love poem on rain in marathi in 2024

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

love poem on rain in marathi in 2024

स्पर्धेसाठी स्वरचित रचना
काव्यबंध समूह आयोजित काव्यलतिका रविवारीय काव्य स्पर्धा.
दि.10/3/2024
विषय-ऑनलाइन प्रेम.

आभासी प्रेम | love poem on rain in marathi in 2024

जुन्या काळात होत असे
प्रेम पहिल्या भेटीला
ऑनलाईन प्रेमाचा जमाना
आला आता तरुणाईच्या मदतीला..1

कितीतरी वर्षांनी संमेलन निमित्ताने,
शाळेतील जुने मित्र मैत्रिणी एकत्र येई
मग मित्र मैत्रिणीच्या व्हाट्स अप
क्रमांकाची देवाण घेवाण होई..2

नाहीतर जुन्या कंपनीतील,
मैत्रिणीची भेट ऑनलाईन होई..
तीचे सुख दुःख पुसताना वैवाहिक
जीवनातील दुःख समोर येई..3

गुड मॉर्निंगने हसतमुख,
मैत्रीची सुरुवात होते..
मजल दरमजल करत ती
गुड नाइट पर्यंत पोहचते…4

हळू हळू ती नवऱ्याबद्द्लच्या
तक्रारी सांगे मित्र म्हणून..
तो ही तिच्या दुःखावर घाले
फुंकर आपल्या मैत्रीला जागून…5

तो तिच्यावर कविता करू
लागला आपली प्रेयसी समजून..
मूकसंमती तीचीही होती या गोष्टीस
सच्चेपणा त्याच्यातला जाणून..6

मैत्रीच्या पलीकडे कधी गेले
त्यांचे त्यांना येईना कळून
समजूतदारपणे दोघेही थांबतात
मैत्रीची सीमारेषा जाणून…7

तिला ही लक्षात आली चूक
आपला संसार अन मुले आठवून..
त्यानेही तिला जबरदस्ती केली नाही
नात्याची तीची अडचण ओळखून..8

हळूहळू तीची उत्तरे तुटक
तुटक येण्यास सुरु झाली
ती त्याच्या सोबत बोलणे
प्रतिक्रिया देणे टाळू लागली..9

कदाचित तीने मजबुरीने
ठेवले त्याला ब्लॉक करून
बिचारा वाट पाहत राहिला
येईल माघारी विचार मनी येऊन..10

आभासी प्रेम वास्तवात,
न भेटताच त्यांना झाले..
अन एकमेकांना न समोरसमोर
भेटता परस्पर समजून घेऊन तुटले..11

ऑनलाईन प्रेमाच्या खेळातील
होते ते राजा आणिक राणी..
अर्ध्यावरती डाव त्यांचा मोडला
अधुरी राहिली आभासी प्रेमाची गाणी..12

✍🏼 श्री विजय तानाजी पाटील (तासगाव ) ✍🏼

love poem on rain in marathi in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *