श्री. संजय शिवाजी देशमुख आणि केशवराव चेरकु यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Life kavita marathi lyrics विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
Life kavita marathi lyrics
काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका साप्ताहिक स्पर्धा
दिनांक – ०१/१०/२०२३
विषय – आयुष्य
आयुष्य | Life kavita marathi lyrics

साडेतीन अक्षरांचा आयुष्य हा शब्द
दिसावयास असे छोटा
जाणावया अर्थ तयाचा
खटाटोप करावा लागतसे मोठा!!
सहजच म्हणती जन सदा
सुंदर असे आयुष्य सारे
अनुभवता या जन्मी तयाला
सोसावे लागतसे बोचरे वारे!!
आयुष्याकडे सदा बघावं आनंदाने
मना सारखेच होईल सारे असा नेम नसे
घडायचे ते घडतचं राहणार
मन मात्र त्यातच गुरफटून बसे!!
आयुष्याचा चित्रपट असे सदा भारी
भरा रंग मनाला भावेल तसा
तरचं मनभरुनी आनंद पावेल जन्मी
पुढे सरकेल आयुष्याचा रथ जसजसा!!
पहा उभ्या आयुष्याकडे सदा आनंदानं
प्रवास तर थांबणारचं नाही
मना सारखेच घडेल सारं
असा जुळेल मेळ याचा नेमच नाही!!
भाग्यवानालाचं लाभतं दान आयुष्याचं
उठवा लाभ जनहो याच जन्मी आज
जान ठेवा या जन्मी साऱ्या जणाची
येईल साऱ्यांच्या ओठी तुमच्या नावाची गाज!!
कवी-
श्री. संजय शिवाजी देशमुख.पिपंरी पुणे.
Life kavita marathi lyrics
काव्यबंध समुह आयोजित काव्यलतिका साप्ताहिक स्पर्धा
रविवार दि.१/१०/२०२३
विषय — आयुष्य
शिर्षक — आयुष्य एक प्रवास
आयुष्य एक प्रवास | Life kavita marathi lyrics

माणसाचं आयुष्य म्हणजे काय ?
जन्म अन् मृत्यु या मधील प्रवास।
पण आपल्या कर्म, प्रारध्दानुसार
सगळ्यांचा असतो वेगळा ध्यास।।
आयुष्याच्या या प्रवासात देखील
सहप्रवासी असतात आपल्याला।
आई, बाबा, भाऊ, बहीण असती
अशीच काही नावे त्या नात्याला।।
कर्तव्य,जबाबदारीच्या फेऱ्यातून
कधीच सुटका नसते या प्रवासात।
संस्कारांचा धनुष्य कसे हे पेलणार
समाधानी गुण नसतोच माणसात।।
राग,लोभ,मोह,मत्सर या चौकटीत
उमलतात सर्व हेवे दाव्याचे पहाड।
दुर्दैवाने दुर्गणाची सभोवताली दाटी
आयुष्यभर येणार सत्कर्माच्या आड।।
सत्कर्म आणि दुष्कर्म यांचा हिशोब
चित्रगुप्तानी सगळा ठेवलेला असतो।
जन्म मृत्युच्या या फेऱ्यातून मुक्तता
आयुष्याच्या शेवटीच ठरवत असतो।।
केशवराव चेरकु
कोपरखैरणे, नवीमुंबई
मो. – ८२८६३६२४४३

Life kavita marathi lyrics
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह