Best Lal Bahadur Shastri Information In Marathi

लाल बहादूर शास्त्री यांवर संपूर्ण माहिती 2023 | Best Lal Bahadur Shastri Information In Marathi

“जय जवान, जय किसान” हा मंत्र देणारे Lal Bahadur Shastri Information In Marathi मध्ये देत आहोत. स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या काही पंतप्रधान पैकी ते एक होते.

Lal Bahadur Shastri Information In Marathi

Lal Bahadur Shastri हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्य सैनिक तसेच स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान व स्वतंत्र भारताचे तिसरे परराष्ट्र मंत्री होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोंबर 1904 मध्ये उत्तर प्रदेशातील वाराणशी वरून 7 km अंतरावर असलेल्या “मुघलसराई” या छोट्याशा गावात एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे मूळ आडनाव “श्रीवास्तव” होते. त्यांच्या वडिलांचे ते दिड वर्षाचे असतांनाच दुःखद निधन झाले. ते एका प्राथमिक शाळेत शिक्षक होते. त्यांची आई रामदुलारी यांनी त्यांना आपल्या सोबत आपल्या बाहेरी घेऊन आली आणि तिथेच त्याचं पालन पोषण केलं.

त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण मिर्झापूर येथे पूर्ण केले तर त्यांनी त्यांचे माध्यमिक शिक्षण वाराणशी येथे केले. तिथे त्यांना “निल्कामेश्वर प्रसाद” हे वडीलांसारखे गुरू मिळाले. त्यांनीच लाल बहादुर शास्त्री यांनी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय यांच्या सारख्या महान व्यक्तींच्या जीवन दर्शनाचे महत्व पटवून दिले. त्यांचे लग्न “ललिता शास्त्री” यांच्याशी झालं.

Lal Bahadur Shastri Information In Marathi

Lal Bahadur Shastri यांना त्यांच्या वयाच्या 11 व्या वर्षी “बनारस हिंदू विश्वविद्यालय” ची कोनशिला बसविण्यासाठी आलेले गांधीजी त्यांना दिसले. तिथे गांधीजींनी केलेल्या भाषणामुळे ते अगदी भारावून गेले होते. त्यामुळे त्यांनी नंतर गांधीजींची पाठ कधीच सोडली नाही. त्यांनी केलेले चंपारण्य सत्याग्रह, रौलट कायदा तसेच जालियनवाला बाग हत्याकांड इत्यादी अनेक घटनांना मिळालेला प्रतिसाद त्यांच्या मनात घर करून बसला होता. विदेशीवर बहिष्कार, स्वदेशीचा वापर यातच लालबहादूर गुंतले व त्यातून सुटताच पुन्हा विद्यापीठात दाखल झाले. काशी विद्यापीठाचे ‘शास्त्री’ झाले. यासोबतच ते ‘सर्व्हंटस ऑफ दि पीपल्स’ सोसायटीचे सदस्य देखील झाले. त्यांना शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात सुधारणा घडवून आणायचे होते.

1928 साली जेव्हा लाला लजपतराय यांचा निधन झाल्यानंतर टंडन सोसायटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम दास झाले. त्यांची अलाहाबाद ला निवड झाली त्यावेळी Lal Bahadur Shastri यांची भेट आचार्य नरेंद्र देव, आचार्य कृपलानी, डॉ. भगवानदास, डॉ. संपूर्णानंद, श्रीप्रकाश यांच्याशी झाली व समोर त्यांची त्यांच्यासोबत मैत्री देखील झाली.

Lal Bahadur Shastri Information In Marathi

Lal Bahadur Shastri’a Political career । लाल बहादूर शास्त्री यांचे राजकीय करियर

लाल बहादूर शास्त्री यांवर संपूर्ण माहिती 2023 | Best Lal Bahadur Shastri Information In Marathi

भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यांची संसदीय सदस्य म्हणून उत्तर प्रदेश राज्य मध्ये नियुक्ती झाली. स्वातंत्र्य नंतरचे उत्तर प्रदेश चे पहिले मुख्यमंत्री “गोविंद वल्लभ पंत” यांच्या नेतृत्वाखाली “लाल बहादुर शास्त्री” हे पोलीस व परिवहन मंत्री झाले. त्यांच्या नंतर ते उत्तर प्रदेश चे दुसरे मुख्यमंत्री झाले. इ. स. 1951 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांची काँग्रेस पक्षाचे सचिव पदी नियुक्ती केली. आणि नंतर इ. स. 1956 मध्ये त्यांना रेल्वेमंत्री पद देण्यात आले. परंतु रेल्वे चा अपघात झाल्यामुळे त्यांनी अपघाताची संपूर्ण नैतिक जबाबदारी आपल्यावर घेऊन रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा दिला. नंतर इ. स. 1957 च्या निवडणुका काँग्रेस ला त्यांनीच जिंकून दिल्या. 27 मे 1964 ला “पंडित जवाहरलाल नेहरू” यांचं दुःखद निधन झाल्यानंतर “लाल बहादूर शास्त्री” यांना स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान करण्यात आले.

__________________

वाचा शरद पवार यांचे जीवन चरित्र :- Sharad Pawar Essay in Marathi

वाचा धर्मवीर आनंद दिघे यांचे जीवन चरित्र :- Anand Dighe Biography in Marathi

__________________

पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन झाल्यामुळे पाकिस्तान ला ही खूप मोठी सुसंधी वाटली आणि त्यांनी भारतावर आक्रमण केलं. परंतु लाल बहादुर शास्त्री यांनी भारताला “जय जवान, जय किसान” हा घोषणा मंत्र देऊन पाकिस्तान ला नमविले. युनोने युद्धबंदी घातली आणि रशियाने त्यात मध्यस्थी केली होती. 10 जानेवारी 1966 च्या मध्यरात्री म्हणजेच 11 जानेवारी 1966 ला त्यांचा ताश्कंद येथे संशयित मृत्यू झाला. आणि त्यांच्या प्राणज्योत मालवली. त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांना “भारतरत्न पुरस्कार” त्यांचा गौरव करण्यात आला.

Lal Bahadur Shastri Information In Marathi

Lal Bahadur Shastri Death Mistry । लाल बहादूर शास्त्री यांची संशयित मृत्यू

लाल बहादूर शास्त्री यांचा 11 जानेवारी 1966 रोजी मृत्यू झाला तेव्हा त्यांचे शरीर पूर्णतः काळेनिळे पडले होते. त्यामुळे त्यांची पत्नी “ललिता शास्त्री” यांनी सातत्याने त्यांच्यावर विषप्रयोग करून त्यांची हत्या करण्यात आली आहे असे आरोप करत राहिली. त्यांच्या मृत्यू नंतर त्यांचे शरीर काळेनिळे पडले होते त्यामुळे अनेकांना या संशय होता की, त्यांच्यावर विषप्रयोग करून त्यांची हत्या केली असावी. विषप्रयोग केल्याच्या आरोपावरून त्यांच्या रशियन स्वयंपाक्याला अटक केली होती परंतु पुराच्याच्या अभावामुळे त्याची निर्दोष सुटका करण्यात आली.

इ. स. 2009 मध्ये “अरुण धर” यांनी माहिती हक्काच्या कायद्याच्या आधारावर पंतप्रधान कार्यालयाकडे लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यू चे कारण जाहीर करायची मागणी केली होती. मात्र ती पंतप्रधान कार्यालयाने आपले इतर देशांशी असलेले संबंध बिघडण्याची शक्यता, देशात हिंसाचार उफाळून येण्याची शक्यता आणि संसदेच्या विशेषाधिकाराचा भंग होऊ शकतो असे कारण देऊन ती विनारू फेटाळून लावली होती.

यासोबतच पंतप्रधान कार्यालयाने लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यू प्रकरणी एक दस्तावेज आहे असे नमूद केले मात्र त्याची उघड केली नाही. तसेच त्यावेळी रशियन सोव्हिएत ने लाल बहादुर शास्त्री यांचा पोस्टमॉर्टेम न करण्याचे मान्य केले होते परंतू त्यांचे Personal Doctor R. N. चुग आणि काही रशियन डॉक्टर मिळून त्यांच्या पार्थिव शरीराची तपासणी केली होती रे देखील दस्तावेज आमच्याकडे आहेत असे नमूद केले होते मात्र त्यांचीही उघड अजून केलेली नाही किव्वा करण्यास नकार देखील दिला होता. परंतू हे सगळे दस्तावेज आमच्याकडे अजूनही आहेत. ते नष्ट केलेले नाहीत किंवा ते गहाळ ही झालेले नाहीत असेही पंतप्रधान कार्यालयाने सांगितले.

Lal Bahadur Shastri Information In Marathi

Books On Lal Bahadur Shastri । लाल बहादूर शास्त्री याच्यावरील पुस्तके

 1. गोष्टीरूपी लालबाहादुर
  बालसाहित्य लेखक – शंकर कऱ्हाडे
 2. शांतीदूत लालबहाद्दूर शास्त्री
  लेखक – प्रभाकर नारायण तुंगार

लाल बहादूर शास्त्री यांच्या संस्था

 1. लालबहादूर शास्त्री झोपडपट्टी नं १, २, ३
  मुंबईतील वांद्रा स्टेशनच्या पश्चिमेला असलेली झोपडपट्टी
 2. लालबहादूर शास्त्री मार्ग
  एल.बी.एस.रोड -मुंबई
  (जुने नाव :- सायनपासून ते मुलुंडपर्यंत चा आग्रा रोड)
 3. लालबहादूर शास्त्री रोड
  एटी-फीट रोड, पुणे
  (जुने नाव :- नवी पेठ – अलका टाॅकीज ते स्वार गेटपर्यंतचा रस्ता.
 4. लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकॅडमी
  मसुरी,डेहराडून,उत्तराखंड.

लालबहादूर शास्त्री यांची कुठे निधन झाले?

लाल बहादूर शास्त्री यांचा 11 जानेवारी 1966 ला ताश्कंद, पाकिस्तान येथे संशयित मृत्यू झाला.

लाल बहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान केव्हा झाले?

27 मे 1964 ला “पंडित जवाहरलाल नेहरू” यांचं दुःखद निधन झाल्यानंतर “लाल बहादूर शास्त्री” यांना स्वतंत्र भारताचे पंतप्रधान करण्यात आले.

लाल बहादूर शास्त्री भारताचे कितवे पंतप्रधान होते?

स्वतंत्र भारताचे ते दुसरे पंतप्रधान होते.

लाल बहादूर शास्त्री यांच्या वडिलांचे नाव काय होते?

लाल बहादूर शास्त्री यांच्या वडिलांचे नाव मुन्शी प्रसाद श्रीवास्तव होते.

लाल बहादूर शास्त्री कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत?

लाल बहादूर शास्त्री हे “शांती दुत” म्हणून ओळखले जातात.

2 thoughts on “लाल बहादूर शास्त्री यांवर संपूर्ण माहिती 2023 | Best Lal Bahadur Shastri Information In Marathi”

 1. Pingback: जागतिक चॉकलेट दिन 2023 | Best Chocolate Information In Marathi

 2. Pingback: अण्णा भाऊ साठे संपूर्ण माहिती | Anna Bhau Sathe Information in Marathi 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
42 ⁄ 21 =