काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी श्री.केशवराव चेरकु यांची -ओढ- हि कविता -Maitri Badal Kavita- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
ओढ | Maitri Badal Kavita

लागली होती ओढ भेटायचे मला
माझ्या शाळेतील सर्वच मित्रांना
गप्पा, गोष्टी, मजाक अन् मस्ती
उधाण येईल मग त्या आठवणींना…||१||
फेसबुक, ट्विटर यातून शोधून
मित्रांचा व्हाट्सअप ग्रुप बनला
भेटलेत तेवढे मग एकत्र जुळवून
सर्वाना शोधण्याचा प्लाॅन ठरला.. ||२||
तो कुठे असतो तो काय करतो
ती काय करते हे प्रश्न हाताळत
व्हाट्सअप वर निरोप पाठविला
मैत्रीदिनी भेटू शाळेच्या आवारात..||३||
आज प्राथमिक शाळेत मी शिरलो
ऐकुणी शाळेची घंटा जरा थबकलो
या कुंदेन्दूं तूषारहार प्रार्थना ऐकुणी
आपसुक मी मग मैदानाकडे वळलो…||४||
संपता तीच जुनी सरस्वती वंदना
नकळतच मी ही वर्गाकडे वळलो
विद्यार्थी सर्व वर्गात बसलेले बघून
विश्वास बसेना इथे ? मी शिकलो..||५||
गणिताचा तास इथेच सर घ्यायचे
वर्गात शिकवत आहेत मज भासले
वळूणी मागे काय प्रश्न विचारणार
शेवटचे चिंताग्रस्त चेहरे आठवले..||६||
अभ्यास,खेळ,मजा आणि मस्ती
इथेच संस्काराचे धडे मी शिकलो
कधी कट्टी, तर कधी पट्टी करतच
मित्रांसमवे खेळलो अन् बागळलो..||७||
पन्नास वर्षापूर्वीचा तो शाळेतला
भाऊक निरोप समारंभ आठवतो
शिक्षक,मुख्याध्यापकाची भाषणे
मित्रांचे ते भाऊक चेहरे आठवतो..||८||
आज शाळेच्याच मैदानावर जमलो
नित्य टर् उडवणारा मित्र शांत होता
सरांची ओळख तो करुन देत होता
कारण तो आज गावचा सरपंच होता..||९||
कौलारु शाळेची आता पक्की इमारत
शाळेची जरी प्रगती झाली होती
संस्कार व नियम मात्र टिकून होते
आनंद देणारी महत्त्वाची बाब होती..||१०||
गप्पा गोष्टी आठवणीना उजाळा
सर्व जण भुतकाळात रमले होते
कोणाच छपर उडालेली होती तर
काहींचे पोट आकार सोडत होते..||११||
काहींचे पांढरे विरळ झालेले केस
काहीचे जाडे भिंगाचे चश्मे होते
काही जण इतके बदलेले होते की
नावाशिवाय ओळखता आले नसते. ||१२||
शाळेचे सर आणि काही प्रियमित्र
जे आपल्याच बरोबर शाळेत होते
त्यांच्याही आठवणीने मन गहीवरुन
सर्वेजण त्यास श्रद्धांजली वाहत होते..||१३||
प्रत्येकाच्या चौकश्या करताना मग
कसा वेळ निघून गेला कळलेच नाही
आजची भेट ही अशीच चालत राहो
वाटत होते पण तसे होणे शक्य नाही..||१४||
भविष्यात कधी भेटू माहीत नाही
सर्वच दूर गावात स्थिरावलेले होते
परत अशीच भेट पुन्हा लवकर घडो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना करत होते..||१५||
निरोपाचा क्षण जेव्हा समीप आला
वयोवृद्ध सर्वांचे डोळे पाणावले होते
एकमेकांना मिठ्या हस्तांदोलन करत
मैत्री दिन मोबाईलमध्ये कैद करत होते..||१६||
केशवराव चेरकु

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
फारच सुंदर. आशयगर्भ आणि मनाला खेचून घेणारी कविता. कवी केशवराव चेरकु यांचा अनुभव बघता ते वाचकांच्या मनाला फार खोलवर स्पर्श करतील अशा कवितांचे सृजन करतात. फार म्हणजे अत सुंदर अन् प्रभावशाली. : नितीन गोविंदराव बहुळकर,अकोला.
नितीन मित्रा
तू माझ्या सर्व कविता वाचतो तशीच ही पण कविता फार काळजीपूर्वक वाचलेली तूझ्या अभिप्राया वरुन दिसतेय. त्याबद्दल तूझे मनःपुर्वक धन्यवाद
केशवराव चेरकु
It’s so beautiful poem ,it is heart touch poem on childhood friendship.It’s each words recall all memories in childhood to all elders .
I wish your poetry will select in competition.👌👌👍👍
बहोत सुंदर पंक्तिया दिल को छु लेनेवाली, आपको बहोत बहोत बधाई
केशव, कविता मस्त झालीय 👌👌
स्मिता नमस्कार
माझ्या कवितेबद्दलच्या छान अभिप्राया बद्दल खुप खुप धन्यवाद
केशवराव चेरकु
फारच सुंदर, कविता वाचताना जिवंतपणा जाणवला. बालपणात पुन्हा पदार्पण झाल्याचे भास झाले. न.प.प्रार्थ. मराठी शाळा नं १ ची आठवण झाली. जुने मित्र, त्यांच्या लकबी, त्यांचे एकमेका प्रती असलेला जिव्हाळा …… सर्व काही नजरेसमोर असल्याचा भास झाला.
तुमचे – आमचे मित्र जरी भिन्न असले तरी प्रत्येक मित्र सख्या भावांपेक्षा श्रेष्ठ असतो, याची प्रचिती संकट समयी मित्रांनी आणून दिल्याने भाऊक झाल्याचे जाणवले.
Keep it up. हॅट्स अप.
*राममोहन ब्रदिया* ह.मु. ब्रम्हपुरी.
श्री राममोहन ब्रदियाजी
आपण माझी कविता सविस्तर मनलाऊन वाचून जो अभिप्राय दिला तो मनाला भावणारा आहे. सुंदर अभिप्राया बद्दल आपले खुप खुप धन्यवाद
केशवराव चेरकु
केशव..बऱ्याच दिवसानंतर एक छान कविता वाचायला मिळाली.
बालपणीच्या शाळेच्या आठवणी यामुळे ताज्या झाल्या. तुझी कविता खूप करमनुक पूर्ण वाचनीय झाली. मित्रा असाच लिहित रहा. हार्दिक अभिनंदन..शुभेच्छा.
विकास मित्रा
माझी कविता वाचून तूला तूझ्या बालपणी ची आठवण आली, करमणूक झाली आणखी कवीला काय पाहिजे असते.
सुंदर अभिप्राया बद्दल धन्यवाद
केशवराव चेरकु
केशव, कविता खुपच अप्रतिम, बारिकसारीक गोष्टी, बारकावे, कवितेत जाणवतो, flash back चा चांगला वापर केलास, विशेष म्हणजे social media चा उल्लेख चपखल बसला, पुर्वीचे बाल मित्र आणि त्यांची आताची स्थिती खुपच छान वर्णन केलेस, आशयपुर्ण कविता, केशव, बढीया
सुधीर भारतीय
मित्रा माझ्या कवितेबद्दलच्याचा तूझा अभिप्राय वाचून मन भरून आले. अशा सुंदर अभिप्राया बद्दल खुप खुप धन्यवाद.
केशवराव चेरकु
अन्ना कविता दिलको छु गयी
प्रिय राजेन्द्र
आपका अभिप्राय मी हमारे दिल को छू गया. आपके इस खुप सुरत अभिप्राय के लिए बहूत बहूत धन्यवाद
केशवराव चेरकु
सुंदर कविता दादा
– अभिष बहुळकर दर्यापूर
वर्ग, बाकडे तिथेच असतात आपल्याला शाळा सोडुन जावे लागते. उत्तम रचना, मन गहिवरले. Go ahead cherku saheb 🙏
𝓜𝓻 𝓢 .𝓡. 𝓢𝓪𝓴𝓪𝓹𝓪𝓵
𝓣𝓱𝓪𝓷𝓴𝓼 𝓯𝓸𝓻 𝔂𝓸𝓾𝓻 𝓫𝓾𝓲𝓽𝓲𝓯𝓾𝓵 𝓬𝓸𝓶𝓶𝓮𝓷𝓽
𝓚𝓮𝓼𝓱𝓪𝓿𝓻𝓪𝓸 𝓒𝓱𝓮𝓻𝓴𝓾
केशव खुप छान कविता मला तुझ्यात कवीत्व आलेलं दिसते
आशिष
माझ्या ओढ या कवितेसाठी आपण लिहलेल्या सुंदर अभिप्राया बद्दल आपल खुप खुप धन्यवाद!
केशवराव चेरकु
कविता फार सुंदर आहे.
छान वर्णन केले आहे.
तुम्हाला शुभेच्छा
ओढ़ च्या मध्यमा तुन केशवराव तुम्ही जे भावना ना शब्द दिले ते एक एक शब्द त्या प्रसंगला जिवंत करतो ,जर खर्च जुन्या मित्रांना भेटायची इच्छा आहे तर कसे शक्य आहे ते तुम्ही दाखवून दिले आहे ,सोशल मीडिया च्या माध्यमातून शोध घेऊन शाळा ते प्रसंग ही मंढतान एक एक शब्दतात रस आहे.
कवितेच्या सेवट पर्यंत ओढ़ कायम ठेवली आहे,ओढ़ ही नुसती कविता नसून तुमच्या मित्रांच्या प्रति तुमचे मैत्री भाव समर्पित आहे.
राजेश शेंद्रे
नमस्कार
आपण माझ्या कवितेच वर्णन खुप सुंदर शब्केदात केले, प्रसंगातील मैत्री भावनांच समर्पण बघितला. आणखी यापेक्षा सुंदर अभिप्राय होऊच शकत नाही. आपल्या सुंदर अभिप्राया बद्दल धन्यवाद
केशवराव चेरकु
ओढ” मैत्रीच्या काव्य पंक्तीची
सुमने ही गुंफली शब्द ऐकुणी
सरस्वतीची मतीच ही गुंगली,
स्पर्धा असता काव्यही फुलली,
गणरायाने या कवितेला पोचपावती दिली
केशव कवी मित्रा तुला स्पर्धेत सुयश मिळो ही सदिच्छा….
शेखर कुलकर्णी
Shekhardinkar@gmail.com
🙏 बहूत सुन्दर ……… कविता 🙏
खूप सुंदर लिहिली आहे कविता केशव. बालपणीच्या विश्वात फिरून आल्यासारखे वाटते.
प्रिय संजय मित्रा
तुझ्या अभिप्राया वरुन कळते की कविता वाचून तू बाल विश्वात जाऊन आलाय.
अशा सुंदर अभिप्राया बद्दल तुझे धन्यवाद
केशवराव चेरकु
खूपच सुंदर कविति आहे. मनापासून आवडली.शाळेतील आठवणी ताज्या झाल्या. चार वर्षांपूर्वी आमच्या शाळेच्या वर्ग मित्र मैत्रीणींची भेट झाल्यावर आम्ही सगळे असेच व्यक्त झालो होतो. तो एक छान सोहळाच होता.तुमच्या कवितेमुळे पुनः तो सोहळा अनुभवता आला. धन्यवाद.
मनिषा वहिनी नमस्कार
आपल्या सुंदर अशा अभिप्राया बद्दल धन्यवाद
केशवराव चेरकु
खूपच सुंदर कविता
Khup ch chhan kavita, hubehub varnan kelay… Vastvik jivnatil katu satya
निखिल
आपल्या सुंदर अशा अभिप्राया बद्दल
खुप खुप धन्यवाद
केशवराव चेरकु
केशवा,
कविता खुपच अप्रतिम कविता लिहिलीस
तुझी कविता वाचतांना बालपणीचे दिवस आठवले व मन गहिवरुन आले.
मायाताई खरे
श्री शेखर कुलकर्णी साहेब
आपल्या काव्यात्मक सुंदर अभिप्राया बद्दल
खुप खुप धन्यवाद
केशवराव चेरकु
जीवनाच्या संद्याकाळी एक आंतरीक ओढ़ आपल्याला खूपदां लहानपणीच्या सांठवणीचा ऊजाळा करायला लावते — त्यावेळचे आपण, आपली शाळा , आपले गुरुजन,आपले जिवलग मित्र -आणि बरंच कांही !
श्री. केशवराव ह्यांनी त्यांच्या कवितेत हे सगळं साध्या- सरळ शब्दांत व्यक्त केलंय.त्याबद्दल त्यांचे
अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा . 🙏🏿🌹
शरद गुप्ते
पी. एचडी – भाषा शास्त्र
Very nicely written poem, childhood friends or school friends meeting with them always loving subject. Good luck
Chhaya cherku
ओढ ही श्री केशवराव चेरकु यांची अतिशय सुंदर कविता. प्रत्येकाच्या मनात असलेली आपल्या शाळेबद्दलची आपुलकी छान व्यक्त केलीय. शाळेच्या आठवणींमधून मनाचा आनंदोत्सव साजरा झालाय कवितेत..
अनघ सुनिल गडकरी
विल्सन काॅलेज ,रिटायर्ड शिक्षीका
Very nicely put down the beautiful phase of friendship! Very well written Keshav Kaka!
प्रसन्ना शिंदीकर
माझ्या “ओढ ” कवितेबद्दल दिलेल्या छानशा अभिप्राया बद्दल खुप खुप धन्यवाद😘💕
केशवराव चेरकु
वा केशवराव, तुम्हाला हीपण कला अवगत आहे तर.
खूपच सुंदर कविता. कविता मनाला चटका लावून गेली. तुमच्या भावना खूपच सुंदरपणे कवितेत ऊतरल्या आहेत. अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या. शाळेतील जुने दिवस आठवले. तसेच दहा वर्षापुर्वीचे आमचे गेट-टूगेदर पण आठवले.असेच लिहीत रहा.
धन्यवाद……..
वा केशवराव, आपल्याला हीपण कला अवगत आहे की, खूप छान. कविता एकदम मस्त. शालेय जीवनातील खूप साऱ्या जून्या आठवणी जाग्या झाल्या.शेवटच्या बेंचची आठवण तर एकदम मस्त.
कविता एकदम उस्फुर्तपणे लिहीली आहे.मनातील सर्व भावना शब्दात ऊतरल्या आहेत. असेच लिहीत रहा.
केशवराव चेरकु
आपण लिहलेली कविता ” ओढ ” फारच छान होती. मला माझ्या बालपणीच्या मित्रांची आठवण आली. आपली कवितेला या स्पर्धेत यश मिळो.
हीच सदिच्छा 👍🙏👏
मनीलाल सोलंकी
केशवराव
आपण लिहिलेली कविता खूप छान आहे, जुन्या आठवणी जाग्या झाल्यात. कविता एकदम उत्सुकता वाढवणारी आहे
मनोज बुतीया
केशवराव
मी पहिल्या पासुन तुझ्या कवितेचा फॅन आहे, ही कविता पण मला खूप आवडली. अगदी शाळेचे दिवस आठवले. मित्रा असाच छान छान कविता लिहीत जा.
कविता प्रवासाला शुभेच्छा
हरीश धमगाये
Keshavrao Cherku
Very nicely written, taking us back to school time memories. Good luck
Bipin Palimar
Keshavrao
Very nicely written poem ” odh ” , took me to my school days life.
Good luck!
Ninad
कवी केशवराव चेरकू
आपली ओढ ही कविता वाचली आणी मनाला खूप भावली. सुरवातीपासून शेवटपर्यंत उत्कृष्ट शब्द रचना. कवितेचा आशय मनाला भिडला. आज वॉट्सअँप आणी social media मुळे आम्ही बिखरलेले जुने मित्र एकत्र आलो त्या बद्दल त्यांचे आणी हा उपक्रम राबवल्याबद्दल संयोजकांचे खूप खूप आभार
शाम भालेराव
Beautiful poem on childhood friendship
Khup chhan kavita ahe
कवी केशवराव चेरकू यांची ओढ ही कविता वाचली आणी मनाला खूप भावली. सुरवाती पासून शेवटपर्यंत उत्कृष्ट शब्द रचना आणी जुन्या शाळेतल्या मित्रांचे get together हा विषय खूप छान निवडला ह्या बद्दल त्यांचे आभार. वॉट्सअँप मुळे सर्व जुने मित्र एकत्र भेटलो ह्या बद्दल social media आणी ह्या उपक्रमाचे आयोजकांचे पण खूप खूप आभार
शाम भालेराव
केशवराव
तुमची कविता वाचून मला माझ्या मित्रांची आठवण झाली, खुप छान कविता
शुभेच्छा
विजय वाघ
केशवराव
व्वा खुप छान कविता केशव भावनांचा संगम साधलात छान कविता झाली. मला खूप आवडली
शुभेच्छा
नागो माळी
Dear keshavrao cherku
Happy to see one more KAVITA…
It’s simply very nice KAVITA
I WISH ALL THE BEST For your Compition.
Pramod Kawathekar
खुप छान कविता आहे
शुभेच्छा
-राईकवार
केशवराव कविता खूपच छान आहे. मला तर आवडलीच आहे. अशाच कविता करत रहा वाचायला आवडेल.