बाबा | Best kavita on baba in marathi in 2023

आशु छाया प्रमोद (रावण) यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत kavita on baba in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

kavita on baba in marathi

काव्यबंध समूह आयोजित काव्यलतिका
दिनांक:- १५/१०/२०२३
विषय :- वडील/ बाबा/ पप्पा/ बाप

बाप | kavita on baba in marathi

बाबा | Best kavita on baba in marathi in 2023

लेका तुला जन्म दिलं माई नं,
बापा नं दिलं नाही…..
पण बापा सारखं प्रेम तुला,
माईनं ही केलं नाही…

दुधावरची साय म्हणायला माईला,
कुणीबी विसरला नाही……
आनं बापाला लंगड्याचा पायही,
कुणी म्हणला नाही….

आयुष्यभर राब-राब-राबला लेका तुझ्यासाठी,
पण प्रेमाने त्याला तू बाप म्हणत नाही
आनं मोठा होऊन घरी आला नी बापाला म्हनला,
बाप तुला काही कळत नाही…..

लेका तुझं वय वाढलं पण,
बाप होता आलं नाही…..
जिवंत पणी त्या बापाला,
पाणी पाजलं नाही…

लेका तुला तुझ्या बापाचं प्रेम,
कधीच कळलं नाही…
पण बाप सोडून गेल्यावर सांग लेका,
तु रडलं नाही…

बाप गेल्यावरच कळतो रे लेका सर्वांना,
जिवंत पणी तो कधीच कळत नाही…..
लेका त्या बापा सारखा माणूस,
दुसरा शोधून मिळत नाही……

✍️आशु छाया प्रमोद (रावण)

Best kavita on baba in marathi in 2023

kavita on baba in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह