love poem for her in marathi in 2024

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

love poem for her in marathi in 2024

काव्यबंध समुह आयोजित

काव्यलतिका रविवारीय काव्यस्पर्धा

दिनांक. १०/३/२०२४

ऑनलाईन प्रेम | love poem for her in marathi in 2024

डिजिटलच्या जगात
जूळते online प्रेम
मुलगी मुलगा दोघेही
करताथ वेगळीच गेम ….१

नाही पाहिलेला चेहरा
फोटोत दिसतोच सुंदर
हनडसम मुलगा पाहून
मन नसते तिचे भानावर ..२

गरीब आहे फार श्रीमंत
गप्पा गोष्टीतल्या रंगदार
जरी नसला त्याला आधार
म्हणे गाडी,बंगला टुमदार …३

बोलाची कडी बोलाचा भात
प्रेम दोघांचे एकमेकावर
समोरासमोर येताच दोघेही
अनाभाका घेतात मजेदार …४

वरवरचे बोलणे ते फुकाचे
मनातले प्रेम कधीच नसते
विश्वासाला तडा जातो दूर
असेच प्रेम फसवेच असते …५

थांबत नाहीत मग दोघेही
लग्नाच्या बेडीत अडकून
मग समजते खरे बोललेले
होते भांडण सुरु तडकून …६

कोर्टात जाते त्यांचे भांडण
जवळ असून मने जाती दूर
समाजातही नसते किंमत
लागून रहाते मग हूरहूर ….७

डिजिटल जमान्यात असा
दोघांचाही होतो आत्मघात
अर्धवट विचाराचा निर्णय
करतो जीवनावर आघात …८

संपून जाते अर्धे आयुष्य
नाही मिळत सुखसमाधान
आयुष्याच्या संध्याकाळी
जरी झाली त्यांना आठवण ९

जीवनाच्या वाटेवर चालताना
करावा विचार, नसावी घाई
करु नये कुणाची फसवेगिरी
घडणार नाही अशी नवलाई …१०

online च्या प्रेमाची व्यथा
कुणचा तरी जातो तो जीव
मारतो किंवा मरतो आपण
देह आपला राखा हो सजीव …११

जयद्रथ आखाडे
पुणे

love poem for her in marathi in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *