Love Shayari Marathi | Marathi Short Poems | मराठी लव्ह शायरी | प्रेमाच्या चारोळ्या
तुझ्या घट्ट मिठीत मजला, वाटतं जगाला विसरून जावं
अन् अशा जगात हरवून जावं, ज्यात फक्त तू आणि मी असावं

Love Shayari Marathi तुझ हसण
तुला हसतांना बघितलं
की माझं दुःख नाहीसे होतात
पण रडतांना बघितलं
की मला मात्र अनंत दुःख होतात
तू सदा हसत राहावी
म्हणून मी आटोकाट प्रयत्न करीत असतो
परिपक्व असलो जरी मी
पण जोकर व्हायचा प्रयत्न करीत असतो
तुझ्या हसण्याची फक्त किंमत सांग
मी माझं सर्वस्व अर्पण करायला तयार आहे
प्रेम म्हणजे करार आहे असं म्हणतो मी
आणि हा माझा तुझ्या प्रेमासाठी केलेला करार आहे
कधी रडवलं, तर कधी हसवलं
या प्रेमानं मला, जगणं शिकवलं…..
Love Shayari Marathi | Marathi Short Poems | मराठी लव्ह शायरी | प्रेमाच्या चारोळ्या
मराठी लव्ह शायरी प्रिये
तु फक्त हो म्हण गं प्रिये
चंद्र तारे सोड सूर्य सुद्धा तोडून आणतो
तुला आपलं करण्यासाठी
मी संपुर्ण जगाशी भांडू शकतो
तुझ्या शरीरावर नाही गं
मी तुझ्या मनावर प्रेम करतो
मिठी मारून तुला मी गं
माझ्या ह्रुदयात सामावून घेतो…
प्रहरी गाणाऱ्या कोकिळेचा ही
जणू विसर पडे मजला
तु गातेस एवढं सुंदर की
दुसरं गाणं ही न कळे मजला

Love Shayari Marathi | Marathi Short Poems | मराठी लव्ह शायरी | प्रेमाच्या चारोळ्या
तुझ्या सुमधुर ओठांमधूनी
निघणाऱ्या प्रत्येक शब्दा-शब्दांना
अलंकारिक आभूषणांनी सजवून
आकर्षित करते तू मनातील स्पंदनांना
मराठी लव्ह शायरी मैत्रीतून प्रेम
मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं
हे मला कधी कळलंच नाही
अन् प्रेमाचं खरा अर्थ माझ्या हृदयाला
कधी वळलंच नाही….
प्रेमाचं अर्थ माहिती न्हवतं मला
तु आलिंगन घातलं मला
अन् तुला मिठीत घेऊन मजला
प्रेमाचं अर्थ कळलं मला
तुझ्या होकाराची वाट आहे मजला
जन्मोजन्मी ची साथ हवी
आणि आयुष्यभर हाथ सोडू नको
हीच तुझी सौगात हवी
मराठी शायरी Love Shayari Marathi आठवण
तुझी आठवण मजला
सांगून येत नाही
प्रेमाचा अर्थ ही सांगून
समजला जात नाही
प्रेम समजून घ्यायचं आहे
तर प्रेम करावं लागतं
वाट्याला आलेल्या
वेदनाही सहन करावं लागतं
गुलाबासमवेत काट्यांनाही
सांभाळून घ्यावं लागतं
तेव्हाच प्रेमाचा अर्थ उमगतं…
तेव्हाच प्रेमाचा अर्थ उमगतं….
मराठी शायरी Love Shayari Marathi प्रेमातल आकर्षण
प्रेम आणि आकर्षण
यातला फरक कळत नाही
अन् म्हणून मुलांचं
हल्ली प्रेम दिसत नाही
खऱ्या प्रेमाला आता
वासनेची जोड मिळाली
अन् प्रेम नावाच्या फुलला
उतरती कळा लागली….
आकर्षण म्हणजे प्रेम नाही
तो फक्त प्रेमाचा भाग आहे….
हे कळत नाही हल्ली
म्हणून प्रेमाला लागला डाग आहे….
प्रेम आजही पवित्र आहे
फक्त प्रेम आणि आकर्षणातलं
फरक जाणवलं पाहिजे
प्रेमामधल्या वासनेला
आधी मिटवलं पाहिजे…..
Love Shayari Marathi | Marathi Short Poems | मराठी लव्ह शायरी | प्रेमाच्या चारोळ्या
कवी आशु छाया प्रमोद (रावण)

बाप कविता | माझा बाप | Baap Kavita Marathi