काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ. नंदा कोकाटे यांची -साजन! तू माझा होशील का?- हि एक Kavita on pahile prem in Marathi आहे
साजन! तू माझा होशील का? Kavita on pahile prem in Marathi

झाले-गेले विसरुनी सारे,
पुन्हा फिरुनी येशील का?
किल्मिष मनातील झटकुनी सारे,
साजण! तू माझा होशील का?
तू पुन्हा एकदा येशील का?
आठवती का तुला आपुले,
दिवस रोज ते फुलायचे?
सहवासाची ओढ अनामिक,
मन आतुर होऊनी झुलायचे ।
समजुनी घेता एकमेकां,
भाव अंतरी उमलायचे
हातात आपुले हात गुंफता,
रोमांच अंगी उठायचे ।
भेटीसाठी व्याकुळ होता,
जीव बावरे व्हायचे
कधी-कधी वाट पाहता,
नयनही पाणावायचे ।
स्पर्शासाठी मन आसुसता,
अंगी मोरपीस फिरायचे
मग विसरुनी साऱ्या क्लेष-चिंता,
एकमेकां कवेत घ्यायचे ।
कधी एकांती, कधी बाजारी,
खेटून उभे राहायचे
रोखून होत्या किती नजरा,
तरी प्रेमात वाहत जायचे ।
कधी कशाची न केली पर्वा,
दोघांचेच विश्व आपले
तू माझा अन् मी तुझी,
कधीच नाही काही खुपले ।
ते क्षण सोनेरी धुंद स्वच्छंदी
बागडणाऱ्या फुलपाखरापरी
कधी तळ्यावर, कधी मळ्यावर
वेचत होतो मधुकण अमृतापरी ।
रुसवे-फुगवे जरी निरंतर,
एक पाऊल मागे हटायचे
थोडे तुझे, थोडे माझे करत,
पुन्हा सख्य जमायचे ।
मग आता असे का अंतर पडले,
तुझ्या माझ्यात विचारांचे?
मीपणाने उसवत गेले,
धागे आपुल्याच प्रीतीचे ।
गृहीत धरता एकमेकां,
वाढले ओझे अपेक्षांचे
उणे-अधिक करता होता,
सुटले संयम दोघांचे ।
ताणुनी धरता हट्ट आपुला,
नाते नकळत विरले रे
पोरखेळ हा, नसे शहाणपण,
फिरुनी आता उमजले रे ।
नको असा तू धरू अबोला,
सल मनास हा सलती रे
तगमग होऊनी दोन जीवांची,
मने आपुलीच जळती रे ।
आठवणींच्या हिंदोळ्यावर,
का अजुनही तुला मी स्मरते रे?
रातराणीचा सुगंध येता,
का एकांत तुला ही छळतो रे?
वाटे हवीशी मी तुलाही,
मन तुझे मलाही कळते रे
संपवूनी आता हा दुरावा,
कधी मज तू ह्रदयाशी धरशील रे?
पुन्हा एकदा मांडू डाव,
सुख ओंजळीत भरू रे
हसत-खेळत आयुष्याला,
दोघे सामोरे जावू रे ।
सोबतीने चालताना देवू
एकमेकां आधार रे
रथ चालवू संसाराचा,
जगणे सुंदर बनवू रे ।
साद घालते अंतरातुनी,
प्रतिसाद मला तू देशील का?
आयुष्याच्या नव वळणावरती,
पुन्हा साथ मला तू देशील का?
पहिल्या प्रेमाची रंगत न्यारी,
खुणा उमटती खोल मनावरी
कधी न पुसल्या जाती, साजणा!
पुन्हा एकत्र झुलूया झुल्यावरी ।
झाले-गेले विसरुनी सारे,
पुन्हा फिरुनी येशील का?
किल्मिष मनातली झटकुनी सारे,
साजण! तू माझा होशील का?
तू पुन्हा एकदा येशील का?
तू पुन्हा एकदा येशील का?

साजन! तू माझा होशील का? | Best Kavita on pahile prem in Marathi 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
साजन! तू माझा होशील का? | Best Kavita on pahile prem in Marathi 2023