Khashaba Jadhav Information In Marathi 2023

खाशाबा जाधव The Great पोकेट डायनामो | Khashaba Jadhav Information In Marathi 2023

भारताला कुस्ती ऑलिम्पिक स्पर्धा मध्ये कास्य पदक जिंकवून देणारे पाहिले भारतीय खेळाडू Khashaba Jadhav Information In Marathi यांची माहिती आपण पाहणार आहोत.

तर मित्रांनो आम्ही तुम्हाला खाशाबा जाधव यांचे जीवन परिचय, त्यांचा करीअर तसेच त्यांना मिळालेले पुरस्कार तसेच त्यांच्यावर कोणते Upcomming movie येणार आहे हे देखील सांगणार आहोत. तर मित्रांनो प्रस्तुत Article तुम्ही अगदी सुरवातीपासून ते शेवटपर्यंत नक्की वाचा.

Khashaba Jadhav Information In Marathi

Khashaba Jadhav यांचं पूर्ण नाव खाशाबा दादासाहेब जाधव आहे.खाशाबा जाधव यांना “पॉकेट डायनॅमो” या टोपण नावाने ओळखले जात होते. त्यांचा जन्म 15 जानेवारी 1926 रोजी सातारा जिल्ह्यातील गोळेश्र्वर या ठिकाणी झाला. त्यांचे वडील ख्यातनाम पैलवान दादासाहेब जाधव हे कुस्ती खेळाचे वस्ताद होते. Khashaba Jadhav हे दादासाहेब जाधव यांचे सर्वात लहान आणि पाचव्या क्रमांकाचे मुल होते. आणि त्यांच्या आईचे नाव श्रीमती पुतलीबाई जाधव होते. त्यांनी त्यांचं शिक्षण कराड येथील टिळक हायस्कूल मधून पूर्ण केले. आणि नंतरचं उर्वरित आयुष्य त्यांनी कुस्ती या क्रीडा क्षेत्राकडेच वळविले. पुढील शिक्षण त्यांनी कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयातून पूर्ण केले.

Khashaba Jadhav यांचं करीअर in Marathi

Khashaba Jadhav यांना सुरवातीपासूनच कुस्ती मध्ये आवड होती त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षी पासूनच कुस्ती संबंधित मार्गदर्शन द्यायला सुरवात केली. त्यांनतर त्यांना महाविद्यालयातील च बाबुराव बाळवडे आणि बेलपुरी गुरुजी यांच्याकडून मार्गदर्शन लाभलं. कुस्ती मध्ये त्यांची आवड असली तरी देखील तर शिक्षणात मागे पडले नाही किंवा त्यांचं शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं नाही. 8 वर्षाचा असताना त्या भागात प्रसिद्ध असणाऱ्या चॅम्पियनला 2 मिनिटांत लोळवले होते.

खाशाबा जाधव The Great पोकेट डायनामो | Khashaba Jadhav Information In Marathi 2023


सन 1948 मध्ये त्यांची लंडन ऑलिम्पिक मध्ये फ्लायवेट गटासाठी निवड झाली. आणि तिथे ते सहाव्या क्रमांकावर होते. परंतु आंतरराष्ट्रीय कुस्ती नियमावली नुसार हा सहावा क्रमांक त्यांना पुढे घेऊन जाणारा ठरला नाही. तरी देखील सहाव्या क्रमांकावर पोहोचणारे ते पहिले भारतीय ठरले.
सन 1952 मध्ये हेलसिंकी येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी बॉटमवेट गटासाठी त्यांनी जोरदार तयारी केली. परंतु राष्ट्रीय निवड प्रक्रियेत त्यांना मुद्दाम एक मार्क कमी दिल्यामुळे त्यांची निवड होऊ शकली नाही. स्वतःवर झालेल्या या अन्यायाविरुद्ध त्यांनी लढायचं निश्चित केलं आणि त्यासाठी त्यांनी पतियाळाचे महाराज यांच्याकडे न्यायासाठी विनंती केली. तेव्हा त्यांनी हा मुद्दा वर उचलला आणि त्यांच्या विरोधी कुस्तीपटू सोबत ट्रायल घेतली. यामध्ये त्यांनी कुस्तीपटू ला चितपट केलं. आणि त्यांची हेलसिंकी ऑलिम्पिक साठी निवड झाली.


हेलसिंकी जायचं म्हटलं तर त्यांना पैशांची गरज होती त्यासाठी गावातून वर्गणी जमा केली. त्यांच्या कोल्हापूर येथील महाविद्यालयातील प्राचार्य बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी आपलं स्वतःचं घर गहाण ठेवून 7000 रुपये दिले. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याकडे पैशांची मदत मागितली तेव्हा त्यांनी 4000 रुपयांची मदत केली. हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी ब्राँझ पदक मिळविले. ते ब्राँझ पदक स्वतंत्र भारताला मिळालेले पहिले पदक ठरली. त्यावेळी त्यांच्या गावातील लोकांनी त्यांचा ढोल ताशे वाजवून स्वागत केला. खरंतर त्यावेळी हॉकी टीमने गोल्ड मेडल मिळविले होते परंतु विशेष कौतून खाशाबा यांचेच झाले. कोल्हापूर मधील सर्व तालीम आखाड्यानी तसेच महाविद्यालयांनी भरभरून कौतुक केले.


खाशाबाने कोल्हापूर मध्ये कुस्ती फडाचे आयोजन केले. आणि त्यात स्वतः देखील सहभाग घेतला त्यातून मिळालेल्या पैशामधून त्यांनी त्यांच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आपले घर गहाण ठेवून त्यांनी हेलसिंकी जाण्यासाठी पैशांची मदत केली होती त्यांना ते घर परत मिळविण्यासाठी दिले.


सन 1955 साली ते महाराष्ट्र पोलीस दलात ते सब-इन्स्पेक्टर म्हणून भरती झाले. तिथे त्यांनी आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत अनेक कुस्त्या जिंकल्या. त्याच वेळी ते राष्ट्रीय स्तरावर स्पोर्ट्स मार्गदर्शक म्हणून काम करू लागले. हे करीत असताना त्यांनी 27 वर्षे पोलीस खात्यामध्ये नोकरी केली. आणि नंतर त्यांची ACP असिस्टंट पोलीस कमिशनर म्हणून नियुक्ती झाली. तिथूनच त्यांची नंतर निवृत्ती झाली. त्यांना पेन्शन साठी खूप झगडावे लागेल आणि स्पोर्ट्स फेडरेशन ने देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांना त्यांचं उर्वरित जीवन गरिबी मध्येच काढावं लागलं.


शेवटी 14 ऑगस्ट 1984 मध्ये एका रोड अपघात मध्ये त्यांचं दुःखद निधन झालं.

Khashaba Jadhav यांना मरणोत्तर मिळालेला आदर


सन 2001 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर 17 वर्षांनी जेव्हा देशाला त्यांचा आदर वाटू लागला तेव्हा त्यांना मरणोत्तर अतिशय प्रसिद्ध असा अर्जुन पुरस्काराने सन्मानित केला. यासोबतच सन 2010 मध्ये त्यांच्या बद्दल आदरयुक्त भावना व्यक्त करण्यासाठी दिल्ली येथील इंदिरा गांधी कॉम्प्लेक्स मधील कुस्ती विभागाला त्यांचं नाव देण्यात आलं.

________________________

वाचा वेळेचे महत्व यावर विस्तारित निबंध :- Veleche Mahatva Essay In Marathi

वाचा गाय विस्तारित निबंध :- Cow Information In Marathi

________________________

Book and Upcomming movie on Khashaba Jadhav In Hindi


नॅशनल बुक ट्रस्ट चे लेखक संजय सुधाने यांनी त्यांच्यावर “ऑलिंपिक वीर के. डी. जाधव” हे पुस्तक लिहिलेले आहे. या सोबतच आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर आणि आत्ताचे चित्रपट दिग्दर्शक संग्राम सिंग हे खाशाबा जाधव यांच्या रंजीत जाधव या मुलाच्या स्मरणातील गोष्टीतून चित्रपट बनविण्याच्या तयारीत आहेत.

Khashaba Jadhav यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान In Hindi

1. १९८२ मध्ये दिल्ली येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत टॉर्च रनचा भाग बनवून त्यांचा गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र सरकारने १९९२-९३ मध्ये मरणोत्तर छत्रपती पुरस्कार दिला.
2. २००० मध्ये त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
3. २०१० च्या दिल्ली कॉमनवेल्थ गेम्ससाठी नव्याने बांधलेल्या कुस्ती स्थळाला त्यांच्या कामगिरीचा सन्मान म्हणून त्यांचे नाव देण्यात आले.
4. १५ जानेवारी २०२३ रोजी, गूगलने खाशाबा जाधव यांना त्यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त गूगल डूडलद्वारे सन्मानित केले.

खाशाबा जाधव यांचा जन्म कुठे झाला?

जन्म 15 जानेवारी 1926 रोजी सातारा जिल्ह्यातील गोळेश्र्वर या ठिकाणी झाला.

खाशाबा जाधव यांच्या आईचे नाव काय?

खाशाबा जाधव यांच्या आईचे नाव श्रीमती पुतलीबाई जाधव होते.

खाशाबा जाधव यांचे टोपण नाव काय?

खाशाबा जाधव यांना “पॉकेट डायनॅमो” या टोपण नावाने ओळखले जात होते.

भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारा खेळाडू कोण?

खाशाबा जाधव हे स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक खेळाडू होते, ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते.

3 thoughts on “खाशाबा जाधव The Great पोकेट डायनामो | Khashaba Jadhav Information In Marathi 2023”

  1. Pingback: राजमाता जिजाऊसाहेब यांची माहिती | Jijamata Information In Marathi 2023

  2. Pingback: महेंद्रसिंग धोनी एक आयकॉनिक कप्तान | Dhoni Information in Marathi 2023

  3. Pingback: वर्णभेद विरुद्ध लढा | Nelson Mandela Information In Marathi Free 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
28 − 14 =