kavita on baba in marathi

माझे आबा by वीणा पाटील | Best kavita on baba in marathi in 2023

वीणा पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत kavita on baba in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

kavita on baba in marathi

काव्य बंध समुह आयोजित काव्य लतिका…15/10/23
विषय…. बाबा /वडील

माझे आबा by वीणा पाटील | Best kavita on baba in marathi in 2023

माझे आबा | kavita on baba in marathi

माझे आबा म्हणजेच बाबा
रोजच होते त्यांची आठवण
बालपणापासूनच लाडकी लेक
किती करावं त्यानी प्रेमाचं सिंचन…1

जीवापाड प्रेम मजवर करित
कालवलेला ताटातील भात
बाई..बाई म्हणून बोलवून
आपल्या हाताने भरवत. ..2

स्वभाव होता त्यांचा तापट
काहीही असेल मागायचं
ते सगळ आईच्या मार्फत
सांगून आम्ही ते मिळवायचं….3

kavita on baba in marathi

तब्येतीने होतो मी जरा बारीक
रोज होता खुराक बदाम खडीसाखरेचा
जवळ बसवून मला खाऊ घालीत
आता उजाळा होतोय आठवणींचा ….4

लग्नास झाले उपवर तरीही
कुठलेच स्थळ नाही यायचे मनाला
लेक माझी कशी राहील सुखी
हीच लागे काळजी सतत जीवाला…5

पूर्वी नव्हते फोन मोबाईल काही
लेकीच्या पत्राची वाट पहात
तास नी तास उभारणार गच्चीत
हळवे माझे आबा आज नाही हो हयात….6

माझे आबा थोर नामवंत वकील
गोरगरीबांची कामे करत फुकटात
आजही त्यांच् नाव कितीतरीजण काढतात
असे हे माझे आबा नित्य माझ्या आहेत र्‍हदयात…..7

वीणा.पाटील कोल्हापूर

kavita on baba in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *