सैनिकाचे जीवन | Best Kavita on Soldier’s Life in 2024

सौ. अचला धनंजय धारप यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Kavita on Soldier’s Life in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Kavita on Soldier’s Life in 2024

काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका
रविवारीय काव्यस्पर्धा
दिवस २५/०२/२०२४
स्वरचित कविता

विषय – सैनिकासाठी कविता

सैनिकाचे जीवन | Kavita on Soldier’s Life in 2024

सैनिक होण्यासाठी
प्रेरीत नवजवान
सैन्यात भरती होतात
गातात मातृ भू चे गान

अभिमान मातेला
अशा पुत्राचा
डोळ्यात आसू
निरोप घेते त्याचा

त्यागाची मुर्ती
सैनिक असतात
संसार सुखावर
पाणी सोडून जातात

ऊन ,पाऊस,वारा
पर्वा नसते त्यांना
मातृभूमीचे रक्षण
हाच ध्यास त्यांना

दसरा, दिवाळी
सारेच दिन सारखे
मातृभूमीच्या प्रेमासाठी
होतात ते पारखे

ते लढतात सीमेवर
आपण सुखाने जगतो
झाला जर भ्याड हल्ला
पेटून जवान उठतो

डगमगत नाहीत जरी
देशावर झाला हल्ला
जीवावर उदार होऊन
गाठतात त्यांचा पल्ला

द-या खो-यातून
बर्फाळ प्रदेशातून
शत्रूवर तुटून पडतात
बिकट वाट काढून

सापडले जरी
शत्रूच्या कचाट्यात
मोडेन पण वाकणार नाही
म्हणत सारे सहन करतात

देशाभिमान आणि देशभक्ती
असते प्रेरणा स्थान
मृत्युला सामोरे जातात
राखत तिरंग्याचा मान

होतात काही शहीद
देशासाठी होतो अंत
देशासाठी गेले प्राण
नसते त्यांना खंत

सैनिक पत्नीला
दुःख विरहाचे
थोडेच दिन नशिबी
संसार सुखाचे

मुला बाळांना
बाबाचा नाही सहवास
आई आठवण काढत
भरवते बाबांचा घास

सैनिकाचे आयुष्य
खडतर असते
लढताना वीरमरण
तर कधी अपंगत्व येते

देश रक्षणा-या सैनिकांप्रती
कृतज्ञता असावी
त्यांच्या यशासाठी
सदा प्रार्थना करावी.

सौ. अचला धनंजय धारप
रोहा, जिल्हा रायगड

Kavita on Soldier’s Life in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *