Maharathi Karn Marathi Kavita in 2024

मी वचनाचा अधीन होतो | Best Maharathi Karn Marathi Kavita in 2024

सौ. मोहिनी संजय डंगर यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Maharathi Karn Marathi Kavita in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Maharathi Karn Marathi Kavita in 2024

काव्यबंध समूह आयोजित काव्यलतिका रविवारीय काव्य स्पर्धेसाठी
दि.३मार्च२०२४ रविवार
विषय- महारथी कर्ण

मी वचनाचा अधीन होतो | Maharathi Karn Marathi Kavita in 2024

नसेल मी पांडवांपैकी एक
पण कुंतीच माझी आई होती
सुर्यवंशी असलो तरी
सूतपुत्र म्हणून ख्याति होती

राधामाइचा वसु
कुंतीमातेने दूर केले
एक जन्मदात्री एक कर्मदात्री
गंगामाईचे प्रेम लाभले

क्षत्रिय म्हणून अमान्य मी
पण सर्वगुणसंपन्न होतो
सूर्यासारखा तेजस्वी तरी
नशिबाने अभागी होतो

नाकारले द्रोणाचार्यांनी
तरी सर्व विद्या पारंगत झालो
खचलो कितीदा शब्दांच्या वारांनी
जरी अभेद्य म्हणून जन्मा आलो

अर्जुनाचा द्वेष मनी
युधिष्ठिरासाठी कोडे होतो
भीमाची ताकद कमी माझ्यापुढे
असा मी बलशाली होतो

दबला गेलो राजकारणात
ओळख माझी पुसली
म्हणूनच कदाचित पांडवांच्या विनाशाची
इच्छा मनी ठसली

कौरवांचा मित्र असलो
तरी अन्यायाविरुद्ध होतो
सारथी पुत्र नावाला
मी पराक्रम सिद्ध होतो

पण…पण कृष्ण त्यांचा सारथी
सर्वज्ञानी भारी
भूत,भविष्य,वर्तमानाची
त्याचाच हाती दोरी

खेळ असा खेळला त्याने
ज्ञान अर्जुना दिले
रणांगणात सर्वांच्या
कर्माचे पाढे वाचले

दानशूर असलो तरी
ज्ञानार्जनाची शिक्षा मज भोवली
एका गायीच्या शापाने
माझ्या पुण्याची पाटी पुसली

वचन देऊन कुंती मातेला
झाली माझीच चूक
सहन केला अन्याय
राहून सदैव मूक

काय असावा गुन्हा माझा
का असा दुर्लक्षित राहिलो
हक्क,अधिकारापासून वंचित
महारथी मी कर्ण जाहलो

इतिहास आहे साक्ष
मी योद्धा अप्रतिम होतो
एकच कमतरता माझ्यात
मी वचनाचा अधीन होतो
मी……मी वचनाचा अधीन होतो !!!!!

सौ.मोहिनी संजय डंगर
रायगड

Maharathi Karn Marathi Kavita in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *