तर वडीलांच्या थाटात
जोशीची नेहमी साधी सरळ रेषेत
देशमुखची तर साहेबी थाटातच
शोभाची मात्र स्वतःच्याच कोशात
अभ्यास , खेळ, अभ्यासेतर काम
वर्ग नंबर एकवरच स्वार कायम
पाच मैत्रिणी गट पक्का जमला
बाकी सारे शेजार चांगला झाला
घंटेच्या आधी दोन तास जमायचे
दप्तर ठेऊन मनसोक्त खेळायचे
तेढ ,भांडण बिचारे लांब रहायचे
वर्गात फक्त अभ्यासातच बुडायचे
सुटीत पण नेहमीच भेटत रहायचे
कधी कधी पिकनिकलाही जायचे
सतत बडबड नी. निखळ आनंद
हाच अजेंडा , दुसरा नव्हताच छंद
आणि एक दिवस होता उजाडला
निरोप समारंभ आयोजित झाला
डोळ्यांच्या धारा थांबता थांबेना
भाषण करण्यास शब्दही सुचेना
आमच्या वाटाही वेगळ्या झाल्या
शेवटी छायाचित्रात एकत्र बसल्या
वर्षे सरली मोजण्या नाही केल्या
मैत्रीसह मैत्रिणी मनात राहिल्या
मुलगी,आई आता झालोय आजी
बालपणीची मैत्री सत्तरीही ताजी
पाच वर्षांनी रजु भारतामधे येते
बालपणीच्या मैत्रिणींची भेट ठरते
पाच वर्षांच्या गप्पा खळखळतात
पाच बिचारे मित्रत्वाने दाद देतात
चोवीस तासांचीच ती भेट असते
रंगीत आनंदाचे कारंजे फुलतात
आनंदाने निरोपही देतात
ओल्या डोळ्यांनी परतात
पुढील विरही वर्षांसाठी
आठवणींची बेगमी देतात
अर्चना कुलकर्णी , ठाणे
आम्ही पाच बालपणीच्या मैत्रीणी By सौ.अर्चना अशोक कुलकर्णी | Best Kavita In Maitri 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
आम्ही पाच बालपणीच्या मैत्रीणी By सौ.अर्चना अशोक कुलकर्णी | Best Kavita In Maitri 2023
Very Nice.
मस्त आठवणींच्या काव्य भेटी