जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल आणि व्यक्त होऊ शकत नसाल तर Love You Miss You Shayari In Marathi घेऊन आलो आहोत. ज्यामुळे जोडीदाराला भावना पटकन समजतील.
Love You Miss You Shayari In Marathi

_________________________
आठवणीच्या वादळात एक क्षण माझा असू दे ना,
फुलाच्या एका गुच्छात एक फुल माझं असू दे
तू कितीही दूर असली ना तरी तुझी साथ असू दे
तुझ्या हृदयाच्या कोपऱ्यात माझं नाव असू दे.
_________________________
तुझ्यावर इतकं कधी प्रेम झालं मला कळलं नाही
याआधी एवढं मी कधी बडबडलोच नाही ,
आता बस तुझ्या प्रेमाची साथ पाहिजे
तुझा माझ्या हातात हात पाहिजे.
Love You Miss You Shayari In Marathi
_________________________
आज या डोळ्यांनी माझ्या मला रडावेसे वाटते,
तुझ्या आठवणी थोडं रमावस वाटतं,
इतकं प्रेम केलंस तू माझ्यावर
बस मला तुझ्याकडे पहावसं वाटतं.
_________________________
कुणीतरी आपल्यासाठी कुठेतरी झुरत असतं
भिंतीच्या कोपऱ्यात जाऊन डोळ्यातून,
पाणी त्याच्या ही पडत असतं.
मोल त्याचा त्या क्षणाचा त्याला ही दिला पाहिजे,
त्याने केलेल्या प्रेमाचा मोल समजला पाहिजे.
_________________________
मनाने खरी असलेली माणसे ,
कधीच सुंदर मुलीवर प्रेम करत नाही.
तर त्या मुलीच्या आयुष्याला ते नेहमी सुंदर
बनवण्याचा प्रयत्न करतात.
Love You Miss You Shayari In Marathi

_________________________
एखाद्यासाठी हसता हसता हक्कान रूसता आलं पाहिजे डोळ्यात असलेलं त्याचं पाणीही पुसता आलं पाहिजे,
मान सन्मान हे काही नसतं हो,
बस त्याच्या हृदयामध्ये जागा बनवता आली पाहिजे.
_________________________
विसरून जा ना तिला , जिला तुझ्या प्रेमाची किंमत नाही
हा तुला आठवण येते तिची ही
पण बोलण्याची तुझी हिम्मत नाही,
का मरतो तिच्यावर जी तुला समजू शकत नाही,
डोळ्यातलं तुझं ते पडतं पाणी पुसू शकत नाही.
_________________________
आठवशील मला तर एक आठवण बनवून येईल
तुझ्या ओठांवर एक गाणं बनून येईल,
डोळ्यातल्या अश्रूंचा चा मोल बनुन येईल,
आणि मी फक्त तुझीच आहे सांगून जाईल.
Love You Miss You Shayari In Marathi
_________________________
प्रेम केल्यावर कळते की प्रेम काय असतं,
तिच्या आठवणी मध्ये रमून जाणं काय असतं,
तिच्यासोबत तासंतास बोलणे काय असतं
आणि ती दूर गेल्यावर रडणं काय असतं.
_________________________
तुझ्या माझ्या प्रेमात राग नसावा
बस तुझ्या प्रेमाचा एक भाव असावा,
थोडसं असाव भांडण पण नेहमी संवाद असावा,
माझ्या प्रत्येक हृदयाच्या कोपऱ्यात फक्त तू दिसावा.
_________________________
कविता चुकली तर पेज फाडता येतो
पण प्रेम चुकलं तर आयुष्याचे तुकडे तुकडे
व्हायला वेळ लागत नाही.
_________________________

जिथे गोड आठवणी आहेत तिथे हळुवार भावना आहेत
आणि जिथे हळुवार भावना आहेत,
तिथे अतूट प्रेम आहे,
आणि जिथे अतूट प्रेम आहे
तिथे फक्त आणि फक्त तुझा माझ्या
वरचा अतूट विश्वास आहे.
_________________________
कुणीतरी आपल्यावर प्रेम करावे
हा आपला वेडेपणा आहे.
एकमेकांना प्रेम करणारे एकमेकांना
मिळणे आणि सोबत असणे ,
म्हणजे त्यांचं नशीब
_________________________
ज्या व्यक्तीला आपण आपला जीव ओतून प्रेम करतो
ती व्यक्ती कधीच आपली नसते ,
जी व्यक्ती आपल्याला नकोशी असते,
ती व्यक्ती आपल्यावर खूप प्रेम करत असते.
Love You Miss You Shayari In Marathi
_____________________________________________
वाचा Quotes On Life In Marathi
वाचा Romantic Marathi Prem Kavita
_________________________
माझ्यात काही विशेष नाही.
पण मी एक आठवण होऊन जाईल
तू मला जेव्हा आठवशील ना तेव्हा ,
तुझ हृदय भरून येईल.
_________________________
प्रेम त्याच्यावर करावे ज्याला
आपण आवडतो ,
नाहीतर उगाच हे सुंदर आयुष्य
आपल्या आवडी साठी घालवतो.
_________________________
प्रेम नेमकं काय असतं हे मला बघायचं आहे.
तुझ्या हातात हात घालून मला एकदा फिरायचं आहे
तुझी सोबती मला आयुष्यभर व्हायचं आहे ,
बस तू माझ्यावर इतक प्रेम करते ,
हे सारे जगाला सांगायचं आहे.
_________________________
तुझं जागा वेगळी आहेस,
म्हणून मला तू आवडते पण
त्यापेक्षाही जास्त तू माझ्या आयुष्यात आहे,
याचा मला अभिमान वाटतो.
_________________________
तू असताना सजवलेले ते स्वप्नांचे घर मी कधीच मोडणार नाही,
तू आज मला सोडून गेलीस याचं दुःखही मी करणार नाही,
तुझ्या त्या गोड आठवणी मला तू देऊन गेलीस,
त्याला बस जपून ठेवणार आहे ,
पण तू माझा हात सोडून
गेली म्हणून मी ,
रडणार नाही.
_________________________
खूप कठीण असतं त्याच्यावर प्रेम केलं त्याला विसरण
पण तू तर माझ्या हृदयामध्ये एक आठवण ,
म्हणून आहेस तुझी ती प्रत्येक गोष्ट,
आठवून माझ्या डोळ्यांमध्ये,
पाणी येतं पण तुझ्या
गोष्टी आठवताना ,
हसू ही उमटतं!
Love You Miss You Shayari In Marathi
_________________________
Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

आमचे इतर साहित्य वाचा