Love kavita in marathi

माझ्या प्रेमाची कथा आणि सुखाचे चांदणे | 2 Best Love kavita in marathi

अर्चना कुलकर्णी आणि सौ रेखा पिंगळे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Love kavita in marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Love kavita in marathi

काव्यबंध समूह आयोजित
साप्ताहिक काव्यलतिका स्पर्धा
दिनांक ५/१२/२०२३
विषय: हृदयी वसंत फुलताना

माझ्या प्रेमाची कथा | Love kavita in marathi

माझ्या प्रेमाची कथा आणि सुखाचे चांदणे | 2 Best Love kavita in marathi

जेव्हा तारूण्यात प्रवेश झाला
तेव्हाच तो काॅलेजमधेही केला
रंगीबेरंगी स्वप्न उराशी बाळगून
हरखले अनोखे भवताल पाहून

अन त्या चैतन्यमयी वातावरणात
तो आला होता नजरेच्या टप्प्यात
त्याचे रूप रूबाब भरले की मनात
तोच असे जळात अन पाषाणात

त्याच्या भोवता मी बरीच नाचले
हाय त्याने ढुंकूनही नाही पाहिले
मग मी माझाच मेक ओव्हर केला
त्याला काहीच फरक नाही पडला

प्रेमरस धारेविना किती आसुसलेली
प्रेममनाची बाग तर पार कोमेजली
ना रंगज्ञ,सुगंध दरवळ प्रेमफुलांचा
नच पानांची हिरवळ शुष्क वृक्षाला

विरहाची वेदना, सहवासाची भूक
परीक्षेच्या उन्हात,प्रेमाची होरपळ
मलाच कळला नाही वेळेचाही वेग
जेव्हा हातात आले नियुक्तीचे पत्र

आता वेळ आली वर संशोधनाची
माझ्या विदीर्ण मनाला न कशाची
आस न स्वप्ने प्रेमळशा संसाराची
अबोल मी प्रथांच्या गेले सामोरी

माहीतही नव्हते नाव गाव वराचे
नजरेशी भिडले क्षण नजरभेटीचे
क्षणात बदलले रूप काष्ठवृक्षाचे
‘तो’ उधळीत होता रंग प्रेमरसांचे

मी चिंब भिजले रंगात प्रेमरसाच्या
शिशिर सरला बागेत संवेदनांच्या
एक एक कण आनंदला तरारला
हृदयी मम वसंत फुलला ,बहरला

वसंत फुलला बहरला
वसंत फुलला बहरला

अर्चना कुलकर्णी ठाणे

Love kavita in marathi

काव्यबंध समुह
काव्य लतिका आयोजित स्पर्धा दि.५/११/२०२३
स्पर्धेसाठी
विषय…हृदयी वसंत फुलताना

सुखाचे चांदणे | Love kavita in marathi

सुखाचे चांदणे | 2 Best Love kavita in marathi

आनंदाच्या फांदीवरती
सुख सोहळे अनुभवावे
सोनकण जीवनातले
जमेल तसे जपत जावे…१

हृदयी वसंत फुलताना
क्षण क्षण सुगंधित झाले
धुंदवित दशदिशांना
मनातल्या ओच्यात साठले…२

कोकीळेचा मंजुळ स्वर
आम्रवनात भरुन उरला
शुभ्र चांदवा नभातला
मनामनात उगाच हसला..३

नकळत भरले नभ आठवांचे
पाऊसधारा झणी बरसल्या
स्पष्ट जाहल्या पाऊलखुणा
ओल्या रेशमी मातीतल्या…४

जीवनाला गती देणारी
जीवनधारा विलक्षण सौख्याची
अधिक सुंदर वाटे मजला
नार सडसडीत बांध्याची…५

किंचित उबदार तरी झोंबरा
वारा हलकेच शीळ घाली
सृष्टि बहरली चैतन्याने
वसुंधरा हिरवा साज ल्याली…५

पक्ष्यांचा मंजुळ गुंजारव
साद प्रतिसाद जणू तयांचा
आज कोण का करेल सांगा
हिशेब आयुष्यात सुखदुःखाचा…६

गीत व्हावे जीवनाचे
अर्थ यावा जीवनाला
मिळेल मजला सुरेखसा
सूर सप्तसुरांच्या वाटेवरला…७

शिल्प घडावे सुंदरसे
यावा आकार जीवनाला
भेटेल का शिल्पकार असला
आकारण्या मम आयुष्याला…८

सौ.रेखा पिंगळे
लाखनी ( जि.भंडारा)

Best Love kavita in marathi

Love kavita in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह