काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ.वैशाली सुनील मुन यांची -मैत्री – हि कविता -Maitri Kavita In Marathi- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
🌹मैञी🌹 Maitri Kavita In Marathi

नाते तुझे नी माझे
कसे मैञीत फुलुन आले,
आठवणीचा हिंदोळ्यावर हलकेच
आनंदाने हळुवारपणे हळुच झुलले….
मैञी तुझी नी माझी
जशी आठवणीचा क्षण भेटला,
ऋणानुबंध नात्याचा आपला
मोठया आनंदाने घडला….
मैञीचे माझ्या किती करू कौतुक
तीच शिकवते जीवनाचा सार,
दुःखात साथ देतो नेहमी मिञ
तेच बनतात वेळप्रसंगी आधार….
मैञीचा आठवणीचा त्या गोड
आठवणीचा असतो हिस्सा,
काँलेजमधील दिवसांचा त्या
आठवेल एकांतात किस्सा….
तुझी नी माझी मैञी
नभातील जणु चंद्र तारे,
तु नको आठवु मला आता
डोळ्यात अश्रू येतील सारे….
मला तुझी मैञी नेहमीच
खूप विशेष वाटायची,
तु जवळ नसला की
हुरहूर मनी दाटायची….
तुझी नी माझी मैञी ही
देव ही मान्य करेल,
मैञी एकदा झाल्यावर
कोण बरं विश्वास तोडेल….
तुझ्या माझ्या मैञीचा
सडा पडला माझ्या अंगणात,
नाते तुझे मी जगते माझ्या
कायमस्वरुपी जपते हृदयात….
तुझी नी माझी मैञी
क्षण बहरून आला,
दोघांची भेट नकळत झाली
आणि क्षण सुखावून गेला….
तुझ्या मैञीचा आठवणी
मला नेहमीच छळतात,
मी कुठे कमी पडले मैञीत
हाच प्रश्न उपस्थित करतात…
दुर निघून गेला तू
मैञीणीचा हात सोडून,
काय हाल होतील माझे हे माहीत
असूनही बघीतले नाही वळुन….
तुझी नी माझी मैञी
जणु जीवा भावाची,
पारदर्शक आहे नेहमी
नजर न लागे कुणाची….
आयुष्यात चांगली मैत्री
नशिबानेच नेहमी भेटतात,
आठवणीचा खेळ चांगला हा
जीवनात आनंदाने जगतात…..
तुझ्या माझ्या नात्यात
मैञीची आहे कायमस्वरुपी आस,
निभावून नेशील जीवनभर
हिच राहील नेहमी खास…..
जीवनात रंगत येते नेहमी
मैञीच्या गोड धाग्याने,
मैञी नेहमीच टिकते ही
विश्वाचा अमोल धाग्याने….
काही आठवणी जीवनात
कधीच विसरता येत नाही,
काही नाती तोडले तरी
मैञी कधीच जबरदस्तीने जुळत नाही…..
गाठी नाही बांधल्या रक्ताचा
तरी बंध नाही सुटत,
परके झालो आपण तरी
आपलेपणा नाही आटत…..
मैञी करुन तुझ्याशी
मी नाते नेहमीच पाळले,
तु दिले वचने नेहमी
का बरं फोल ठरले….
तुझ्या माझ्या मैञीला
नाही राहीले वेळेचे भान,
तु पण आठवण ठेव
जीवनात काही क्षण….
आठवणीच्या संग्रहालयात
मैञीचे स्थान आहे मोठे
छान मिञ भेटला की
नसते कधीच तोटे….
आज नकळत तुझी
मैञी मला आठवली,
मनात माजले काहूर
हदयात भावना कोरुन मी साठवली…..
गंध आपल्या मैञीचा
जिकडे तिकडे पोहचला,
दाटुन आली भावना
आणि शब्द कोरडे पडले….
तोडली जरी मैञी माझी
मला नाही तोडता आले,
घाव दिले हदयास कसे
मला नाही जोडता आले….
सौ. वैशाली सुनील मुन
चंद्रपूर
मैत्री By सौ.वैशाली सुनील मुन | Best Maitri Kavita In Marathi 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
मैत्री By सौ.वैशाली सुनील मुन | Best Maitri Kavita In Marathi 2023
खूप सुंदर काव्य रचना
सुंदर
खूपच सुंदर कविता मैत्रीवर👌
छान कविता लिहिली आहे
अतिशय सुंदर कविता
अप्रतिम कविता खूप छान 👌👌👌👌👌