love poem in marathi text in 2024

ऑनलाईन प्रेम | Best love poem in marathi text in 2024

सौ. भारती राजेंद्र बागल यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem in marathi text in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

love poem in marathi text in 2024

काव्यबंद समूह आयोजित स्पर्धा विषय

ऑनलाईन प्रेम | love poem in marathi text in 2024

मिळणार आता
ऑनलाईन नवरा
वरबापाच्या पायातला
जाणार भोवरा

प्रत्येकाला इच्छे प्रमाणे
मिळणार प्रीत
भावबंध भावकी नेण्याची
मोडणार रीत

नाही होणार आता
जात धर्म माणसांच्या स्वभावाची पडताळणी
मन जुळणार आता
ऑनलाइनच्या मेसेजनी

नाही थाटावा लागणार आता
प्रेमासाठी संसार
नसणार आता एकमेकांवरती
बंधनांचा भार

नाही विचार जुळले की
लगेच ऑनलाईन नातं बदलायचं
कुठे बंधन त्याला
गाव भाऊ भाऊकीच

नाही आता रूढीपरंपरेची भीती
जुळु लागली ऑनलाइन नाती
जन्मदात्यांची ही गरज संपली
मोबाईल आला हाती

जो तो झाला मालक
स्वतःच्या मर्जीचा
निर्णय घेऊ लागला
स्वतःच्या आयुष्याचा

क्षणात जुळतात नाती
क्षणात तुटून जातात
ऑनलाइन घटस्फोट झाले तरी
जन्मदात्यांना माहीत नसतात

फक्त असतात नाव त्याला
ब्रेकप सारखी सुंदर
संपला संवादच कुटुंबातला
मन झाली खिंडर

जो तो निवडतो आता
स्व मरजीचा जोडीदार
प्रेमाची परीक्षा
नाही अवघड उरली फार

किती भेटत असतील असे
ऑनलाइन फसवणारे
थकतील ना हात मग
पुन्हा पुन्हा सावरणारे

किती भेटत असतील फसवे
ऑनलाईन पुरावे
मोठ्यांच्या चौकशीने मर्जीने
अखंड टिकणारे प्रेम करावे

ऑनलाइन प्रेम म्हणजे
अवकाळी पाऊस
आला तर आला
नाही तर फिटते हाऊस

जन्मदात्यांच्या थोरामोठ्यांच्या मर्जीनेच
या वनव्यात पडलेले बरे
कारण प्रत्येकालाच वाटतात
दुरून डोंगर साजरे

एकदा गेला
मनाला व इज्जतीला तडा
की कोसळून पडतो
आयुष्याचा कडा

कोणताही निर्णय घेऊ नये
गोड गप्पांवर भाळून
स्वभाव संस्काराची खात्री
करावीच जवळून

प्रेमाचा खेळ हा
असतो मनाशी
विनाकारण खेळू नये
स्वतःच्या आयुष्याशी

घडलेच काही विपरीत तर
कोण येईल मदतीला
म्हणूनच भाऊबंद गाव
असावे सोबतीला

सौ भारती राजेंद्र बागल
वडूज सातारा

love poem in marathi text in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *